मित्राला व्यवसायामध्ये आर्थिक मदत करताना लक्षात ठेवा या ६ गोष्टी

Reading Time: 3 minutesआपल्या मित्राला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी, विस्तारण्यासाठी, अन्य ठिकाणी कार्यालय स्थापण्यासाठी भांडवलाची गरज लागते. त्यावेळी एक मित्र म्हणून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. पण असे व्यवहार मैत्रीत करताना भावना व कर्तव्य याचा गोंधळ/ घोळ हमखास होतो. त्यासाठी काही पथ्ये पाळली, तर निष्कारण नंतर होणार मनस्ताप टाळू शकतो. शिवाय मित्राला मदत होऊन त्याचा  व्यवसाय व्हायलाही मदत होईल व आपली मैत्रीही अबाधित राहील. अर्थात ही भांडवल उभारणीची मदत डोळे झाकून न करता जर डोळस पणे केली, तर सोन्याहून पिवळे नाहीतर पितळ किंवा कथिलाचा वाळा!