कॅपिटल गेन अकाउंट स्कीम १९८८
Reading Time: 2 minutesविविध मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर द्यावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. यामधून विशिष्ठ अशा कॅपिटल गेन बॉण्ड मध्ये जास्तीत जास्त लाख ५० रुपयांची गुंतवणूक करून किंवा नवीन घरांत (२ कोटी रुपये जास्तीतजास्त २ घरे) अथवा शेतजमिनीत गुंतवणूक करून करसवलत मिळू शकते. घर, शेतजमीन विकत घेण्यासाठी २ वर्षाचा तर नवीन घर बांधण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. कारण हे व्यवहार करताना अनेक बारीक बारीक गोष्टींचा जसे, घराचे स्थान, किंमत इ विचार करावा लागतो.