Smallcase: स्मॉलकेस एक कल्पक गुंतवणूक योजना
Reading Time: 4 minutesस्मॉलकेस म्हणजे छोट्या आकारातील किंवा दुसऱ्या लिपीतील अक्षरं, हा शब्दप्रयोग येथे ‘वेगळ्या पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक’ अशा अर्थाने वापरला आहे. शेअरबाजारात गुंतवणूक करताना स्टॉक एक्सचेंजवरील नोंदणीकृत समभाग (Shares) थेट खरेदी करणे ही झाली प्रत्यक्ष खरेदी, तर म्युच्युअल फंड युनिट (MF Units) किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) बाजारातून किंवा त्याच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून (AMC) खरेदी करणे ही झाली अप्रत्यक्ष खरेदी. या दोन्हीपेक्षा स्मॉलकेस थोडी अभिनव अशी ही पद्धत आहे.