अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

Reading Time: 2 minutesअर्थ म्हणजे पैसे आणि अर्थसंकल्प म्हणजे साहजिकच आर्थिक गोष्टींशी निगडीत असणाऱ्या गोष्टींबाबतची सविस्तर मांडणी. मुळात अर्थ हा विषयच एवढा मोठा आहे की त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो. आणि जर हा अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प असेल तर तो तयार करताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असतो.