Frugality: काटकसर म्हणजे नक्की काय?

Reading Time: 4 minutes बऱ्याच लोकांना काटकसर एक एकांगी संकल्पना वाटते, ज्यामध्ये तुम्ही फक्त पैसा वाचवता आणि सतत पैसे वाचवण्याची सवय आपल्याला फारशी आवडण्यासारखी नाही. विकिपीडिया सांगते त्या प्रमाणे,काटकसर जीवनशैली आहे. काटकसर खूप वैयक्तिक आणि सापेक्ष गोष्ट आहे. माझ्यासाठी जी काटकसर आहे ती माझ्या आईवडिलांच्या दृष्टीने कदाचित उधळपट्टी असेल. सुरवात करूया काटकसरीचे स्वरूप समजून घेण्यापासून, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षमतेचा विचार करू शकाल.

काटकसरीचे कानमंत्र भाग २

Reading Time: 3 minutes प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.

काटकसरीचे कानमंत्र भाग १

Reading Time: 2 minutes आपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.