काटकसर म्हणजे नक्की काय?

Reading Time: 4 minutes

विकिपीडियानुसार, ‘काटकसर’ म्हणजे अन्न, वेळ किंवा पैसा यांना सांभाळून खर्च करणे, हातचं राखून ठेवणे, जपून किंवा बचतीचा विचार करून वापरणे. अर्थात, नासधूस, भव्यता किंवा अनावश्यकता टाळणे होय”. मला असे वाटले की ही परिभाषा बर्यापैकी चांगल्या प्रकारे सर्वसमावेशक आहे, विशेषत: वेळेच्या बाबतीत पण काटकसर महत्वाची आहे.

बऱ्याच लोकांना काटकसर एक एकांगी संकल्पना वाटते, ज्यामध्ये तुम्ही फक्त पैसा वाचवता आणि सतत पैसे वाचवण्याची सवय आपल्याला फारशी आवडण्यासारखी नाही.

विकिपीडिया सांगते त्या प्रमाणे,काटकसर जीवनशैली आहे. काटकसर खूप वैयक्तिक आणि सापेक्ष गोष्ट आहे. माझ्यासाठी जी काटकसर आहे ती माझ्या आईवडिलांच्या दृष्टीने कदाचित उधळपट्टी असेल. सुरवात करूया काटकसरीचे स्वरूप समजून घेण्यापासून, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षमतेचा विचार करू शकाल.

काटकसरीच्या तत्वज्ञानाचे स्वरूप-

काटकसरीची जीवन शैली अंगीकारण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करताना पुढील ५ प्रश्न / तत्व आधी तपासा:

 • पैसे वाचवण्याच्या पलीकडे तुमचे काही दीर्घकालीन हेतू आहेत का?
  • अल्प कालावधीचा विचार करून पैसे जपायचा विचार आपण करतो. उदाहरणार्थ, मी एका दुकानातून स्वस्तात मिळणारे बूट विकत घेतले. पण दीर्घकालावधीचा विचार करता ते निरूपयोगी ठरले आहेत. कारण त्या बुटांचा मला त्रास होत आहे.
  • याऐवजी थोडे जास्त पैसे खर्च करून चांगल्या प्रतीचे बूट खरेदी केले असते, तर ते मी दीर्घकाळ वापरू शकले असते आणि आरामदायकही झाले असते. पण हा विचार बहुतांश वेळा उधळेपणाचे समर्थन करतो.
  • आपण जो जास्तीचा खर्च करत आहोत, त्याची खरोखर दीर्घकालीन किंमत आहे की केवळ आपल्याला छान वाटावं यासाठी हे करत आहोत? उदाहरणार्थ, आपण ज्या नवीन कारचा विचार करीत आहात त्यामध्ये सनरूफ आहे,  तो आपल्याला काही दीर्घकालीन मूल्य देतो की उगाचच खर्च करण्यायोग्य नसलेल्या कारणासाठी आपण त्याचा विचार करत आहोत?
  • स्वतःला विचारा: मी थोडासा अधिक खर्च करून दीर्घ मुदतीसाठी चांगल्या गोष्टी मिळवू शकेन का? की ते पैसे खर्च करून मी अनावश्यक खर्च करत आहे?
 • एखादी गोष्ट पूर्ण खराब झाल्या शिवाय बदलू नका:
  • मी माझ्या आई-वडिलांकडून शिकलेल्या सर्वात मोठ्या धड्यांपैकी हा एक आहे. माझ्या बहिणीने वापरलेले कपडे मला देणं असो किंवा घरात वस्तू बिघडली की बरयाचदा दुरुस्ती करून वापरलेली उपकरणे असोत. माझ्या पालकांनी चाळीस वर्षे संसार केला आणि त्यापैकी वीस वर्ष त्यांनी सध्याच्या राहत्या घरात घालवली आहेत.
  • माझ्या घरी मी पाहिलं की एक पलंग चाळीस वर्ष जुना आहे आणि बहुतेक फर्निचर वीस वर्षांपासून वापरत आहेत.  
  • कपडे, बूट किंवा उपकरण असोत, मी हाच विचार करते की, त्या गोष्टींचा आपण किती काळापर्यंत उपयोग करू शकतो? आणि यातूनच मी हे तत्त्वज्ञान अनुसरण करीत आले आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या लॅपटॉपचा ६ वर्ष वापर केला आणि ३ वेळा दुरुस्ती केल्यानंतर, मी शेवटी नवीन मॉडेलचा लॅपटॉप घेतला. मला हे ठाऊक होत की त्यामुळे माझ्या कामात सकारात्मक बदल होऊन माझी कार्यक्षमता वाढेल.
  • स्वतःला विचारा: जी गोष्ट बदलायचा मी विचार करत आहे, ती दुरुस्त करून अजून थोडा काळ वापरली जाऊ शकते का?
 • केवळ आपल्याला गरज असलेल्या गोष्टी विकत घ्याव्या, हव्या असलेल्या नाही:
  • गरज आणि हाव यांच्यात मोठा फरक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एका नवीन फोनची गरज आहे, परंतु इच्छा असते एक आयफोन घेण्याची.
  • गरज आणि इच्छा यांच्यातील फरक करणे अनेकदा कठीण असते. कारण एकदा का मेंदूला आपला मार्ग मिळाला, की मग तो त्या समर्थन करतो.
  • नवीन खरेदी केल्याने आपल्या जीवनात काय बदल होईल हे तपासून पहा. आपल्याकडे आधीपासून स्कर्ट्स आहेत आणि आत्ता पाहिलेला नवीन एक घ्यावा अशी इच्छा आहे, तर मग आपण सर्व म्हणजेच ६ स्कर्ट्स वापरणार आहोत का? की काही लोकांना देण्याचा विचार करता आहात?
  • स्वतःला विचारा: ही नवीन खरेदी आवश्यक आहे का? मला खरोखर माझ्या आयुष्यात याची आवश्यकता आहे किंवा मी त्याशिवाय भागवू शकतो का?
 • प्राधान्य स्पष्ट करा आणि त्यानुसार खर्च करा:
  • पैसा म्हणजे परिपूर्ण जीवन जगण्यासाठीचं एक साधन आहे, म्हणूनच विचारपूर्वक महत्वाच्या गोष्टींवर खर्च करावा.
  • काटकसर म्हणजे आपल्या प्राधान्यक्रमांना जाणून घेणे आणि त्यावर खर्च करणे होय. उदाहरणार्थ, माझ्या पतीला प्रवासाचा कंटाळा आहे आणि त्याला शहरामध्ये किंवा जवळच्या ठिकाणी फिरणे आवडते. म्हणून, त्याने प्रवासावर थोडासा अतिरिक्त खर्च करण्याचा विचार केला नाही तर त्यात काही चूक नाही. शांत आणि समाधानी असणे महत्वाचे आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, ते पैसे वाचवून मित्र मैत्रिणींसोबत खर्च करू इच्छित असल्यास यावर विचार करणे आवश्यक आहे.
  • एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टच प्राधान्य असू शकत नाही. काटकसरी बनत असताना कशावर कमी पैसा खर्च करू शकतो आणि तो पैसा जास्त महत्वाच्या कोणत्या गोष्टीवर खर्च केला जाऊ शकतो, याची एक प्राधान्य यादी बनवा.
  • स्वतःला विचारा: आयुष्यामध्ये आपले प्राधान्य कशाला आहे? त्यासाठी आपण थोडा जास्तीचा खर्च करणे योग्य आहे का? अजून दुसरं काही महत्वाचे आहे का, ज्यावर तुम्हाला खर्च करणे आवश्यक आहे?
 • वेळ खर्च करून पैसा वाचवला जाऊ शकत नाही:
  • ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, जी की बरेच लोक विसरतात. बघितलं असेल की ‘स्वतः बनवा’ या सर्चखाली वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या कितीतरी वेबसाईट्स गुगलवर आहेत. परंतु जर ते बनवण्यासाठी इतर उपकरण विकत घ्यावे लागणार असेल आणि गरज नसताना आठवड्यातील काही तास घालवावे लागणार असतील, तर ते खरोखरच योग्य आहे का?
  • विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार, काटकसर म्हणजे, पैशाबरोबर वेळही वाचायला हवा. आपला वेळ किती मौल्यवान आहे हे जाणून घ्या आणि पैश्याची तुलना वेळेशी करा. पैसा वाचवण्यासाठी जो वेळ आपण घालवत आहोत, त्या वेळेचा वापर अजून कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो, याचा विचार करा.
  • स्वतःला विचारा: मी जो वेळचा वापर करून अमुक पैस वाचवत आहे त्या ऐवजी मी वेळेचा वापर जास्त चांगलं काही करण्यासाठी करू शकतो का?

काटकसर एक तत्त्वज्ञान आहे जे प्रत्येकासाठी वेगळे आहे. आपल्यासाठी त्याच्यामध्ये काय वेगळे आहे, याचा विचार करा. हा विचार केलात तर, आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आणि आनंददायी अशाच गोष्टींचा विचार कराल.

वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या प्रमाणित आर्थिक योजनाकार (Certified Financial Planner) असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात.त्यांना तुम्ही aparna@elementummoney.com या ईमेल आय.डी. वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग

पगारच पुरत नाही…बचत कशी करू? , बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *