Reading Time: 3 minutes

प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील.

सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते.

आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांचा अंगीकार करायला काहीच हरकत नाही.

१.  कमाई पेक्षा कमी खर्च-

  • काही लोकांना त्यांच्या खिशात येणारा प्रत्येक रुपया खर्च करावासा वाटतो कारण त्यांना ही खात्री असते की, आपल्याकडे अजून पैसा येणार आहे. ही सवय म्हणजे आपल्या कडे असणारा सगळा पैसा किंवा वेळ संपूर्णपणे संपेपर्यंत वापरण्यासारखे आहे.
  • एकदा सगळा साठा संपला की आपल्या हातात शून्य उरते आणि मग पश्चात्तापाशिवाय करण्यासारखे काहीही नसते.
  • आपले उत्पन्न रू. ४०,००० असेल तेव्हा केवळ रू २०,००० खर्च करून उरलेली रक्कम गुंतवणुकीत ठेवणे म्हणजे पैशाचा खरा उपयोग होतो. पगार जसा वाढत जाईल तसे गरज वाटल्यास खर्चाची रक्कम वाढवता येते पण बचतीची रक्कम तर नक्कीच वाढली पाहिजे याची काळजी घ्या.   

२. छोटेसे घरकुल शोधा-

  • मोठमोठाली घरे नेत्रदीपक असतात पण शेवटी घराचा उद्देश तो काय? कुठलही घर शेवटी छप्पर म्हणूनच वापरतात ना?
  • तुमचे कुटुंब वन रूम किचन मधेही आनंदाने राहत असेल तर तर मग टोलेजंग इमारतींची गरज आहे का?
  • घरात राहणाऱ्यांची संख्या वाढतेय हे घर बदलण्याचं कारण असू शकेल पण केवळ वस्तूंना जास्त जागा लागते म्हणून घर बदलणे पुढे जाऊन त्रासदायक आहे.

३. फेरीवाल्यांकडून खरेदी-

  • आपल्या आसपास अनेक फेरीवाले ग्राहकाच्या शोधात असतात. असे आपल्या दारापर्यंत येणारे दुकानदार आपल्यासाठी फायद्याचे असू शकतात. प्रवासाचा खर्च न करता दुकान आपल्या पर्यंत चालत येत असेल तर ही संधी सोडून नका.
  • या गोष्टी स्वस्तात आणि काहीतरी वाढीव फायदा देऊन जातात, म्हणून अशी खरेदी करताना संकोच करून नका.

४. काटकसरीने सेवन करा-

  • मॅक्डॉनल्ड्समध्ये एका बर्गर ची किंमत केवळ ६९ रुपये आहे याचा अर्थ तो स्वस्त नाही. त्याऐवजी, एखाद्या घरगुती खानावळीत त्याच पैशात स्वस्त जेवण मिळेल.
  • फक्त उच्च सामाजिक प्रतिमेच्या भीतीने तुम्ही मोठ मोठ्या हॉटेल मध्ये खात असाल किंवा किमती कंपनीचे कपडे घालत असाल तर यामुळे तुम्हाला पाहणाऱ्यांचे नाही तर तुमचे नुकसान होणार आहे.

५. अनेक मार्गी पैसा कमावणे-

  • पैशांची बचत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अधिक पैसे कमविणे. हे बोलणं सोपं अन करण कठीण वाटतंय? काळजी नको. तुमच्या पगाराशिवाय अजून मार्ग शोधा ज्यामुळे तुम्ही वाढीव पैसे कमाऊ शकाल.
  • शेअर मार्केटचे ज्ञान असल्यास तिथे गुंतवणूक करणे असेल किंवा नको असलेली खोली भाड्याने देऊन पैसे कमावणे असेल. असे मार्ग शोधा आणि बचतीला हातभार लावा.
  • इंटरनेटवर आपल्याकडे घरात बसून पैसे कमविण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत ज्यासाठी अजून ८ तासांचा जॉब करणे गरजेचे नाही.
  • जर आपण प्रचंड काटकसर करण्यास असमर्थ असाल तर अशी पॅरेलाल कमाई तुमचे नुकसान भरून काढेल.

६. महिन्याची किरणा यादी –

  • जर आपण आपल्या प्रत्येक जेवणाचे येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणांचे नियोजन करण्याची सवय लावून महिन्याची किरण यादी बनवून तेवढेच समान आणून ते वापरात असाल तर तुम्ही पैसे आणि वेळ वाचवित आहात.
  • त्यापेक्षा कामी किंवा जास्तही खर्च न होऊ देणे हे आव्हान आहे. ते स्वीकारा आणि पैसे वाचवा.

७. ज्याची गरज आहे तेच खरेदी करा-

  • मॉलमध्ये किंवा सेलमध्ये वस्तू स्वस्त मिळतायत म्हणून खरेदी करणे बंद करा. त्यांची आपल्याला खरच गरज आहे का? आणि हा सेल नसता तर तुम्ही ती वस्तू घेण्याचा विचार केला असत का ? हे प्रश्न स्वतःला विचारा.
  • चित्रपटागृहातील पॉपकॉर्न घेणे खरोखरच आवश्यक आहे का? मुळात एखादा चित्रपट खरच आपल्या आवडीचा आहे का? याचा विचार करा. ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींवर आपण खूप पैसे खर्च करतो तो टाळा.

८. सोपे मनोरंजन-

  • मनोरंजन हा आयुष्याचा महत्वाचं भाग आहे. फुकट काहीच मिळत नाही. सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते हा समज संपूर्णपणे बरोबर नाही.
  • नेटफलिक्स किंवा महागडे हॉटेल याऐवजी निसर्गात रमता येण्यासारखे छंद जपले तर त्यासाठी पैसे लागत नाहीत.

काटकसर म्हणजे नक्की काय?,  काटकसरीचे कानमंत्र भाग १ ,

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला? , पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.