ESIC योजना
https://bit.ly/3jOmAbT
Reading Time: 3 minutes

ESIC- इएसआयसी  योजना 

एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण घेऊन तिला आता एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मागचा आठवडा ती रजेवर होती म्हणून तिला विचारले, तर समजले की वडिलांना मलेरिया झाला होता. मग माझ्या अचानक लक्षात आले की हिने ‘इएसआयसी’ (ESIC) साठी कसे नाही विचारले. चौकशी केल्यावर समजले की तिला ‘इएसआयसी योजना’ काय आहे, हेच माहिती नव्हते.

कार्तिकीप्रमाणे आपल्याला अपूर्‍या महितीमुळे या सुविधेपासून वंचित राहावे लागू नये म्हणून इएसआयसी (ESIC)  योजना काय आहे आणि त्याचा आपण लाभ कसा घेऊ शकतो हे पाहूया.

हे नक्की वाचा: नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन

काय आहे इएसआयसी (ESIC) योजना ?

 • कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC- Employees’ State Insurance Corporation) ही भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या विभागातील कर्मचार्‍यांच्या राज्य विमा महामंडळाची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे. 
 • या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या कर्मचार्‍यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणार्‍यांना आजारपणासाठी तसेच इतर अनेक फायदे मिळतात.  

ESIC योजना: माहिती आणि व्याप्ती –

 • इएसआयसी योजना पूर्ण भारतभर लागू आहे. 
 • कारखाने अथवा दुकाने अथवा संस्था इ. ज्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त कर्मचारी कामासाठी आहेत अशा प्रत्येक ठिकाणी इएसआयसी योजना लागू होते. 
 • यासाठी कर्मचार्‍याचे मासिक वेतन हे रुपये एकवीस हजार (२१,०००) पेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. 
 • मात्र अपंगत्व असणार्‍या कर्मचार्‍यांसाठी हीच मर्यादा रुपये पंचवीस हजार (२५,०००) असेल.
 • या योजनेसाठी कर्मचार्‍याच्या वेतनाच्या ०.७५% कर्मचार्‍याकडून तर ३.७५% कंपनीकडून योगदान घेतले जाते (१.७.२०१९. प्रमाणे). ही टक्केवारी वारंवार अद्ययावत केली जाते.    
 • कर्मचारी सर्व प्रथम कामावर रुजू झाल्यानंतर त्यांची इएसआयसी  अंतर्गत नोंदणी केली जाते व नोंदणी झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड दिले जाते. 
 •  ईएसआयसी. रुग्णालयातील सर्व सुविधांचा लाभ या कार्ड अंतर्गत घेता येतो. 
 • यासाठी खर्चाची कुठलीही मर्यादा नसते. तसेच जर इएसआयसी  रुग्णालयात औषधे, उपकरणे, सुविधा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असेल, तर ईएसआयसीने अशा रुग्ण / कर्मचार्‍यांना किंवा कुटुंबातील सदस्याला खासगी रुग्णालयात पाठविले जाते आणि सेवा देणार्‍या रुग्णालयाला थेट बिलाची रक्कम परत दिली जाते.
 • आपण नोकरी बदलली तरी आपला इएसआयसी  क्रमांक हा तोच राहतो. आपल्याला फक्त तो क्रमांक नव्या कंपनीत द्यावा लागतो.

महत्वाचे लेख:  तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?

ESIC योजनेचा लाभार्थी कोणाला होता येईल?

 • भारतात लाखोंच्या संख्येने कामगार आहेत. जे या योजनेचा लाभ घेत असतात. 
 • यातील बरेच कामगार हे कामासाठी खेड्यांमधून व छोट्या शहरांमधुन शहरी भागात स्थलांतरित झालेले असतात. 
 • एकाच कार्ड मूळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच वेळी लाभ घेणे जिकरीचे ठरते.
 • त्याचसाठी इएसआयसी  ने प्रत्येक कर्मचार्‍याला ‘पेहचान कार्ड’ नावाने प्रसिद्ध असलेले दोन कार्ड वाटप केले आहेत. जेणेकरून कुटुंबीय आणि कर्मचारी आपापल्या राहत्या ठिकाणाहून योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.     

ESIC योजना: योजनेअंतर्गत मिळणार्‍या सुविधा आणि लाभ –

वैद्यकीय – योजनेअंतर्गत विमाधारकाला आरोग्य सेवा या परवडणार्‍या/वाजवी दरात मिळतात. कर्मचार्‍याला त्याच्या कामाच्या प्रथम दिवसापासूनच विमा संरक्षण मिळते.

आजारपण – वैद्यकीय रजेवरती असताना कर्मचारी जास्तीत जास्त ९१ दिवसाच्या वेतांनाच्या ७०% पर्यन्त लाभ घेऊ शकतो.

मातृत्व –  या योजने अंतर्गत लाभार्थी २६ आठवड्यांपर्यंत वेतनाच्या १००% लाभ घेऊ शकतात जे की वैद्यकीय सल्ल्यानुसार एक महिन्यापर्यंत वाढवता येते. गर्भपात झाल्यास त्याचा फायदा हा सहा आठवड्यांपर्यंतचा असेल तर दत्तक घेण्याच्या बाबतीत १२ आठवड्यांचा असतो. जर बाळंतपण ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी योजनेअंतर्गत  दवाखाना नसेल तर लाभार्थ्यास त्यासाठीची रक्कम मिळते.

अपंगत्व –  कर्मचार्‍याला तात्पुरते अपंगत्व आल्यास तो बरा होईपर्यंत त्याला ९०% वेतन दिले जाते. कायमचे अपंगत्व आल्यास ९०% वेतन त्याला आयुष्यभर मिळू शकते.

बेरोजगारी – रोजगार नसल्यास अथवा दुखापतीमुळे कायमस्वरूपी रोजगार गेल्यास योजनेद्वारे लाभार्थ्यास २४ महिन्यांच्या कलावधीसाठी ५०% मासिक वेतन दिले जाते.

अंत्यसंस्कार – या अंतर्गत अंत्यसंस्कार खर्चासाठी १५००० रुपये देते. हे कुटुंबीयांना किंवा विमाधारकाचा अंत्यसंस्कार करणार्‍याला दिले जातात.

व्यावसायिक पुनर्वसन – विमाधारकाच्या गरजेनुसार त्याला व्यावसायिक पुनर्वसनाचा लाभ घेता येतो.  व्यावसायिक पुनर्वसन (व्हीआर) प्रशिक्षण घेण्यासाठी कायमस्वरुपी जखमी झालेल्या अपंग व्यक्तींसाठी ही योजना आहे.

शारीरिक पुनर्वसन – विशेषत: कामाच्या ठिकाणच्या दुखापतीमुळे अपंगत्व आलेल्या विमाधारकासआवश्यकतेनुसार हा लाभ देखील प्रदान केला जातो.

वृद्धावस्थेची वैद्यकीय सेवा – जेव्हा विमाधारक व्यक्तीस सेवानिवृत्ती मिळाल्यावर किंवा व्हीआरएस किंवा ईआरएस अंतर्गत निवृत्त झाल्यास किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीस कायमस्वरूपी अपंगत्वामुळे काम सोडावे लागते तेव्हा विमाधारक व जोडीदारास प्रति वर्ष १२० रुपये मिळतिल.

“तर, ही झाली इएसआयसी योजनेची माहिती. आपण कर्मचारी असाल आणि इएसआयसी अंतर्गत नोंदनिकृत नसाल, तर नक्कीच आपल्या कंपनीमध्ये चौकशी करा. तसेच आपण जर उद्योजक असाल तर या योजनेचा फायदा आपल्या कर्मचार्‍यांना मिळण्यासाठी लगेच नोंदणी करू शकता. अगदी सोप्या भाषेत मांडलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. 

 For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.