Arthasakshar Nomination नॉमिनेशन
https://bit.ly/3ajPOw7
Reading Time: 2 minutes

Nomination: नॉमिनेशन 

नॉमिनेशन (Nomination) किंवा नामनिर्देशन हा शब्द अनेकांना परिचित असेल. बँकेत खातं उघडायचं असो वा विमा पॉलिसी काढायची असो नॉमिनेशनचा फॉर्म दरवेळी भरून द्यावा लागतो. इतकंच काय तर, गुंतवणूक करतानाही नॉमिनेशन फॉर्म भरून देणं आवश्यक असतं. बहुतांश अर्जदार हा नॉमिनेशन फॉर्म भरतच नाहीत कारण नॉमिनेशनचा फॉर्म अर्जदाराच्या दृष्टीने फक्त औपराचीकता असते. परंतु, नॉमिनेशन म्हणजे फक्त औपचारिकता नाही. आर्थिक व्यवहारांमध्ये हा एक महत्वाचा घटक आहे. 

Password: हे ३० पासवर्ड चुकूनही वापरू नका

नॉमिनेशन म्हणजे काय? (What is Nomination?)

  • नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन ही कायद्याने आपल्याला दिलेली एक सुविधा आहे. 
  • या सुविधेद्वारे बँक खाते, सेफ डिपॉझिट लॉकर, गुंतवणूक, विमा, इ. आर्थिक खात्यांसाठी आपल्या मृत्यूपश्चात आपला उत्तराधिकारी निश्चित केला जातो. 
  • थोडक्यात आपल्या मृत्यूपश्चात आपल्या खात्यामध्ये जमा असणारी रक्कम ज्या व्यक्तीला मिळावी असं आपल्याला वाटतं त्याच्या नावे संबंधित खात्याचे नॉमिनेशन केलं जात.

नॉमिनी कोणाला करता येते? 

  • सर्वसामान्यपणे पती, पत्नी, आई, वडील, मुले, बहीण, भाऊ अशा अगदी जवळच्या व्यक्तीला आपला नॉमिनी करतात .
  • काही खात्यांसाठी आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी करता येते. 
  • खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी नेमलेले असल्यास सर्वसामान्यपणे  खात्यामधील रक्कम समसमान वाटली जाते, तर काही  खाती  मात्र  टक्केवारी ठरवायची  सुविधाही  खातेधारकास देतात. 
  • खातेदाराने टक्केवारी निश्चित केलेली असल्यास त्यानुसारच खात्यामधील रकमेचे वाटप केले जाते. 

एटीएम कार्ड हरवले? त्वरित करा हे ६ उपाय

नॉमिनेशन का महत्वाचे आहे? 

  • एखाद्याच्या निधनाची दुर्दैवी घटना घडल्यास, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. 
  • अनेकदा मृत व्यक्तीच्या खात्यात असलेले पैसे नॉमिनेशन अभावी सदर व्यक्तीच्या कुटुंबियांना न मिळता बँकेत तसेच पडून राहतात. आपल्या कुटुंबियांसाठी या कठीण काळात आपले हक्काचे पैसे कामी यावेत म्हणून आपल्या प्रत्येक खात्यासाठी नॉमिनेशन करणं अत्यंत  आवश्यक आहे. 
  • तुमच्या कमाईवर तुमच्या मृत्यूपश्चात तुमच्या कुटुंबाचा अधिकार असतो. नॉमिनेशन केलेले नसल्यास ही जमापुंजी मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 
  • याचबरोबर वारस प्रमाणपत्र, मृत्युपत्र किंवा कोर्टाचा आदेश यासह अनेक दस्तावेजांची आवश्यकता भासू शकते. यामध्ये प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातो. 
  • अशाप्रकारचे दावे आयुष्यभर कोर्टात लढणाऱ्या व्यक्ती बघितल्यावर नॉमिनेशन प्रक्रियेचे महत्व लक्षात येईल.  
  • अशी परिस्थिती आपल्या कुटुंबियांवर येऊ नये म्हणून आपल्या प्रत्येक खात्यासाठी नॉमिनेशन करणे आवश्यक आहे. 

नॉमिनेशन (Nomination) – एक गंभीर समस्या 

  • नॉमिनेशन संदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे.
  • टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार(18 मार्च 2020) यामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार देशभरातील 64 बँकांमध्ये एकूण 11,300 कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत ज्या ठेवींसाठी कोणीही दावेदार नाही. 
  • यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 1,262 रुपयांच्या ठेवी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधल्या आहेत.
  • नॉमिनेशन केलेले नसल्यास पैसे परत मिळविणे किती अवघड आहे याचा यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकेल.

आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

नॉमिनेशन (Nomination) – काही महत्वाचे मुद्दे

  • नॉमिनेशन  फॉर्म  भरताना ज्या व्यक्तीचे नॉमिनेशन करायचे आहे त्या व्यक्तीचे  संपूर्ण नाव, वय, पत्ता आणि त्याचे आपल्याशी असलेले नाते संबंध नमूद करावे. 
  • अनेकदा नॉमिनेशन फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती न लिहिता केवळ  ‘आई’,‘पत्नी’, ‘मुले’  एवढाच उल्लेख केला जातो. असं करणं अत्यंत चुकीचे आहे. 
  • नॉमिनी किंवा नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, तुमच्या पश्चात त्याचे पालकत्व स्वीकारण्या व्यक्तीचे नाव नमूद करावे. त्याच्या त्याचे संपूर्ण नाव, वय, पत्ता आणि नातेसंबंध देणारी नेमणूक म्हणून नेमलेल्या व्यक्तीची नेमणूक करा. 

बँक खाते, लॉकर्स, विमा अथवा अनेक आर्थिक गुंतवणुकींसाठी नॉमिनेशन फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मला दुय्यम समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. संपूर्ण विचार करून हा फॉर्म व्यवस्थित भरा अन्यथा आपल्या मृत्य पश्चात आपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केलेले  सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील आणि आपल्या मालमत्तेवर दावा सांगण्यासाठी आपल्या प्रियजनांचा वेळ घेणारी एक कंटाळवाणी प्रक्रिया सुरू होईल. नॉमिनेशन फॉर्म भरा आणि आपल्या सर्व खात्यांना बेवारस राहण्यापासून वाचवा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Nomination Marathi, Nomination Marathi mahiti, Bank Nomination in Marathi, Insurance Policy Nomination Marathi, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.