Reading Time: 2 minutes

‘भीम’ हे नाव नेहमीच सक्षम भारताचा चेहरा आहे. ‘भीम’ म्हटलं की महाभारतातला भीम आठवतो, जो शारीरिक ताकदीचं प्रतिक मानला जातो. तर आधुनिक भारताला ज्ञात असलेला ‘भीम’ अर्थात भीमराव आंबेडकर, बौद्धिक आणि सामाजिक शक्ती साठी लढला. आणि आता २१ व्या शतकातला ‘भीम’ भारताला आर्थिक दृष्ट्या सबल करणारा आहे. तर मग कोण आहे हा पोस्ट मॉंडेन भीम? नेमका काय उपयोग आहे याचा?

BHIM – भारत इंटरफेस फॉर मनी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केलेले एक असे अॅप आहे जे आपले सगळे आर्थिक व्यवहार सोपे आणि सुरक्षित करतो. 

भारत डिजिटायझेशन आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात आहे तेव्हा सर्वसामन्य माणसांपर्यंत हे वारे पोहचण्यासाठी अॅप प्रणालीचा वापर करून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी BHIM अॅप जाहीर केले. देशात होणारे कॅशलेस आर्थिक व्यवहार थेट बँकाद्वारे व्हावे हा याचा मूळ उद्देश.

आर्थिक व्यवहार म्हणजे काय?

विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये होणाऱ्या मालमत्ता किंवा पैशाच्या स्वरुपात होणाऱ्या देवाणघेवाणीला आर्थिक व्यवहार म्हणतात. आर्थिक व्यवहार २ प्रकारे केले जाऊ शकतात–

१. रोख व्यवहार                  

२. विना-रोख किंवा कॅशलेस व्यवहार         

देशात होणारा प्रत्येक आर्थिक व्यवहार विनारोख/कॅशलेस व्हावा यासाठी हे अॅप एक महत्वाचे पाऊल आहे. हे अॅप युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या वर आधारित आहे.

काय आहे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)?

  • NEFT, RTGS, IMPS प्रमाणेच आरबीआय द्वारे नियंत्रित केली जाणारी ही प्रणाली आहे. 

  • युपीआय म्हणजेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस,  मुळात एक पेमेंट सिस्टम आहे. 

  • स्मार्टफोनचा वापर करून कोणत्याही दोन बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरणची सोय ती देते. 

  • यूपीआय ग्राहकांना बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यापारी हेतूसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे वापरली जाते. 

  • यामूळे क्रेडिट कार्डाचा तपशील, आयएफएससी कोड ,भरणे,  नेट बँकिंग/वॉलेट यांचे पासवर्ड हा सगळा पसारा टाळता येऊ शकतो.

व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए) म्हणजे काय?

  • युपीआय चा एक महत्वाचा भाग म्हणजे ‘व्हीपीए’. हा एक प्रकारचा ईमेल आयडी आहे असे समजू,  

  • जो आपण पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरू शकतो. 

  • व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए) एक युनिक ओळख क्रमांक आहे ज्याचा वापर आपण यूपीआय वर पैसे पाठविण्यासाठी आणि मिळवण्यासाठी वापरू शकता.

BHIM अॅप चा वापर आपण पुढील प्रकारे शकता /अॅप ची वैशिष्ट्ये?

  • या  अॅपचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू आणि पैसे मिळवू शकता.

  • जलद पेमेंट करण्यासाठी क्यूआर स्कॅन करून तत्काळ पे पर्याय निवडू शकता.

  • तुम्ही केलेल्या सर्व व्यवहार भविष्यातील संदर्भांसाठी जतन करण्याचा पर्याय आहे, म्हणजेच आपले  मागील व्यवहार तपासू शकता.

  • एखाद्या खात्यात आणि आयएफएस कोड वर पैसे पाठवण्याची सोय या अॅप मध्ये आहे.

  • विमानाची तिकीटे बुक करणे किंवा मोबाइल रीचार्ज अशी कामे करू शकता.

  • सर्वात महत्वाचं म्हणजे, इंग्रजी/हिंदी बरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये याचा वापर करता येतो.

  • वापरकर्त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक नेहमीचे प्रश्न (FAQ) विभाग येथे आहे.

  • याशिवाय, क्षणात बॅलन्स आणि व्यवहार तपासण्यासाठी अहवालाची (Reports) मागणी करता येते.

  • थेट समस्या सोडवण्यासाठी ‘कॉल बॅक’ सुविधा उपलब्ध आहे.

अॅपचे फायदे काय आहेत?

  • मर्चंट पेमेंट पाठविणे/मिळवण्यासाठी हे अॅप वापरले जाऊ शकते.

  • 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन  मुळे आणखी सुरक्षीत आहे.

  • व्हर्च्युअल पेमेंट पत्ता तयार करताना वापरकर्ता स्वतःचे नाव किंवा मोबाइल नंबर वापरू शकतात.

  • २४X७, ३६५ दिवस तत्काळ पैसे हस्तांतरण करण्याची सेवा इथे आहे

  • भारताबाहेरही BHIM  चा वापर करून आपण आपल्या स्थानिक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी करू शकता, पण लक्षात ठेवा की एनआरआय/एनआरई खात्यांचा वापर करता येत नाही.

  • इंटरनेटशिवाय ही या सुविधेचा वापर करता येतो. मोबाइल फोनवरून *99# डायल करा आणि हवी ती माहिती मिळवा.

  • कस्टमर रिमाइंडर या फिचरचा वापर करून आपले फोन बिल, ईएमआय, इलेक्ट्रिसिटी बिल इ. सारख्या पेमेंटचे रिमाइंडर सेट करू शकता.

भीम अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

भीम च्या अधिक माहितीसाठी आणि ऑफिशिअल वेबसाईटसाठी इथे क्लिक करा.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.