Arthasakshar Life Insurance कोणता आयुर्विमा घ्यावा
https://bit.ly/2IsQ1gN
Reading Time: 3 minutes

Life Insurance: कोणता आयुर्विमा घ्यावा?

“कोणता आयुर्विमा (Insurance) घ्यावा?” बाजारातील विविध विमा कंपन्यांच्या आयुर्विमा पॉलिसीज बघून गोंधळलेल्या विमा ग्राहकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

“घायल” चित्रपटातील हे गाणं आठवतय ना? जेव्हा आपल्या सोबतीला कुणीतरी असतं तेव्हा थोडीशी बेफिकीरी करायला हरकत नाही.त्या चित्रपटात राज बब्बरसोबत झालेल्या घातपाताची परतफेड करण्यासाठी त्याचा लहान भाऊ आयुष्य पणाला लावतो.

परंतु एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंबाकडे होत गेलेला प्रवास एकटया कमवित्या मनुष्याच्या ताण-तणावात भर घालतांना आपण सगळेच जण थोडयाफार फरकाने अनुभवतोय.आजचा विषय आहे आपल्यानंतर आपली जबाबदारी घेणारा लहान भाऊ कोण?

Insurance: विमा 

 • “विमा” हा शब्द तसा प्रत्येकाच्या परिचयाचा करून देण्यात आयुर्विमा महामंडळाचे मोठे योगदान आहे. पूर्वी विमा हे गुंतवणूकीचे साधन म्हणून बघितले जाई किंवा तसे बिंबविण्यात विमा विक्रेत्यांना फायदेशीर वाटले असे म्हणणे अधिक उचित होईल.

 • परंतु विमा ही आपली सुरक्षितता आहे हे समजण्यास आपल्या देशात २१वे शतक उजाडावे लागले, हे देखील विसरून चालणार नाही कारण सुरक्षितता ही गरज आहे पर्याय नाही,हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

 • जेव्हा खाजगी कंपन्यांना विमा व्यवसायात येण्याची परवानगी मिळाली तेव्हा विम्याचे शुद्ध गुंतवणूक सोडून सुरक्षितता या संज्ञेकडे संक्रमण झाले.

 • २०१४ साली स्विडीश अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणात सरासरी भारतीय व्यक्तीला किंवा कुटुंबाला १ कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाची आवश्यकता असतांना केवळ ८ लाखांचे कवच असल्याचे नमूद केले आहे.

 • मॉलमधे गेल्यावर जसे खाद्यतेलाचे विविध दर्जाचे प्रकार उपलब्ध असतात त्याप्रमाणे सध्या विम्यासोबत विविध पर्याय उपलब्ध आहेत.

 • विमा घेतांना तुम्हाला कुटुंबासाठी सुरक्षा कवच हवे आहे की तुम्ही विम्यापोटी भरलेल्या हप्त्यावर परतावा हवा आहे,हे अगोदर ठरवावे लागेल.

 • विमा खरेदी करतांना कुठल्या गरजा पडताळून बघितल्या पाहिजेत हेच कुणी आपल्याला सांगत नाही.आणि सांगितले जरी तरी ते आपल्या पचनी पडत नाही.कारण विमा घेतांना हप्ता (Premium) कमी पण सुरक्षा कवच (Insurance Cover) अधिकचे हवे, ही आपली पहिली अट असते, तर मी भरलेले पैसे परत मिळाले पाहिजे ही दुसरी अट असते.

Life Insurance: कोणता आयुर्विमा घ्यावा?

तुमचे सध्याचे वय ३५ वर्षे गृहीत धरल्यास विमा घेताना पुढील घटकांचा विचार केला गेला पाहिजे.

 1. सध्या कुटुंबासाठी होणारा वार्षिक खर्च किती आहे?

 2. पुढील २५ वर्षे ८% महागाई दराने किती पैशांची आवश्यकता भासू शकेल?

 3. तुमच्याकडे सध्या असलेली स्थावर व जंगम मालमत्ता वजा जाता देणी किती आहेत?

 4. भविष्यातील ध्येये (उदा.पाल्याचे शिक्षण) पूर्तीसाठी किती पैशांची तरतूद लागू शकेल?

 5. विमाछ्त्र किती कालावधीसाठी असावे?

वरील सर्व मुद्दे एका आर्थिक सूत्रात बसवून तुम्हाला किती रकमेचा विमा गरजेचा आहे? हे तपासून विमा खरेदी करणे गरजेचे आहे.

 • समजा कुटुंबाचा सध्याचा वार्षिक खर्च ३,६०,०००/- रुपये आहे.म्हणजेच पुढील २५ वर्षात घर खर्चासाठी ८% महागाई दराने अंदाजे २ कोटी ५० लाख रुपये लागतील.

 • कर्जे व देणी २० लाख रुपये.पाल्याचे शिक्षण ३० लाख रुपये.या सर्वांची बेरीज केल्यास ६० वर्षे वयापर्यंत ३ कोटी रुपयांचे विमाछ्त्र तुम्हाला आवश्यक आहे.

विमा भितीपोटी कधीही घेऊ नये.

 • तुम्ही भरत असलेला विम्याचा हप्ताच केवळ तुमचा लहान भाऊ होण्यास पात्र आहे. यासोबतच कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे तेवढेच आवश्यक आहे.

 • विमा हा विषय अमॅझॉनवरून आपल्या आवडीचे पुस्तक खरेदी करण्याइतका सहज नाहीये. एका लेखातून विमा या विषयाचे विश्लेषण करणे शक्य नाही

 • त्यासाठी विश्वासू आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक आहे कारण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने दिलेली विशिष्ट टप्प्यांवर पैसे परत करणारी विमा योजना जेव्हा तुम्हाला विम्याची आवश्यकता असते तेव्हा संपलेली असते.

भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणजे काय? याचा प्रत्यय एका सत्य उदाहरणातून समजून घेऊ. माझ्या ओळखीतले एक विमा गुंतवणूकदार आहेत.

 • त्यांचं सध्याचं वय ४० असून वयाच्या २२व्या वर्षापासून सरासरी उत्पन्न १० लाखांच्या पुढे आहे.

 • गेल्या १८ वर्षात ३७ विमा योजनांचा लाखभर हप्ता भरून देखील त्यांचे विमा कवच २५ लाखांपेक्षा जास्त नाहीये.

 • त्यांनी जर वयाच्या २२व्या वर्षी १ कोटी रुपयांचा शुद्ध विमा घेतला असता तर त्यांना तेव्हा अंदाजे वार्षिक हप्ता ४,८००/- ते १०,५००/- रुपयांदरम्यान भरावा लागला असता. 

 • तेवढाच हप्ता वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत भरून १ कोटी रुपयांचे विमा कवच कायम ठेवू शकले असते.

 • उरलेल्या रकमेचे(१६,२०,०००/-) मासिक ७,५००/- प्रमाणे १२% चक्रवाढ पद्धतीने परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतविले असते तरी आजच्या बाजारभावानुसार ५७,४०,७९२/- रुपये झाले असते.

 • तेव्हा शुद्ध विमा (Term Plan) घेणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.

-अतुल कोतकर

94231 87598

[email protected]

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search:  Which life insurance should common man take? Marathi, Life insurance information guide in Marathi, Life Insurance Marathi Mahiti, Life Insurance Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.