६.०५ अंश घसरणीसह निफ्टी १०,०१४.५० वर बंद झाला. तर ७३.४२ अंश घसरणीने सेन्सेक्स ३२,३०९.८८ पर्यंत स्थिरावला. गेल्या सलग दोन व्यवहारातील तेजीमुळे मुंबई निर्देशांकात १५५.०३ अंश भर पडली होती. या दरम्यान सेन्सेक्स ३२,२८३.३० पर्यंत झेपावला होता. तर सत्रातील त्याचा सर्वोच्च टप्पा ३२,६०० नजीक पोहोचला होता.
भांडवली बाजारात शुक्रवारी औषधनिर्माण, पोलाद, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, बँक आदी क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. सेन्सेक्समधील डॉ. रेड्डीज्, ल्युपिन, सन फार्मा आदी औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तब्बल ६ टक्क्य़ांपर्यंत घसरले. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, कोल इंडिया आदी २ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर रिलायन्स कॅपिटल, आयटीसी, एचडीएफसी आदी मूल्यवाढीच्या यादीत राहिले.
साप्ताहिक तुलनेत निर्देशांकांनी सलग चौथी सप्ताह वाढ यंदा नोंदविली आहे. या कालावधीत सेन्सेक्स २८०.९९ अंशांनी तर निफ्टी ९९.२५ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत ही वाढ एक टक्क्य़ापर्यंतची आहे.
भारतीय रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या आठवडय़ात आहे. त्यावर बाजाराची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यंदा व्याजदर कपातीची आशा मोठय़ा प्रमाणात व्यक्त केली जात आहे. जूनमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमालीचा खाली आल्याने दरकपातीबाबत सकारात्मक वातावरण आहे.