आज ॲमेझॉनवर आपल्याला पुस्तकांपासून ते म्युझिक सीडीपर्यंत त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, स्पोर्टिंग फॅशनपर्यंत ॲमेझॉनवर सगळ्या गोष्टी मिळतात. गेल्या 26 वर्षात Amazon ने सर्व क्षेत्रात आपले पाय घट्टपणे रोवले आहेत. अर्थसाक्षरच्या सक्सेस सिरीजमध्ये आपण नायका, बायजू , सॅमसंग, टायटन, फ्लिपकार्ट, लेन्सकार्ट या ब्रँडची सुरूवात कशी झाली याबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या भागात आपण ॲमेझॉनची सुरूवात कशी झाली याबद्दल माहिती घेणार आहोत. इ-कॉमर्समध्ये आघाडीच्या कंपन्यांपैकी ॲमेझॉनची सुरूवात जेफ बेझॉस यांनी १९९४मध्ये केली होती. अॅमेझॉनचे सुरूवातीचे स्वरुप केवळ ऑनलाइन पुस्तकांची विक्री करणे इतकच मर्यादित होत. तेव्हा या कंपनीचा कारभार बेझॉस यांच्या वॉशिंग्टन येथील घरातील गॅरेजमधून सुरू झाला होता.
हेही वाचा – Success Story of Flipkart : जाणून घ्या भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअप ‘फ्लिपकार्ट’ची संघर्षकथा….
पहिले विकली पुस्तके
जेफ बेझोस वॉल स्ट्रीटमध्ये एक अधिकारी म्हणून काम करत असे. आणि भविष्यात ऑनलाईन वस्तू विकण्यात मोठी संधी असल्याचे हेरले. स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी त्याने वॉलस्ट्रीट मधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीस राम राम ठोकला. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम सि्अॅटल येथे हलवला. आणि कॅडाब्रा या नावाने नवीन ई कॉमर्स कंपनी सुरू केली. बेझोस जेव्हा कंपनीची कायदेशीररित्या नोंदणी करण्यास गेला. तेव्हा त्यांच्या वकीलाने कॅडावर असे चुकीचे ऐकले. आणि त्याच नावाने रजिस्टर केले. पुस्तकांशिवाय इतर काहीही विकण्याची योजना नसल्यामुळे, नंतर Amazon ला, लोकांना अशाच पद्धतीने म्युझिक सीडी किंवा मूव्ही डीव्हीडी विकत घ्यायच्या आहेत असे सुचवणारे ईमेल येऊ लागले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहता त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला. आजा ॲमेझॉन पुस्तके, म्युझिक सीडी, फॅशन, हार्डवेअर आणि टूल्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि अॅक्सेसरीज यासारख्या 30 हून अधिक उत्पादनांची विक्री करते.
20 वस्तूंची केली यादी
बेझॉस यांनी जुलै १९९५मध्ये पहिल्या पुस्तकाची विक्री केली होती. त्यानंतर दोनच वर्षात १९९७मध्ये ॲमेझॉनचा IPO बाजारात आला. अॅमेझॉनचे आजचे उत्पन्न ५९६ मिलियन डॉलर इतके आहे. आणि आजच्या घडीला त्यात २ लाख ६८ हजार ९०० कर्मचारी काम करत आहेत. बेझोस यांनी आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी पुढील गोष्टी केल्या. त्यांनी वेबसाईटवर नसलेल्या 20 वस्तूंची यादी केली. आणि बेझोसने त्या वस्तूंचे पर्याय आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले. यामध्ये कंप्यूटर हार्ड डिस्क, हार्डवेयर, सॉफ्टवेयर, व्हीडीयो, तसेच पुस्तके यांचा समावेश होता. दोन महिन्यात ॲमेझॉन लाँच झाल्यावर त्यांनी 45 देशांमध्ये पुस्तके विकली.
हेही वाचा – BYJU’S Success Story: ‘बायजू रविंद्रन’ यांची प्रेरणादायी यशोगाथा !
ॲमेझॉन आणि वाद
ॲमेझॉन आणि वाद हे काही नवीन नाही. मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) त्याच्या अॅपचा लोगो मध्ये बदल केला आहे. या अॅमेझॉन अॅपच्या लोगोची तुलना ही हिटलरच्या चेहऱ्याशी झाली. याबद्दल ॲमेझॉनला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. अॅमेझॉन अॅपच्या नव्या लोगोवर सर्व जगभरातील युजर्सकडून जबरदस्त टीका होऊ लागली. त्यांच्या नव्या लोगोमध्ये ब्राऊन रंगाचा एक बॉक्स होता. पॅकिंग बॉक्स मध्ये असलेल्या या चौकोनाच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाची खूण होती. ही निळी खूण म्हणजे सेलोटेपचं चिन्हं होतं. तर मध्यभागी अॅमेझॉनचा सिग्नेचर अॅरो होता. त्यात ब्ल्यू स्ट्रीप म्हणजे जर्मनीतील हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरच्या ‘आयकॉनिक’ मिशीसारखी वाटत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निळ्या पट्टीलं भाग बदलून नव्या स्वरुपात लोगो सादर करण्यात आला आहे.