Flipkart
Flipkart
Reading Time: 2 minutes

Success Story of Flipkart

फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात प्रसिध्द ईकॉमर्स वेबसाइट्स आहे. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी सुरू केलेली फ्लिपकार्ट हे भारतीय स्टार्टअप्सच्या यशाचे उत्तम उदाहरण आहे. 2007 मध्ये बेंगळुरूमधील दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमधून ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून सुरू झालेली ही कंपनी आज भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. फ्लिपकार्टने देशात ऑनलाईन खरेदी विक्रीची पाळेमुळे रोवली.   2007 मध्ये देशात ऑनलाइन व्यवसाय लोकप्रिय नसताना सचिन बन्सल यांनी ही कंपनी सुरू करून धोका पत्करला. भारतीय ग्राहकांना फ्लिपकार्टने ऑनलाईन खरोदी विक्रीची सवय लावली आहे. फ्लिपकार्टच्या यशानंतर मिंत्रा, नायका, मीशो या ई कॉमर्स वेबसाईट्चा उदय झाला. आजच्या लेखात आपण फ्लिपकार्टची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

अभियंते असलेल्या सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी सुमारे पंधरा वर्षापूर्वी फ्लिपकार्ट कंपनी सुरू केली.  चंदीगढच्या सचिन बन्सल यांनी 2003 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून संगणक विज्ञान अभियंता  पदवी प्राप्त केली. त्यांना लहानपाणापासूनच गेम खेळायची प्रचंड आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टेकस्पॅनसाठी काम करण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये, ते Amazon.com मध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून रुजू झाले. सचिन 2005 मध्ये बिन्नी बन्सलला भेटला. बिन्नीने सचिनसोबत अॅमेझॉनमध्ये एकत्र काम केले.

अशी झाली फ्लिपकार्टची सुरूवात
सचिन आणि बिन्नीने त्यांनी Amazon मधील नोकरी सोडली, 4 लाख रुपये जमा केले आणि ऑक्टोबर 2007 मध्ये Flipkart लाँच केले. सुरुवातीला त्यांनी या प्लॅटफॉर्मवर फक्त पुस्तके विकली. इतर गोष्टींपेक्षा पुस्तकांची ऑनलाईन खरेदी विक्री करणे तुलनेने सोपे असल्याने त्यांनी हा पर्याय निवडला. सुरूवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे असले तरीही त्यांनी पहिल्या वर्षात 20 ऑर्डर्स मिळवल्या. 2008 मध्ये, ते कोरमंगला येथील 2BHK अपार्टमेंटमध्ये आपले बस्तान हलवले. 2009 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस फ्लिपकार्टने 40 दशलक्ष रुपयांची पुस्तके विकली. 2009 मध्ये, फ्लिपकार्टला Accel कडून $1 दशलक्षची भांडवल गुंतवणूक मिळाली. 2009 च्या अखेरीस फ्लिपकार्टने 150 कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले. बंगळुरूच्या केंद्राव्यतिरिक्त मुंबई आणि दिल्ली येथे कार्यालये सुरू केली.

कॅश ऑन डिलीव्हरी
सुरुवातीला त्यांनी अनेक पुस्तकांची विक्री केली. मात्र, तरीही ग्राहक त्यांची उत्पादने न घेता पैसे द्यायला तयार नव्हते. म्हणून, त्यांनी ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट पर्याय सादर केला. फ्लिपकार्ट हा आपल्या ग्राहकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय देणाऱ्या पहिल्या स्टार्टअपपैकी एक होता. ग्राहकांना हे वैशिष्ट्य आवडले आणि कंपनी अधिक लोकप्रिय झाली. नंतर त्यांनी रिटर्न पॉलिसी म्हणजेच नको असलेल्या वस्तू परत करण्याची सुविधा दिली.  यामुळे फ्लिपकार्टची विक्री आणखी वेगाने वाढू लागली.

महसूलात झाली वाढ
2009 मधील महसूल 40 दशलक्ष रुपयांवरून, फ्लिपकार्टने 2011 च्या अखेरीस 750 दशलक्ष रुपयांपर्यंत महसूल वाढवला. त्यानंतर 2014 मध्ये, त्यांनी Myntra ही ऑनलाइन शॉपिंग कंपनी 2000 कोटी रुपयांना विकत घेतली. 2018 मध्ये, वॉलमार्टने 77% स्टेकसह Flipkart $16 बिलियनमध्ये विकत घेतले.

फ्लिपकार्टने देशात ऑनलाईन खरेदी विक्रींच्या व्यवहारात क्रांती आणली. आज कोणतीही गोष्ट घ्यायची असल्यास आपण फ्लिपकार्टवरूनच घेतो. हेच या भारतीय स्टार्टअपचे यश आहे. आज अनेक उद्योजक स्वत:चे उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहेत. त्यांच्यासाठी फ्लिपकार्ट हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…