Investing in Cryptocurrencies
मागच्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी हे नाव सातत्याने कानावर पडत असेल. त्याला कारणंही तसंच आहे. गुंतवणूकदारांना चांगला नफा क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत झालेला आहे. नुकसानही तितक्याच प्रमाणात झालेले आहे याचीही कित्येक उदाहरणे आहेत. क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीला ना सरकारचा निर्बंध आहे ना कसल्याच गोष्टीचा. एका दिवसात १००० टक्के रिटर्न क्रिप्टो मधून लोकांना मिळाले आहेत. क्रिप्टोकरन्सीमधील फायदे आणि तोटे हे दोन्हीं जरी काहीतरी भयानक आहेत. मात्र क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक करण्याचा आलेख मात्र वाढतच आहे. आपल्यातील कित्येक जण हे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. मात्र जास्त माहिती नसल्यामुळे आपण गुंतवणूक टाळतो. काही गोष्टींकडे गुंतवणूक करताना बारीक लक्ष दिल्यास क्रिप्टोमध्ये आपल्याला निश्चितच चांगला नफा मिळू शकतो.
हेही वाचा – Cryptocurrencies : ‘क्रिप्टोकरन्सी’ गुंतवणुकीची एक नवी संधी
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
अफवा, बातमी आल्यानंतर एकाच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे
- क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना बरेच नवीन गुंतवणूकदार (ट्रेडर्स) हे एखादी बातमी एकूण बऱ्याचदा गुंतवणूक करतात. आपली सगळी गुंतवणूक जर एकाच करन्सीमध्ये केल्यास आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. कोणत्याही क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीला त्याच्याबद्दल माहिती घ्या. माहिती न घेता अफवा, बातमीला बळी पडल्यास तोटाच होणार हे निश्चित आहे.
- बाजारात अनेक क्रिप्टो करन्सी अशा आहेत ज्या एका एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रिटर्न्स देतात. मात्र, जास्त काळासाठी हे सर्व टिकत नाही आणि आपल्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे. याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास DOGE कॉईन हे सर्वोत्तम उदाहरण आहे. टेस्लाचे अध्यक्ष एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्विटनंतर एकाच दिवसात DOGE कॉईन दुपटीने वाढला. मात्र काही आठवड्यांतच त्याच्या मूळ किंमतीला येऊन थांबला. अचानक वाढलेल्या करन्सीमध्ये गुंतवणूक करताना एकदा नाही तर दोनदा विचार करूनच गुंतवणूक करावी.
हेही वाचा – CBDC: सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सीच्या निर्मितीसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी
नवीन आलेल्या किंवा बनवलेल्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक टाळणे
नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी Squid Game नावाची एक वेब सिरीज खूप लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेचा फायदा घेत कोणीतरी Squid COIN या करन्सीची निर्मिती केली. नेटफ्लिक्समुळे असणारी लोकप्रियता कामी आली आणि काही दिवसांतच Squid COIN मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आला. या क्रिप्टोमध्ये अत्यंत कमी दिवसांमध्ये सुमारे $3.4 दशलक्ष गुंतवणूक झाली. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये ही करन्सी घोटाळ्यांच्या यादीत समाविष्ट झाली. क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत नवीन म्हणजेच ज्यांना जास्त अनुभव नाही असे गुंतवणूकदार अशा घोटाळ्यांमध्ये फसतात असं दिसून आलं आहे. नवीन आलेल्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना कंपनीची पूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.
स्वस्त असणाऱ्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक टाळणे
काही क्रिप्टो करन्सी अत्यंत कमी पैशांमध्ये म्हणजे ०.००१२, ०.००००३४ अशा पैशांमध्ये मिळतात. या करन्सी इतक्या स्वस्त आहेत की हजार रुपयांमध्ये लाखो कॉईन्स मिळतात. स्वस्त आहे म्हणून जर आपण लाख कॉईन्स घेण्याचा विचार करत असल्यास हे अत्यंत चुकीचे आहे. काही कॉईन्स स्वस्त जरी असले तरी ते गुंतवणुकीसाठी धोकादायक असतात. जर समजा एखादी करन्सी महाग आहे तरी आपण ती घेऊ शकतो. कारण महाग करन्सी निश्चितपणे आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात. मात्र, हेच आपण स्वस्त क्रिप्टो करन्सीबाबत बघितले तर आपल्याला जास्तीत जास्त नुकसानाचीच शक्यता आहे. यामुळेच जेव्हा आपण गुंतवणुकीचा निर्णय घेतो तेव्हा करन्सीच्या किंमतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Cryptocurrency : ‘अशी’ असेल क्रिप्टोकरन्सीवरील कर आकारणी
एकतर्फी मतांद्वारे( सोशल मीडिया, बातम्या, फेमस समूहाकडे) प्रभावित होऊन गुंतवणूक करणे
आपल्यातील बरेच जण क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, आपण गुंतवणूक करताना कोणाचे तरी ऐकतो. काही वेळेस युट्युब किंवा इतर काही प्लॅटफॉर्मवर फेमस असणाऱ्यांना लोकांना फॉलो करतो. कोणी सांगितले म्हणून गुंतवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. असं केल्यास आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत असताना आपण जास्तीत जास्त माहिती गोळा करून गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरते.