cryptocurrency
Cryptocurrency. Torn pieces of paper with the word Cryptocurrency. Black and white. Close up.
Reading Time: 3 minutes

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी –   जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी 

  • क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दीर्घकाळ चालणारी अनिश्चितता 2022 च्या बजेटमध्ये दूर करण्यात आली आहे आणि क्रिप्टोकरन्सी संदर्भातील कर आकारणीच्या पैलूंवर अत्यंत आवश्यक असलेली नियामक स्पष्टता प्रदान केली आहे. त्याचा थोडक्यात आढावा आपण या लेखात घेऊ. 
  • अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी डिजिटल रुपयाची घोषणा केली आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचा बिटकॉइनसमान ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित स्वत: ची डिजिटल करन्सी काढण्याचा निर्णय आणि नंतर अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कररचना हेच सुचवते की, भारतात आता क्रिप्टो करन्सीवर पूर्णत: बंदी नसेल.
  • क्रिप्टो व्यवहार दोन प्रकारांत विभागले जातात. 
    • एक म्हणजे चलन आणि दुसरे म्हणजे मालमत्ता. 
  • अमेरिकी डॉलर किंवा पौंड हे चलनाचे प्रकार झाले, तर समभाग, जमीन हे सगळे मालमत्तेचे प्रकार झाले. भारतात क्रिप्टोला चलन म्हणून मान्यता नसेल, पण एक मालमत्ता म्हणून आता त्याचा वापर अधिक सुलभ होऊ शकेल. 

करआकारणी अशाप्रकारे होणार आहे 

  • डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो) व्यवहारांवर मिळवलेल्या नफ्यावर संपादनाच्या खर्चाव्यतिरिक्त कोणत्याही खर्चाची वजावट न करता नफ्यावर 30% सरळपणे कर आकारला जाईल.
  • सोप्या शब्दात, तुम्ही नफ्यावर कोणत्याही प्रकारच्या कपातीचा दावा करू शकत नाही. तुम्ही फक्त मूळ रक्कम वजा करू शकता. क्रिप्टोच्या मालकीवर कोणताही कर नसणार आहे. एकदा तुम्ही नफ्यासाठी क्रिप्टो विकल्यानंतर तुम्हाला सरकारला कर भरावा लागेल.

हेही वाचा – Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग १…

उदाहरण  – समजा तुम्ही WazirX वर ₹1000 ला बिटकॉइन खरेदी करता आणि नंतर ₹1500 ला विकता, तर 

  करपात्र लाभ = ₹1500 – ₹1000 = ₹500 इतका आणि 

कराची रक्कम = ₹500 X  30% = ₹150 असणार आहे. 

  • कोणताही तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेला जाऊ शकत नाही किंवा तो क्रिप्टो नफ्याशिवाय इतर कोणत्याही उत्पन्नासह सेट ऑफ केला जाऊ शकत नाही. 
  • डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो ट्रेडिंग) विकण्यात होणारा कोणताही तोटा केवळ व्हर्चुअल डिजिटल मालमत्तांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यासहच सेट केला जाऊ शकतो.
  • याचा अर्थ तुमची डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो) विकण्यात तुम्हाला काही नुकसान होत असल्यास, तुम्ही इतर कोणत्याही व्यवसायाच्या नफ्याद्वारे ते सेट ऑफ करू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या क्रिप्टो नफ्याने ते सेट ऑफ करू शकता.
  • सोप्या शब्दात, तुम्ही एक व्यापारी आहात आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात 40% नफा झाला आहे, परंतु तुम्ही तुमचे 30% पैसे क्रिप्टोमध्ये गमावले आहेत. आता, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नफ्याने क्रिप्टो तोटा सेट करू शकत नाही, क्रिप्टो तोटा फक्त क्रिप्टो नफ्यावरच सेट केला जाऊ शकतो.

उदाहरण  –  जर तुम्ही ₹1000 ची गुंतवणूक करून त्यात नफा मिळून त्या रकमेचे ₹1500 झाले.

तर तुमची करपात्र रक्कम ₹500 आहे.

आणि त्याचवेळी दुसऱ्या क्रिप्टो व्यवहारात जर तुम्ही ₹1000 ची गुंतवणूक केली आणि ₹200 च्या तोट्यामुळे त्या रकमेचे ₹800 झाले तर क्रिप्टोची तुमची एकूण करपात्र रक्कम (500-200) = ₹300 असेल.

त्यामुळे त्या विशिष्ट वर्षासाठी 30% प्रमाणे तुमचा कर,₹300 x 30% =  ₹90 इतका असेल. 

हेही वाचा –  Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग २…

 

  • ह्या स्पष्टतेमुळे क्रिप्टो व्यवहारांच्या करदेयतेच्या बाबतीत खूप स्पष्टता आली आहे. .
  • समजा तुम्हाला क्रिप्टो, भेटवस्तू किंवा एअरड्रॉप यापैकी कुठल्याही स्वरूपात मिळाला असला तरीही,  प्राप्तिकर स्लॅब दरांनुसार इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाप्रमाणेच तो करपात्र असेल. 
  • क्रिप्टो ज्याच्या नावावर भेटवस्तूच्या स्वरूपात मिळेल त्या व्यक्तीला कर भरावा लागणारी आहे कारण कायद्यानुसार, भेटवस्तू घेणारा कर भरतो. हे ‘कौन बनेगा करोडपती’  सारख्या बक्षिसे जिंकून देणार्‍या मोठ्या टीव्ही शोसारखे आहे. आपल्याला वाटतं जिंकणाऱ्याला चांगली मोठी रक्कम बक्षिस मिळाली पण खरं तर तो विजेता स्वतः जवळपास त्या बक्षिसाच्या रकमेच्या 30% कर भरतो. 
  • तुमचं रक्ताचं नातं नसलेल्या नातेवाईकांना तुम्ही क्रिप्टो भेटवस्तू स्वरूपात देत असाल किंवा एखादी क्रिप्टो रक्कम जी ₹50,000/- पेक्षा जास्त असेल तरच ही रक्कम करपात्र असणार आहे. 

उदाहरण  –  

  1. रक्ताच्या नातेवाईकांना – समजा ‘अ’ व्यक्ती ‘ब’ या तिच्या रक्ताच्या नातेवाईकाला ₹60,000/-  किमतीचा बिटकॉइन भेटवस्तू म्हणून देत असेल तर त्यावर – कोणताही कर नाही

      2)   मित्रांना – समजा ‘अ’ व्यक्ती ‘क’ या तिच्या मित्राला ₹40,000/-  किमतीचा बिटकॉइन भेटवस्तू 

             म्हणून देत असेल तर त्यावर – कोणताही कर नाही, कारण रक्कम ₹50,000/-  पेक्षा जास्त नाहीये. 

  • जेव्हा तुम्ही क्रिप्टो खरेदी/विक्री करता तेव्हा एक्सचेंजेसला तुम्ही खरेदी केलेल्या सर्व क्रिप्टोचा सर्व डेटा गोळा करावा लागतो, त्यामुळे आता तुम्हाला एक्सचेंज फी (उदाहर्णार्थ – वझीरएक्सवर 0.2%) आणि 1% टीडीएस भरावा लागेल.

परिणाम 

  • क्रिप्टो व्यवहारांवर आकारलेला 30% प्राप्तीकर हा जास्त आहे. कदाचित या जास्त कर दरामुळे भारतात वाढणारे क्रिप्टोद्वारे होणारे मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा अशा बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसू शकेल. 
  • 30% हा प्राप्तिकर दर ट्रेडर्सना इतर देशांतील क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर जाण्यास प्रवृत्त करू शकतो, ज्यामुळे भारत सरकारचा महसूल कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 
  • केवळ बिटकॉइन किंवा इतर कोणत्याही डिसेंट्रलाईज्ड करन्सीचा ‘चलन’ म्हणून वापर करता येणार नाही, पण त्याची खरेदी, विक्री किंवा हस्तांतरणाचे व्यवहार करून जर पैसे कमावले तर त्यावर ३० टक्के कर भरावा लागेल. 

हेही वाचा – बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकले त्यांच्यासाठीच ! …

 

सारांश – 

क्रिप्टोव्यवहार आणि अर्थसंकल्पात सादर झालेल्या क्रिप्टोवरच्या करांबाबत जनमानसांत वेगवेगळी मते आहेत. येत्या काळात सरकार देशात क्रिप्टोकरन्सी आणि व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स रेग्लेयुट करण्यासाठी ‘क्रिप्टो बिल’ असे बिल आणायचा विचार करत आहे. यातून काय बरं-वाईट निष्पन्न होणार हे येणारा काळच ठरवू शकतो. 

सर्वसामान्यांनी मात्र क्रिप्टो व्यवहारांपासून लांबच असलेले बरे असे टीम अर्थसाक्षरचे मत आहे.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…