Education Loan
Education Loan
Reading Time: 2 minutes

परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या 

Education Loan 

  • रोजच्या वाढत चाललेल्या महागाईसोबतच शिक्षण देखील महागडं होत चाललं आहे. शिक्षणाचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. 
  • उच्च शिक्षण घेणं ही खरंतर एक खूप मोठी गुंतवणूक आहे. पण दुर्दैवाने ती महाग देखील आहे. त्यातून सध्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. 
  • पंजाब आणि गुजरातमधील बरचसे विद्यार्थी हे परदेशात शिकण्यासाठी जातात पण महाराष्ट्रात हे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून येते. कारण परदेशातील शिक्षणाचा व राहणीमानाचा खर्च मोठा असतो.
  • सध्या अनेक नामवंत वित्तसंस्था आणि बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध असल्याने पालकांची चिंता कमी झाली आहे. कर्जामुळे कौटुंबिक बचतीवरील ताण कमी होतो. तसेच, शैक्षणिक जीवन आणि आर्थिक भविष्य सुकर करण्यासाठी शैक्षणिक कर्ज हे फार महत्त्वाचे साधन ठरते. 

हेही वाचा – Key Ratios Of Banking Finance Sector : काय आहेत बँकिंग फायनान्स क्षेत्राची गुणोत्तरे ?

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कर्ज

 

  • भारतातील अनेक नामवंत बँकांकडून शैक्षणिक कर्जाची उपलब्धता असल्याने आता मध्यमवर्गीय घरातील मुलांना देखील परदेशातील शिक्षण घेणं शक्य झालं आहे. 
  • भारतीय बँका भारतातील शिक्षण घेण्यासाठी रु. १० लाखांपर्यंत तर आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्यासाठी रु. २०  लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देतं. 
  • यामध्ये संपूर्ण शिक्षणाची फी, रोजच्या राहणीमानासाठी लागणारा खर्च आणि बाकी इतर छोटे मोठे खर्च या सर्वांचा समावेश असतो. 

शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी हे आपण या लेखात बघुया.

 

१. शिक्षणाच्या एकूण खर्चाची तुलना करा – 

  • कर्ज घेण्याआधी परदेशातील संपूर्ण खर्चाच योग्य ते नियोजन करायला हवं. शैक्षणिक शुल्काबरोबरच,  विद्यार्थ्याच्या राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च व इतर छोटे मोठे खर्च या सर्वाचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. अनेक शिक्षण संस्था आहेत ज्या नेहेमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच अनेक इतरही कोर्सेस ऑफर करतात. त्यातील शिक्षण खर्चामध्ये आणि रोजच्या राहण्या-खाण्याच्या खर्चामध्ये असणारा फरक लक्षात घ्यावा.

 

२. सर्व शक्य असणाऱ्या शिष्यवृत्ती संधींचा पुरेपूर वापर करा – 

  • शिष्यवृत्ती हा परदेशातील एकूण खर्च कमी करण्याचा हा एक सर्वात फायदेशीर मार्ग आहे. विविध  खाजगी, तसेच सरकारी संस्था शिष्यवृत्तींच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतात. 
  • यामुळे तुमचा रोजच्या राहणीमानाचा किंवा इतर छोटे मोठे खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. 
  • शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही नेहमी सतर्क राहण्याची फार आवश्यकता असते. बहुतेक योजनांची जाहिरात ही केली जात नाही, परिणामी या शिष्यवृत्ती योजना आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या शक्यता कमी असते. त्यांचा शोध घेणं व सतत अपडेट राहणं इथे महत्त्वाचं ठरतं.

 

३. तुमच्या कर्जासाठी योग्य ती बँक निवडणे –

  • बहुतेक बॅँका व वित्तीय संस्था या विद्यार्थ्यांच्या पात्रतेवर कर्ज द्यायचं की नाही हे ठरवतात. विद्यार्थ्याची प्रीमियर म्हणजे नावाजलेल्या युनिव्हर्सिटीत निवड झाली तरच ते कर्ज मंजूर करतात.
  • कर्ज घेण्यापूर्वी अर्जदाराने ज्या कोर्ससाठी किंवा ज्या कॉलेज साठी कर्ज मागितले आहे ते खरंच बँकेच्या नियमानुसार निधी मिळण्यास पात्र आहेत की नाही हे तपासून घेणे आवश्यक आहे. 

 

४.कर्जाच्या अटी – 

एकदा पात्रता तपासून झाली की अर्जदाराने पुढील गोष्टी तपासून घेण्याची आवश्यकता आहे :-

  • उपलब्ध कर्जाच्या रकमेचे प्रमाण, 
  • लागू व्याजदर, 
  • ईएमआय चालू करण्यापुर्वीचा स्थगिती कालावधी, 
  • कर्जाचा एकूण कालावधी किती आहे, 
  • सह-पेमेंट (co-payment) चा पर्याय उपलब्ध आहे का, 
  • मार्जिन ची आवश्यकता आणि त्याची पात्रता, मार्जिन म्हणजे कर्ज एकूण फी पैकी विद्यार्थी स्वतः भरणारी रक्कम.  

 

५. कर्जाची सेवा सुलभता –

  • अर्जदाराने कर्जाच्या सेवा सुलभतेचा विचार केला पाहिजे. कर्ज देणाऱ्या शाखेमध्ये डिजिटल माध्यमाची उपलब्धता आहे का किंवा प्रत्यक्ष शाखेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे का हे देखील  तपासणं तितकच महत्त्वाचे आहे. 

 

हेही वाचा – Loan Frauds : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स

अशाप्रकारे तुमचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतांना काळजी घ्या ! तुमच्या परदेशी शिक्षणासाठी व यशस्वी करिअर साठी अर्थसाक्षर टिमतर्फे खूप खूप शुभेच्छा !

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…