Reading Time: 2 minutes

Car Insurance – “नो-क्लेम बोनस” बद्दलच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 

        

 • कार विमा घेणे ही प्रत्येक कार मालकासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. कार विम्यामध्ये पॉलिसीधारक प्रीमियम रक्कम भरतो आणि त्या बदल्यात कोणताही अपघात झाल्यास, उद्भवणारा सर्व खर्च विमा कंपनी उचलते. पॉलिसीधारकाने यासाठी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार आर्थिक मदत मिळविण्यासाठी दावा करणे आवश्यक आहे. (Car Insurance)
 • कार विमा कंपन्या “नो-क्लेम बोनस” नावाचा एक प्रस्तावही देतात. यामध्ये पॉलिसीधारकांना मागील वर्षांत त्यांनी विम्याचा दावा केला नाही म्हणून नो क्लेम बोनस या नावाने काही फायदा दिला जातो. आपल्या विमा प्रीमियमवर २०% ते ते ५० % पर्यंत सूट पॉलिसीधारक मिळवू शकतो. 
 • लक्षात ठेवा, प्रथमच कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांची पहिली मोटार विमा पॉलिसी खरेदी करणार्‍या व्यक्तींना कोणत्याही नो क्लेम बोनस सवलत मिळत नाही याचे कारण म्हणजे ते पहिल्यादांच विमा उतरवत असतात. (No claim bonus marathi)
 • पॉलिसीधारकांना वाहन विम्याची माहिती जरी असली तरी ते नो क्लेम बोनसबद्दल दुर्लक्ष करतात. या लेखाद्वारे आपण “नो क्लेम बोनस”चा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यावा हे समजावून सांगणार आहोत. 

 

1. नो क्लेम बोनस रक्कम –

 • मोटार विमा कंपन्या २०% ते ५०% च्या दराने नो क्लेम बोनस तुम्हाला देऊ शकतात. पॉलिसीधारकाने कोणत्याही वर्षात विम्याचा नुकसान भरपाईचा दावा केल्यास, पुढच्या विमा नूतनीकरणाच्या वेळेस तो नो क्लेम बोनसचा लाभ मिळवू शकत नाही. 
 • पॉलिसीधारकाने त्याच्या पॉलिसीच्या पहिल्या वर्षात कोणताही दावा केला नाही तर त्याला २० टक्के बोनस रक्कम दिली जाते. पॉलिसीधारकाने सलग दोन वर्षे कोणताही दावा न केल्यास नो क्लेम बोनस २५ टक्के वाढवला जातो.
 • त्याचप्रमाणे सलग तीन क्लेम-मुक्त वर्षानंतर पॉलिसीधारकाला ३५ टक्के बोनस दिला जातो आणि सलग चार क्लेम-मुक्त वर्षांसाठी पॉलिसीधारकाला ४५ टक्के बोनस मिळतो. सलग पाच क्लेम-मुक्त वर्षे झाल्यास त्याला ५० टक्के बोनस रकमेसह दिला जातो. 
 • कृपया लक्षात ठेवा, वरील आकडेवारी प्रत्येक विमा कंपनीच्या पॉलिसीनुसार बदलते. 

 

नक्की वाचा – टर्म इंश्युरन्स खरेदी करण्यापूर्वी ही काळजी घ्या !

 

2. छोट्या दाव्याच्या रकमा साठी विमा क्लेम दाखल करू नका –

 • विमा कंपनीकडून कोणताही दावा करण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी दाव्याच्या रकमेचा विचार करावा.
 • त्यांनी या क्लेम रकमेची तुलना त्यांना मिळणार्‍या बोनसच्या रकमेशी करावी. यात उदाहरणादाखल असे सांगता येईल की ३००० रुपयांच्या दाव्याचा लाभ घेण्यापेक्षा ५००० रुपयांची बोनस रक्कम मिळवणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकांनी ३००० रुपयांची दाव्याची रक्कम त्यांच्या स्वत:च्या खिशातून भरावी आणि कंपनीकडून बोनसची रक्कम मिळवावी. ही रक्कम दाव्याच्या रकमेपेक्षा मोठी आहे.

 

3. विमा कंपनी बदलल्यावरसुद्धा नो क्लेम बोनस लागू होतो –

 • एक विमा कंपनीकडून दुसर्‍या विमा कंपनीकडे जाण्याच्या बाबतीतही नो क्लेम बोनस ऑफर केला जातो. 
 • एखाद्या पॉलिसीधारकाने टाटा एआयजी कडून पहिली दोन वर्षे मोटार विमा घेतला असेल आणि नंतर तिसऱ्या वर्षी आयसीआयसीआयमध्ये स्विच केला असेल आणि या कालावधीत त्याने कोणताही दावा केला नसेल, तर तो आयसीआयसीआयकडून २५ टक्के नो क्लेम बोनस प्राप्त करण्यास पात्र आहे. 

नक्की वाचा ! – वय वर्षे ३०च्या आत माहिती हव्यातच अशा महत्वपूर्ण आर्थिक बाबी 

 

4. मोटर विमा पॉलिसीधारकांसाठी लागू आहे, त्यांच्या कारसाठी नाही –

 • पॉलिसीधारकांना नो क्लेम बोनस दिला जातो. 
 • जर पॉलिसीधारकाने तीन वर्षांनंतर आपली कार विकली आणि नवीन कार खरेदी केली आणि या पूर्वीच्या कालावधीत त्याने कोणताही दावा केला नसेल, तर त्याच्या नवीन कारसाठी घेतलेल्या नवीन विमा पॉलिसीवर त्याचा पूर्वीचा नो क्लेम बोनस लागू होईल.

 

5. थर्ड-पार्टी इन्शुरन्स कव्हरेजसाठी नो क्लेम बोनस नाही – 

 • नो क्लेम बोनस हा थर्ड-पार्टी कार इन्शुरन्सवर उपलब्ध नाही आणि ही सवलत केवळ स्वतःच्या नुकसानीच्या प्रीमियम घटकासाठी लागू आहे. 
 • ज्या पॉलिसीधारकांनी फक्त थर्ड-पार्टी कार विमा घेतला आहे ते नो क्लेम बोनसमध्ये लाभ घेऊ शकत नाहीत.

पुढच्या वेळेस कार विमा हप्ता भरताना नो क्लेम बोनस चा फायदा किती मिळतो हे तपासायला विसरू नका.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…