Reading Time: 3 minutes

नाही मी गणितात चुकलो नाहीये आणि व्याकरणात तर मुळीच नाही. हे शीर्षक दिलंय ते अगदी विचार करून दिलंय. टाटा या नावाची भारतात च काय तर जगात ही कुणाला ओळख करून द्यायची गरज नाही. एक अतिशय धडाडी चे, धाडसी, प्रयोगशील असे व्यावसायिक आणि उद्योजक अशा घराण्यातून आलेली आणि तसच काहीसं आयुष्य स्वतः जगलेली अशी व्यक्ती. तस सोशल मीडिया वरती हे वाक्य त्यांनी म्हणलेलं आहे असं कायम वाचण्यात येत की अंबानी हे व्यावसायिक आहेत आणि मी एक उद्योजक. हे खरं असेल तरी देखील व्यवसायाच्या गणितांच भान राखल्या खेरीज कोणीच उद्योजक बनू शकत नाही म्हणून त्यांना व्यावसायिक म्हणावं च लागेल.

हेही वाचा – गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

           पण प्रत्येक उद्योजकाच्या वाट्याला येतो किंवा प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतो असा एक बॅड पॅच किंवा stagnation चा काळ. जिथे एक तर काहीतरी प्रतिकूल घडत राहत किंवा फार मनासारख घडत नाही आणि आपण कसेबसे तग धरून राहतो असा काळ येतो च. तो काळ २०१० ते २०२० हे दशक टाटांसाठी असावं असं वाटत. त्यातील २०१० ते २०१२ हे त्यांच्या नंतर भल्या मोठ्या टाटा ग्रुप चा वारस कोण असणार हे ठरवण्यात गेला . २०१२ ला सायरस मिस्त्री जे त्यांच्या शेअर होल्डर ग्रुप पैकी आणि त्यांचे जुने संबंध असलेल्या शापुरजी पालन जी ग्रुप मध्ये मुख्य अधिकारी होते त्यांची निवड झाली. आल्यापासून त्यांचं आणि टाटा संचालक मंडळाच किंवा स्वतः टाटांच फार काही सूत जुळेना. २०१६ मध्ये त्यांना शाल श्रीफळ देऊन रजा देण्यात आली. तेव्हापासून आजतागायत पालन ग्रुप सोबत त्यांच भांड्याला भांड रोज लागतंय आणि सुप्रीम कोर्ट ते शांत करतय, शिवाय ते ब्रेक्झिट असेल किंवा एकंदर ऑटो इंडस्ट्री गार पडलेली आणि राजकीय उलथापालथ ही बरीच झालेली त्यामुळे त्यांनी घेतली jaguaar किंवा इथली टाटा नॅनो त्यांना तोट्यात च ढकलत होती. जिओ ने पाय रोवले त्यामुळे टाटा indicom किंवा डोकोमो ने काढता पाय घ्यायला सूरु केला होता. अस एकंदरीत घर फिरलं म्हणून घराचे वासे ही फिरत होते. TCS नावाची एकमेव दुभती गाय तेव्हा ही होती आणि आज ही आहे. जी टाटांच अक्ख गोकुळ दही दुधाने भरलेलं ठेवते.

हेही वाचा – प्रत्येक गुंतवणूकदाराला जोखमीबद्दल काय माहित असायला हवे?

         २०१६ नंतर त्यांच्याच ग्रुप मधला एक चंद्रशेखर नावाचा असाच एक महत्वाकांक्षी आणि अनेक वर्षे ग्रुप मध्ये काम करणारा व्यक्ती त्यांना मिळाला खरा आणि त्यांनी देखील हळू हळू रचनात्मक बदल सुरू केले देखील असावेत पण २०१६ ला नोटांबंदी मग Gst मग यातून वर येतो न येतो तोच कोविड अशा गोष्टींनी सगळ्या बाजाराची क्रयशक्ती खाल्ली होती. पण याच काळात विशेषतः कोविड नंतर PLI स्कीम, किंवा स्टार्ट अप मध्ये आलेली गुंतवणूक आणि ५जी सेवा आणि चायना ना पर्याय अशी भारताची  वाढत चाललेली ओळख याचा अनेक उद्योजकांनी अक्षरशः फायदा घेतला अर्थात चांगल्या अर्थांने. या सगळ्यात टाटांचे मार्गदर्शन आणि शेखर यांची धाडसी निर्णय क्षमता यामुळे एका मागोमाग अनेक सकारात्मक बदल टाटा ग्रुप मध्ये दिसायला लागले. तसे अनेक बदल असतील पण ज्या बातम्या मी स्वतः फॉलो केल्या त्याचा उल्लेख करतोय.

हेही वाचा – Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी फॉलो करा 

        १. सगळ्यात मोठा आणि कठीण मैलाचा दगड म्हणजे एयर इंडिया नावाचा अजस्त्र हत्ती जो आधीच पालन पोषणातल्या ढिसाळपणा मुळे बोजड झाला होता तो आपल्या कंपूत परत आणून बांधला. नुसता बांधला नाही तर त्याला परत व्यवस्थित देखभालीत आणून परत ऐरावत बनवायचे प्रयत्न ही सुरू केले. कदाचित या कंपनि ला टाटा सोडून आणखी कोणी सांभाळू शकणार नाही हे सरकारला ही माहीत असावं म्हणून त्यांना खरेदी करता येईल अशीच सोय त्यांनी करून दिली असावी असा माझा अंदाज. ही टाटांची आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक ठरली जी यशस्वी की नाही ते काळ ठरवेल.

       २. टाटा पावर मध्ये भयंकर गुंतवणूक आणि काळा ची पावलं म्हणजे इलेक्ट्रिक वेहीकल वगरे ओळखून त्याला परत चांगले दिवस आणले.

       ३. टाटा मोटर्स – आणि टाटा बॅटरी इलेक्ट्रिक मोटर मध्ये टाटा नि सगळ्यात जास्त संशोधन करून आणि प्रचंड परदेशी गुंतवणूक आणून फर्स्ट मोवर फायदा घेतला.

       ४. टाटा ग्लोबल बिव्हरेज कंपनी याच नाव बदलून टाटा कंसुमर प्रॉडक्ट्स केलं. आणि सगळे खायचे पदार्थ आणि पॅकेट फूड एकत्र केले.

      ५. टाटा इलेक्सि या कंपनी मार्फत गाड्या आणि इतर तंत्रज्ञान चे design वगरे पुढे केले गेले.

हेही वाचा – 15 बिझनेस आयडिया ज्या कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देतील !

ही फक्त ५ मोठी उदाहरण यात दिली आहेत. असे अनेक छोट्या मोठ्या पातळी वर निर्णय घेतले गेले ज्याचे फळ आता हळु हळु दिसायला सुरुवात झाली आहे.

त्याशिवाय नवीन क्षेत्रात पाय रोवण्यासाठी किंवा रोवलेले पाय पसरण्याची अनेक कंपनी मध्ये गुंतवणूक किंवा खरेदी केली गेली. ज्या आपण कधी विकल्या जातील असा विचार ही केला नसेल.

दोन मोठी नाव म्हणजे बिग बास्केट आणि बिसलेरी. छोट्या मोठ्या अनेक म्हणजे टिंप्लेट, तेजस नेटवर्क किंवा soulful वगरे आहेतच. जितके प्रतिकूल वर्ष टाटा ग्रूप ने गेले दशक पाहिले सध्या तितकेच त्याची सगळी बोट तुपात आहेत. म्हणून टाटांचे ४० वाढदिवस असा म्हणालो कारण त्यांची बाळ जी टाटा नावाने लिस्ट आहेत ती सगळी वाढत आहेत..!!

 या प्रयोगशील माणसाला आणि हजारो पोट भरणाऱ्या त्याच्या सगळ्या कंपन्याना देव आणि ग्राहक देवता दीर्घायुष्य देवो इतकीच प्रार्थना…!!

©प्रसन्न कुलकर्णी

९०२८३६०८९२

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !