Reading Time: 3 minutes

सामान्यपणे एखादा व्यक्ती वयाच्या २४ वर्षापर्यंत नोकरीला लागतो. सुरुवातीला पहिल्या पगारातून आई वडिलांना भेटवस्तू आणि स्वतःच्या मनासारखी खरेदी करतो. भविष्याचा विचार करून पैसे कमवायला सुरुवात केली की बचत करून गुंतवणुकीला सुरुवात करता येते. 

 

वयाचे ३० वर्ष पूर्ण होईपर्यंत खालील आर्थिक बाबींबद्दल माहिती असायला हवी. 

 

  1. चक्रवाढ व्याजाबद्दल माहिती घेणे Compound interest  – 
  • चक्रवाढ व्याज हा जगातील आठवा चमत्कार आहे. ज्याला हा चमत्कार समजतो, तो पैसे कमवतो. ज्याला समजत नाही तो पैसे गमावतो. 
  • चक्रवाढ व्याज हा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट मित्रही असू शकतो. 
  • चक्रवाढ व्याज दराने केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते. 
  • जर तुम्ही १०,००० रुपयांची गुंतवणूक केली आणि दरवर्षी त्यावर ५% व्याज मिळवले तर एक वर्षात तुमच्याकडे १०,५०० रुपयांची रक्कम जमा होईल. दुसऱ्या वर्षी तीच रक्कम ११,०२५ रुपये, पाचव्या वर्षी १२,७६३ रुपये आणि १० व्या वर्षी १६,२८९ रुपये जमा होतात.  

 

  1. इंडेक्स फंड्स Index Funds  – 
    • इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० इत्यादीसारख्या इंडेक्समध्ये केलेली गुंतवणूक आहे. 
    • ते म्युच्युअल फंडची कामगिरी मोजण्याकरता त्या संदर्भाने वापरतात म्हणून त्यांना बेंचमार्क निर्देशांक असेही म्हणतात. 
  • इंडेक्स फंडाचे फायदे – 
  1. इंडेक्स फंडातील गुंतवणुकीत कमी धोका असतो. 
  2. इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खर्च कमी येतो. 
  3. इंडेक्स फंड हा कर कार्यक्षम असतो. 
  4. इंडेक्स फंडातील गुंतवणुकीत विविधीकरण असते. 
  5. यामधून सातत्यपूर्ण दीर्घकालीन परतावा गुंतवणूकदाराला मिळत जातो.

 

नक्की वाचा :  इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय? 

 

  1. चांगला क्रेडिट स्कोअर Credit Score  – 
  • आधुनिक जग हे क्रेडिटवर चालते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. 
  • तुम्हाला घर किंवा गाडी खरेदी करायची असेल तर उत्तम क्रेडिट स्कोअर असणे गरजेचे असते. 
  • तुम्ही क्रेडिट स्कोअर कसा वाढवू शकता? त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे. 
  1. वेळेवर बिले भरायला हवीत. 
  2. कर्ज आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी ठेवा. 
  3. कर्जाचा भरणा वेळेवर करायला हवा. 

 

३. व्यक्तिगत बजेट तयार करणे Budgeting  – 

  • आपण आपले व्यक्तिगत बजेट तयार करणे गरजेचे आहे. 
  • दीर्घकालीन संपत्ती तयार करण्यासाठी कर्जातून बाहेर पाडण्यासाठी आणि अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे आवश्यक आहे. 
  • आर्थिक परिस्थिती कशी आहे याबद्दलची माहिती समजायला मदत मिळेल. 
  • कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यास आणि बँक खात्यातील फसव्या गोष्टी शोधण्यास यामुळे मदतच मिळेल. 
  1. पैशांचे नियोजन करताना ५०% पैसे नियमित गरजांसाठी वापरावेत. 
  2. इच्छा आणि आवडी निवडीसाठी ३०% पैशांचा वापर करावा. 
  3. कर्जाची परतफेड किंवा बचतीसाठी २०% पैशांचा उपयोग करावा. 

 

४. प्रत्येक महिन्याला बचत करा  –

  • प्रत्येक महिन्याला नियमितपणे बचत करणे गरजेचे आहे. 
  • आपला सरासरी मासिक खर्च किती आहे याची माहिती काढून ठेवा. 
  • गुंतवणूक करताना चक्रवाढ व्याज दराने करा. 

 

५. नियमित गुंतवणूक करा  Investment – 

  • आजच्या पैशांवर उद्याचे भविष्य वाचवायचे असेल तर गुंतवणूक करणे हा एकमेव मार्ग आहे. 
  • गुंतवणूक करणे का गरजेचे आहे हे जाणून घेणेही महत्वाचे आहे. 
  1. सेवानिवृत्त झाल्यानंतर पैशांची गरज असते, त्यासाठी गुंतवणूक करावी लागते. 
  2. एक मोठी खरेदी करायची असेल तर पैशांची बचत करावीच लागते. 
  3. भविष्यात अचानक आरोग्य खर्च आला तर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. 
  4. स्वतःची गुंतवणूक असल्यावर गुंतवणूकदाराला आर्थिक स्वातंत्र्य मिळते. 

 

नक्की वाचा : आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल? 

७. कर्जाची प्रक्रिया समजून घेणे Process of loan – 

  • बरेच लोक असे असतात जे फक्त महिन्याच्या शेवटी किती पगार येणार याचा विचार करतात. 
  • कर्जाची दीर्घ परतफेड असेल तर कर्जदार जास्त कालावधीसाठी त्या कर्जावर व्याज भरत असतो. 
  • कर्ज घेताना त्यावर किती व्याज लागेल आणि त्याच्या परतफेडीचा कालावधी किती असेल हे समजून घेणे गरजेचे आहे. 

 

८. कर्जाच्या सापळ्यात अडकू नका – 

  • तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असताना ती खरच आपल्याला परवडणार आहे का याचा विचार करायला हवा. 
  • बरेच लोक असे असतात जे कर्जबाजारी होतात आणि त्यातून लवकर बाहेर पडू शकत नाहीत. 
  • कर्ज गरज असेल तेव्हाच घ्या आणि लवकर त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करा. 

 

९. संपत्तीचे जतन करण्याचा प्रयत्न करा – 

  • नेट वर्थ उत्पन्न = एकूण मालमत्ता – एकूण दायित्वे 
  • तुमच्याकडे किती संपत्ती आहे याबद्दलची माहिती समजायला मदत होते. 
  • प्रथम किती मालमत्ता तुमच्या मालकीची आहे याबद्दलची माहिती काढा. जमीन, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक खात्याबद्दलची माहिती घ्या. 
  • कोण कोणती कर्ज भरायची आहेत याची माहिती शोधून काढा. क्रेडिट कार्ड कर्ज, कार कर्ज आणि विद्यार्थी कर्ज ही त्याची उदाहरणे आहेत. 

 

१०. आरोग्य विमा आणि मालमत्ता विमा काढून घ्या  –

  • विमा ही एक आवश्यक गरज आहे, त्यामधून आर्थिक सुरक्षितता मिळते. 
  • पैशांचे संरक्षण केल्यावर खालील फायदे मिळतात.  
  1. मालमत्तेचे उत्पन्नाचे  संरक्षण करणे . 
  2. मनःशांती शांत राहायला मदत मिळते. 
  3. महागड्या खर्चापासून संरक्षण मिळते. 

 

विमा हे मृत्यू, उत्पन्न किंवा मालमत्तेच्या नुकसानीचा धोका कमी करण्याचे महत्वाचे साधन आहे. 

 

११. दुसरे उत्पन्न तयार करा – 

  • पहिले उत्पन्न कायम चालूच असते, पण दुसरे उत्पन्न मिळत राहणे खूप गरजेचे आहे. 
  • जर तुम्ही गुंतवणूक करून दुसरे उत्पन्न चालू करू शकत नसाल तर पहिल्या उत्पन्नाचा काहीही फायदा नाही. 
  • पहिल्या मार्गाने पैसे कमवल्यावर त्याची व्यवस्थित गुंतवणूक करत जा, त्यातून तुम्हाला जास्त पैसे कमवता येतात. 

 

निष्कर्ष : 

  • अर्थसाक्षर होणे सध्याच्या काळातील मोठी गरज निर्माण झाली आहे. बचत, गुंतवणूक आणि कर्ज यामधील मूलभूत संकल्पना माहित असणे गरजेचे आहे. 
  • आर्थिक दृष्टय सक्षम व्हायचे असल्यास कर्जाचा भरणा वेळेवर करावा, दर महिन्याला पैशांची बचत करून गुंतवणूक करत राहावी. 
  • आर्थिक सक्षम व्यक्तीला स्वावलंबी आयुष्य जगता येते.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…