रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे… 

http://bit.ly/2QaS8Mq
0 1,321

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

भारत हा शेतीप्रधान देश आहे. अर्थातच इथल्या प्रत्येकाची जमिनीशी नाळ जोडलेली असते. वडिलोपार्जित मिळालेली जमीन असो किंवा घर आधी आजोबांनी जपलेलं पुन्हा वडिलांनी त्यांच्या हयातीत पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेलं असतं, थोडक्यात काय तर घराचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. साहजिकच आहे म्हणा, स्वत:च हक्काचं घर प्रत्येकाला हवं असतंच. 

भाड्याच्या घरात आपली हयात घालणारे मुलीचे वडील पैसा जमवून ठेवतात कारण त्यांना मुलीची पाठवणी त्यांच्या स्वत:च्या घरातूनच करायची असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:च्या घरात रहायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्या हक्काच्या घरात, आपण आणि आपलं कुटुंब राहत असल्याचं समाधान फार मोठं असतं. कारण त्यामागे आपले अनेक प्रयत्न आणि कष्ट असतात. पण हल्ली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपण रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहत असल्यास, काही नुकसानकारक गोष्टींचा विचार करायला हवा. 

रिअल ईस्टेट वि. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे- 

१. जास्त जोखीम –

 • गुंतवणूकीचा पर्याय म्हणून तुम्ही रिअल इस्टेटकडे पाहत असल्यास, आपण खरेदीसाठी योग्य संपत्तीची निवड करायला हवी.
 • त्या जागेची किंमत पुढे येणा-या सुविधांनुसार म्हणजे मेट्रो सुविधा, सोयीचे व जवळ असणारे विमानतळ, मोठे मॉल्स या सगळ्या गोष्टींवरून कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे ती जागा किंवा संपत्ती विकत घेताना योग्य ठिकाणाची निवड करायला हवी, अर्थात तेवढी किंमत येईलच असे नाही. 
 • दुसरा पर्याय म्हणून आपण स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्सचा विचार केला, तर तिकडे विविध पर्याय मिळू शकतात, ज्यातून गुंतवणूकीवर जास्तीत फायदा मिळू शकतो. 

२. सुरुवातीलाच मोठ्या रकमेची गुंतवणूक –

 • म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे, असं आपण म्हणू शकतो.  कारण, रिअल इस्टेटमध्ये संपत्तीच्या खरेदीसाठी आपल्याला पहिल्यांदाच लाखो रुपये मोजावे लागतात, पण म्युच्युअल फंड मध्ये आपण अगदी प्रति महिना ५०० किंवा ५००० चा ही विचार करू शकतो. 
 • रिअल इस्टेटमध्ये लाखो रुपये गुंतवण्यासाठी बहुतांश लोकांना बँकेचं कर्ज घ्यावं लागतं, जे प्रचंड व्याजदरासहित परत करावं लागतं. 

३. कमी विवरण- 

 • गुंतवणूक म्हणून घेतलेली संपत्ती पुन्हा विकताना खरेदी किंमतीपेक्षा जास्त भाव मिळावा अशी अपेक्षा असते. पण या ५ वर्षात बदलेल्या मार्केटचा आढावा घेतला तर, फक्त १४℅ पर्यंत फायदा होऊ शकतो.
 • जरी मुंबईसारख्या ठिकाणी असलेली जागा भाड्याने देण्याचा विचार केला, तर जास्तीत जास्त वार्षिक फायदा ५℅ एवढा कमी प्रमाणात होऊ शकतो. यासोबत कर्ज काढून केलेल्या गुंतवणूकीचा विचार केला तर परत मिळणारी रक्कम फार कमी आहे. 

४. नकदी नसलेली गुंतवणूक-

 • एखाद्या गोष्टीत काही पैसे गुंतवले, तर नगदी स्वरूपात फायदा व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं. उदाहरणार्थ शेतीच्या पेरणीसाठी केलेला खर्च भरून काढण्यासाठी त्या शेतक-याने काही नगदी पिके काढली, तर त्याचा फायदा तो त्वरीत घेऊ शकतो. 
 • म्युच्युअल फंडात गुंतवलेली रक्कम ही नगदी पिकासारखी आहे, ठराविक काळासाठी खात्यात ठेवली, तर नक्कीच फायदा होतो व पैशाची गरज असेल, तेव्हा आपण ती वापरू शकतो. 
 • रिअल इस्टेटमध्ये मात्र तसं नसते, ती संपत्ती विकायची असेल, तर योग्य गि-हाईक येण्याची वाट पहावी लागते. मार्केट च्या स्थितीनुसार च जागेला भाव मिळतो, पण जर तुम्ही अडचणीत असाल आणि पैशाचा त्वरित गरज असेल, तर म्युच्युअल फंडची गुंतवणूक कामी येते. 

५. असंघटित आणि अनियंत्रित- 

 • आपण पाहतो, हल्ली कित्येक नवनवीन प्रकल्प घेऊन वेगवेगळे बिल्डर्स चढाओढीने मार्केटमध्ये उतरतात. कोणी किती भाव लावायचा यावर कुठलेच निर्बंध राहिले नाहीत. ५० लाखांचा फ्लॅट दुसरा १ करोड लाही विकू शकतो. पण स्टॉक मार्केट किंवा फंड्स मध्ये विशिष्ट नियम ठरलेले आहेत. 
 • रिअल इस्टेट मध्ये व्यवहार मोठे होतात, पण तितकी पारदर्शकता ठेवली जात नाही. आम्रपाली सारखा मोठा बिल्डरसुद्धा गुंतवलेली रक्कम दुसरीकडे वापरून प्रॉपर्टीची मालकी देणं लांबवू शकतो. यामध्ये कुठल्याही नियमांच पालन होत नाही. 

६. सुविधांचा अभाव-

 • म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपण घर बसल्या इंटरनेटच्या मदतीने मार्केटनुसार कमी अधिक होणा-या किमतीचा आढावा घेऊ शकतो. रिअल इस्टेट मध्ये मात्र ही सुविधा मिळत नाही. 
 • प्रत्यक्षात एखाद्या संपत्तीची मालकी मिळणं हे सोप्पं नसतं. लागणारं कर्ज, कायदेशीर कागदपत्रे, रजिस्ट्रेशन यासारख्या गोष्टींमुळे पैसा आणि वेळ दोन्ही जातो. त्यासोबतच प्रत्यक्षात योग्य भाडेकरू शोधणे, महिन्याचं भाडं मिळवणं, भाडेकरूंच्या अडचणी किंवा तक्रारी समजून घेणं या सगळ्या गोष्टी पहाव्या लागतात.तरीही गुंतवलेल्या रकमेवर मिळणारी परत रक्कम ही कमीच असते. 

. विविध ठिकाणी गुंतवणूक कठीण- 

 • रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी, एकापेक्षा जास्त मालमत्ता खरेदी करणे कठीण आहे. कारण यामध्ये जोखीम हा महत्त्वाचा घटक आहे. विविध ठिकाणी गुंतवणूक करणं आणि सर्व मालमत्तांचं विभाजन/ नियोजन करणं, तर अत्यंत कठीण आहे. 
 • गुंतवणूक जितकी जास्त आणि क्लिष्ट तितकी जोखीम अधिक असते. कोणत्याही गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी करण्यासाठी त्यातील विविधिकरण (diversification) अत्यंत आवश्यक असते. परंतु, ते इथे कठीण असते. 

काय आहे बांधकाम व्यवसायाच्या आर्थिक पॅकेजची वस्तुस्थिती?

हल्लीच्या काळात स्वत:साठी एक राहतं घर खरेदी करणं हेच मुळात कठीण आहे. त्यात कोणी गुंतवणूकीचा पर्याय म्हणून घर घेत असेल तर, जास्तीत जास्त एकच घर घेता येते. गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असतील आणि परताव्याची रक्कम जास्त मिळेल, याची खात्री असेल, तर त्याचा विचार जरूर करावा. 

रिअल इस्टेटमध्ये पर्याय कमी असतात. यामध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त घरांच्या खरेदीचा कोणी विचार करत असेल, तर ते प्रत्यक्षात पाहणं तेवढं सोपे नाही. भौगोलिक स्थिति नुसार ही जागेचे भाव कमी अधिक होत असतात. हल्ली मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रोचं वारं धावत आहे. इकडच्या प्रॉपर्टीजचे भाव मेट्रो स्टेशन्सची  ठिकाणं लक्षात घेऊनच कमी जास्त होणार. या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या. थोडक्यात, रिअल इस्टेटकडे गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहत असाल, तर या सगळ्या व्यवहारी व पर्यायी गोष्टींचा विचार करायला हवा. 

– अपर्णा आगरवाल

(वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या प्रमाणित आर्थिक योजनाकार (Certified Financial Planner) असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात.त्यांना तुम्ही aparna@elementummoney.com या ईमेल आय.डी. वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.