Reading Time: 3 minutes

स्त्रीधन या संकल्पनेबद्दल समाजामध्ये अजूनही जनजागृती झालेली नाही. स्त्रीधनचा अर्थ नेमका काय हे देखील बऱ्याच जणांना माहित नाही अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आहे.  (What is Streedhan)

  • स्त्रीधन हा शब्द संस्कृतमधील ‘स्त्री’ आणि ‘धन’ म्हणजेच संपत्ती या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
  • स्त्रीची संपत्ती म्हणजेच मालमत्ता यावर असणारा स्त्रीचा हक्क म्हणजे स्त्रीधन. स्त्रीधन ही संकल्पना आपल्या देशात फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. स्त्रीधनामध्ये संबंधित स्त्रीचा त्या संपूर्ण मालमत्तेवर अधिकार असतो. 
  • स्त्रीचा संपूर्ण आणि निर्विवाद मालकी हक्क ज्या संपत्तीवर किंवा मालमत्तेवर असतो त्यास स्त्रीधन संबोधले जाते. या संपत्तीचा वापर किंवा विक्री करण्यासाठी तिला कुणाच्याही परवानगीची गरज नसते.

 

हे ही वाचा – महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

 

स्त्रीधनामध्ये समावेश असणाऱ्या गोष्टी –

हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ कायद्याच्या कलम १४ नुसार काही विशिष्ट स्रोतांकडून मिळालेल्या वस्तू किंवा मालमत्ता स्त्रीची असते. यामध्ये पुढील काही गोष्टींचा समावेश असतो. 

१. वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता 

२. कुटुंब विभाजनात मिळालेली संपत्ती 

३. कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा सांभाळ केल्यास मिळालेली संपत्ती

४. लग्नात किंवा लग्नाआधी वधूला मिळालेल्या भेटवस्तू 

५. स्वतःच्या कष्टाने किंवा स्वतःच्या जीवावर कमावलेली संपत्ती 

६. न्याय निवाड्यांतर्गत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळालेली संपत्ती

७. लग्नात किंवा लग्नाआधी वधूला मिळालेल्या भेटवस्तू, 

८. स्त्रीधनामध्ये कितीही रक्कम मिळू शकते, त्याला कसलंही लिमिट नाही. जर समजा एखाद्या महिलेने लग्नांनंतर आपल्या पतीला भेटवस्तू स्वरूपात मालमत्ता किंवा संपत्ती दिली तर ती वस्तू किंवा मालमत्ता स्त्रीधनामध्ये येत नाही. 

स्त्रीधन आणि हुंडा –

  • पूर्वीच्या काळापासून हुंडा ही एक वाईट प्रथा देखील अजूनही काही ठिकाणी सुरु आहे. हुंडा आणि स्त्रीधन या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक असून त्यांच्यातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
  • आपल्या समाजात असणाऱ्या रूढी, परंपरांनुसार बऱ्याचदा आपण बघतो की वर पक्षाकडून लग्नात काही विशिष्ट गोष्टींची मागणी केली जाते. यामध्ये मौल्यवान वस्तू, वाहने किंवा इतरही काही आर्थिक गोष्टींचा समावेश असतो. काही वेळेस धमकावून किंवा इतर मार्गाने या गोष्टींची मागणी केली जाते.हुंडा ही वराने किंवा वर पक्षातील कुटुंबाने मागितलेली गोष्ट आहे.  या सर्व प्रकाराला आपण हुंडा म्हणू शकतो. 
  • हुंडा म्हणजे महिलेच्या घरच्यांनी वरपक्षाला लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दिलेल्या पैसे, वस्तूंचा समावेश होतो.
  • स्त्रीधनाचे येणाऱ्या धनावर संपूर्णतः स्त्रीचाच अधिकार असतो. हा अधिकार तिच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्त्री त्या संपत्तीला विकू शकते किंवा त्या संपत्तीला दुसऱ्याच्या नावावर करू शकते. शक्यतो या संपत्तीवर महिलेव्यतिरिक्त इतर कोणाचाही हक्क राहत नाही. 
  • जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा पत्नी स्त्रीधनासाठी दाद मागू शकते. अशा प्रसंगी कटुता टाळण्यासाठी आणि स्पष्टता येण्यासाठी नोकरी करणाऱ्या किंवा स्वतंत्रपणे कमवणाऱ्या महिलांनी आपले व्यवहार नोंदवून ठेवावे, दस्तऐवज जतन करून ठेवावेत. 
  • एखाद्या महिलेच्या लग्नानंतर सात वर्षाच्या आत तिच्या पतीचा मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचा हिस्सा त्या महिलेकडे आणि तिच्या मुलांकडे जातो. स्त्रीधनाच्या बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे. 
  • विवाहाप्रसंगी ज्या गोष्टी वधूला मिळालेल्या असतात, त्याच फक्त स्त्रीधनात मोडतात. इतरांना म्हणजे नवऱ्या मुलाला आणि मुलाकडच्या नातेवाईकांना मानपान म्हणून दिलेल्या भेटी, या मुलीने वा मुलीच्या आईवडिलांनी किंवा आप्तेष्टांनी दिलेल्या असल्या, तरी त्या स्त्रीधनात मोजल्या जात नाहीत. 
  • हिंदू विवाह कायद्यात ‘स्त्रीधन’ या शब्दाचा उल्लेख नाही. हिंदू विवाह कायदा कलम २७ अनुसार पती-पत्नीला विवाहाच्या वेळी वा विवाहाशी संबंधित प्रसंगी मिळालेली, त्यांची वैयक्तिक वा एकत्रित मालमत्ताविषयक काही निर्णय न्यायालय देऊ शकते. त्यानुसार घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये स्त्रीधन किंवा वधूला मिळालेल्या भेटींविषयी मागणी करता येते.
  • घरगुती हिंसाचारविरोधी कायद्यान्वये पीडित महिला स्त्रीधनाची मागणी करू शकतात. घटस्फोटित/विभक्त महिलासुद्धा आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून या कायद्याअंतर्गत स्त्रीधनाही मागणी करू शकतात. 
  • महिलांना स्त्रीधनाचे अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांचे जीवन सुखकर झाले आहे. 

 

हे ही वाचा – Female Investor: यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठीची ३ महत्वाची सूत्र

 

स्त्रीधनाचे वैशिष्ट्ये कोणती आहेत ? 

  • स्त्रीधनावर म्हणजेच त्याअंतर्गत येणाऱ्या संपत्तीवर संपूर्णतः अधिकार स्त्रीचा असतो. यासोबतच महिलेला जी काही संपत्ती भेटवस्तू स्वरूपात मिळालेली असते. तिच्यावर पूर्ण अधिकार सदर महिलेचा असतो. स्त्रीधनामध्ये वारसाहक्काला विशेष महत्व आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ कलम १५, १६ अंतर्गत जर हिंदू स्त्रीने स्त्रीधनावरील हक्क सोडल्यास सर्व संपत्ती वारसांना मिळते. 
  • हिंदू कुटुंबात पुरुषाला कर्ता असं म्हटलं जातं. असं जरी असलं तरी स्त्रीचे स्थान हे पुरुषाच्या वर मानले जाते. यामुळे कुटुंबातील मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी स्त्री एकटी पात्र असते. स्त्रीचे संपूर्ण उत्पन्न ती तिच्या इच्छेनुसार खर्च करू शकते. स्त्रीने जर उत्पन्नाची बचत करून जर साठवणूक केली तर तेदेखील स्त्रीधनाचा एक भाग होते. 
  • स्त्रीधनासंदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा केल्यामुळे स्त्रियांना संपत्तीच्या अधिकाराबाबत बळकटी प्राप्त झाली आहे. पूर्वीच्या काळापासून महिलांकडून जे काही अधिकार नाकारण्यात आले होते ते देखील आता त्यांना मिळाले आहेत. महिलांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेले लक्षणीय पाऊल म्हणून देखील आपण याकडे पाहू शकतो. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.