प्रत्येक पगारदार व्यक्तीला पगाराच्या स्लिप मिळत असतात. परंतु त्यातील बऱ्याच जणांना त्याचे महत्व माहित नसते. सॅलरी स्लिप बद्दल कर्मचारी अनभिज्ञ असतात. त्याबद्दलची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
सॅलरी स्लिप म्हणजे काय?
- पगार स्लिप किंवा पे स्लिप हे मालकाने कर्मचाऱ्याला दिलेले महत्वाचे दस्तऐवज असते. यात कर्मचाऱ्याचा पगार आणि त्या महिन्यात करण्यात आलेल्या कपातीचा समावेश असतो.
- सॅलरी स्लिपमध्ये घर भाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता आणि बोनसचा समावेश होतो. पगार स्लिप कागदावर आणि डिजिटल दोन्ही स्वरूपात मिळते. कर्मचाऱ्यांना पगाराची देयके आणि कपातीचा पुरावा म्हणून मालक त्यांना वेळोवेळी पगार स्लिप देण्यास बांधील असतो.
- काही कंपन्या लहान असतात, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगाराची स्लिप देऊ शकत नाही. पण तेथे काम करणारा कर्मचारी मालकाला पगाराच्या प्रमाणपत्रासाठी विचारणा करू शकतो. पगार स्लिपमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिलेल्या कपातीचा तपशीलवार समावेश असतो.
- वेगवेगळ्या कंपन्यांच्या पगार स्लिप वेग वेगळ्या असू शकतात. पगार स्लिपच्या विवरणपत्रातील उत्पन्न/कमाईमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.
- त्यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि विशेष भत्ता इत्यादींचा समावेश असतो.
- पगार विवरणपत्रातील कपातीमध्ये व्यावसायिक कर, प्राप्तीकर आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा समावेश होतो.
सॅलरी स्लिपमध्ये असणारे घटक –
- नियोक्ता दर महिन्याला वेतन विवरण तयार करत असतो. कर्मचारी त्यांची वेतन स्लिप पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात.
- बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगार स्लिपबद्दलची मूलभूत माहिती नसते. कर्मचाऱ्यांनी सॅलरी स्लिपचे महत्व समजून घ्यायला हवे. यामधील गोंधळात टाकणाऱ्या अटी आणि आकडे समजून घेणे महत्वाचे आहे.
- बहुतेक लोक जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा त्यांना पगार स्लिपबद्दल अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता निर्माण होते.
पगार स्लिपचे महत्व –
- आयकर भरण्यासाठी पगार स्लीपचा उपयोग होतो. त्यामुळे आयकर रिटर्न भरताना, कर्मचाऱ्याने वर्षभरात किती कर भरायचा आहे किंवा किती परतावा मिळवायचा आहे याबाबत मदत होते. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा, अनुदानित अन्नधान्य इत्यादी सरकारद्वारे मिळणाऱ्या सुविधा विनामूल्य आणि अनुदानित सेवा मिळतात.
- कर्मचारी त्यांच्या मागील पगार स्लिपच्या आधारावर नवीन नोकरीतील ऑफरशी तुलना करू शकतात.
- अनेकवेळा प्रवासी व्हिसासाठी किंवा विद्यापीठात अर्ज करताना अर्जदारांना नोकरी आणि पदाचा पुरावा म्हणून वेतन स्लिपची प्रत देण्यास सांगितले जाते.
- पगाराच्या स्लिपमध्ये मिळालेल्या पैशांचा सर्व तपशील असतो. कर्ज देताना बँक किंवा संस्था मागील दोन ते तीन महिन्यांच्या पगाराची स्लिप मागवतात. जेव्हा अर्जदार क्रेडिट कार्डसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्याकडे पगाराची स्लिप मागितली जाते. अर्जदाराच्या स्लिपमधून क्रेडिट कार्डचा ईएमआय कापला जातो.
महत्वाचा लेख – Salary Slip: सॅलरी स्लिप कशी समजून घ्यावी?
सॅलरी स्लिपमध्ये असणारे घटक
- नियोक्ता दर महिन्याला वेतन विवरण तयार करत असतो. कर्मचारी हा वेतन स्लिप पीडीएफ स्वरूपात पण डाउनलोड करू शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नोकरी बदलायची असेल तेव्हा त्याने स्पर्धात्मक ऑफरमधून हुशारीने ती निवडायला हवी.
व्यवसाय कर
- व्यवसाय कर भारतातील काही विशिष्ट राज्यांमध्येच लागू करण्यात आला आहे. त्या विशिष्ट राज्याचे कराचे संचलन करण्यासाठी तेथे विशेष कायदे आणि नियम असतात. संबंधित राज्यातील कर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ती रक्कम वजा केली जाते.
- कर्मचाऱ्याच्या कर स्लॅबच्या आधारे कर्मचाऱ्याच्या पगारातून टीडीएस वजा केला जातो. आयकर विभागाल हा कर मालक भरतो.
- पगाराचे घटक प्रामुख्याने दोन श्रेणींमध्ये येतात. त्यामध्ये कमाई आणि वजावट या दोन बाबींचा प्रामुख्याने समावेश केला जातो.
मिळकत
- वेतन स्लिपमधील उत्पन्नाच्या भागामध्ये मूळ वेतन आणि भत्ते असतात.
मूळ वेतन
- मूळ वेतन हा पगाराचा मूलभूत घटक आहे. वेतनाच्या ४० टक्के भाग हा मूलभूत पगाराचा असतो. कर्मचाऱ्यांना पगारामध्ये बेसिक पगार सोडून इतर भत्ते मिळत असतात.
- कर्मचाऱ्याच्या हातात येणारा पगार हा १०० टक्के करपात्र असतो. बेसिक कमाई पगाराच्या स्लिपवरील मूलभूत घटक असतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी –
- भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधीसाठी जमा केलेली रक्कम होय.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग याचे काम पाहते. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के भाग ईपीएफमध्ये जातो.
महागाई भत्ता –
- महागाई भत्ता हा वेतनावर चलनवाढीचा प्रभाव भरून काढण्यासाठी दिला जातो. तो सहसा मूळ वेतनाच्या ३० ते ४० टक्के असते.
- हा भत्ता वेग वेगळ्या ठिकाणांसाठी सहसा वेगवेगळा असू शकतो.
घरभाडे भत्ता –
- घरभाडे भत्ता हा भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. हा सहसा कर्मचारी कोणत्या शहरात राहतो त्या ठिकाणी असणाऱ्या भाड्यावर अवलंबून असतो.
- कर्मचारी जर मेट्रो शहरात राहत असेल तर हा भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के असतो. ते इतर सर्व शहरांसाठी सर्वसाधारणपणे ४० टक्के असतो. कर्मचारी जर भाड्याच्या घरात राहत असेल तर त्याने दिलेल्या भाड्याच्या रकमेवर करातून सूट मिळते.
वैद्यकीय भत्ता –
- वैद्यकीय भत्ता हा सर्वसाधारणपणे नोकरीच्या कालावधीत कर्मचाऱ्याला वैद्यकीय खर्चासाठी रक्कम दिलेली असते.
प्रवास भत्ता –
- कर्मचारी जेव्हा रजेवर असतात तेव्हा त्यांच्या प्रवासाचा खर्च भरण्यासाठी नियोक्त्यांकडून प्रवास भत्ता दिला जातो. यासाठी प्रवास केल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- प्रवासाच्या वेळी केला जाणारा दुसरा खर्च प्रवास भत्ता कर मधून सूट देत नाही.
विशेष भत्ता –
- विशेष भत्यांमध्ये कामगिरीवर आधारित असणारे भत्ते समविष्ट असतात. हे खासकरून कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. हे भत्ते १०० टक्के करपात्र असतात.
सॅम्पल पे स्लिपसह एकूण पगार आणि जमा होणारा पगार पाहूत.
श्री पवार यांचे वार्षिक पगार 5,50,000 रुपये आहे. खाली कंपनीतून मिळणाऱ्या पगाराचे वाटप दाखवण्यात आले आहे.
मूळ वेतन: 2,75,000 रुपये (पगाराच्या 50%)
महागाई भत्ता : 82,500 रुपये (मूलभूत 30%)
घरभाडे भत्ता : 1,43,000 रुपये (मूलभूत + महागाई भत्याच्या 40%)
प्रवास भत्ता : 19,200 रुपये (1600 रु प्रति महिना)
विशेष भत्ता: 8,700 रुपये (कामगिरीवर आधारित)
निवृत्तीवेतन भत्ता : 21,600 रुपये
एकूण पगार ही कर आणि इतर कपातीपूर्वीची रक्कम आहे. तथापि, त्यात बोनस, ओव्हरटाईम इत्यादीचा समावेश आहे. तर पवार यांचा एकूण पगार 5,50,000 रुपये आहे
एकूण पगार = रुपये 5,28,400.
तुम्ही तुमच्या पगार स्लीपचा व्यवस्थित अभ्यास करा आणि नोकरी बदलताना आपला पगार नक्की वाढतो आहे का याचा विचार करूनच निर्णय घ्या.