Reading Time: 3 minutes

 सर्वसाधारण व्यक्तींसाठी अडीच लाख रुपयांहून वार्षिक उत्पन्न आपल्यास त्याचे उत्पन्न करपात्र असो अथवा नसो त्यास आयकर विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकांना ही मर्यादा अनुक्रमे तीन आणि पाच लाख रुपये आहे.-याहून कमी उत्पन्न आहे पण मुळातून करकपात झाली आहे किंवा आयकर विभागाने उत्पन्नाव्यतिरिक्त काही निकष ठरवले आहेत त्यात बसत असल्यासही आयकर विवरणपत्र भरावे लागते.

उदाहरणार्थ-

★व्यक्ती परदेशात मालमत्ता धारण करीत असेल किंवा त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपभोग घेत असेल,

★परदेशी संस्थेमध्ये सहीचा अधिकार असलेली असेल,

★व्यक्तीच्या बँकेतील चालू खात्यात 1 कोटी किंवा बचत खात्यात 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम असेल,

★व्यक्तीने परदेश प्रवासावर वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केला असेल,

★व्यक्तीने वर्षभरात 1 लाखाहून अधिक रकमेचे वीजबिल भरले असेल,

★व्यक्तीने केलेली एकूण विक्री,उलाढाल 60 लाख हुन अधिक व्यावसायिक प्राप्ती 10 लाख रुपयांहून अधिक रकमेची असेल,

★व्यक्तीची मुळातून झालेली करकपात 25000 रुपयांहून अधिक (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50000 रुपयांहून अधिक) असल्यास.

         आयकर विवरणपत्र भरणे म्हणजे आपले सर्व मार्गाने होणारे एकूण उत्पन्न किती आहे ते जाहीर करून त्यावर किती कर बसेल किती सूट मिळेल ते सांगून आवश्यक कर भरणे किंवा अतिरिक्त करभरणा झाला असल्यास त्याच्या परताव्याची मागणी करणे. देशाचा जबाबदार नागरिक म्हणूनही आपण आपले आयकर विवरणपत्र वेळेत दाखल करणे आवश्यक आहे सर्वसामान्य करदात्यांसाठी विवरणपत्र (सन 2022 -2023 साठी) भरण्याची मुदत 31 जुलै 2023 होती ज्यांना आपल्या उत्पन्नाची लेखा तपासणी करणे आवश्यक आहे ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपले विवरणपत्र भरू शकतात. विवरणपत्र भरून झाल्यावर करदात्याने त्याचे सत्यापन करायचे असते. विहित मुदतीत (सध्या ही मुदत विवरणपत्र भरल्यापासून तीस दिवस आहे) ते न केल्यास करदात्याने विवरणपत्र भले असे समजले जाईल. 

विवरणपत्र वेळेत दाखल केल्याचे खालील फायदे सांगता येतील-

★घर,  किमती वस्तू यासाठी किंवा कोणतेही  कर्ज घ्यायचे असेल तर तुमची परतफेड करण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी मागील तीन वर्षांच्या विवरणपत्रांची गरज असते.

★अमेरिका इंग्लड ऑस्ट्रेलिया कॅनडा या देशांत जायचे असल्यास व्हिसा मिळवण्यासाठी विवरणपत्र भरले असल्यास त्याची मदत होते.

★आयकर कायद्यातील 281 व्या परिशिष्टानुसार विदेशातील व्यवहार आणि मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी करभरणा  प्रमाणपत्र आवश्यक आहे जे आपल्याला आयकर विवरणपत्र भरल्याने आपोआपच प्राप्त होते.

★कापलेला कर अतिरिक्त असल्यास तो परत मिळवण्यासाठी आयकर विवरणपत्राचा उपयोग होतो.

★आपले उत्पन्न आणि निवासाचे ठिकाण निश्चित करण्याचाही याचा उपयोग होतो.

★सरकार पुरस्कृत योजनांचा लाभ घेण्यासाठी आयकर विवरणपत्र भरलेले असणे गरजेचे आहे.

★योग्य मुदतीत आयकर विवरणपत्र भरल्यास व्याज, दंड भरावा लागत नाही.

     

आयकर विवरणपत्र दिलेल्या मुदतीत न भरल्यास होणारे परिणाम-

★दंड व्याज भरावे लागते: विवरणपत्र वेळेत न भरल्यास ते उशीरात उशिरा 31 डिसेंबर 2023 पर्यंत किंवा विभागाकडून अंतिम तारीख जाहीर केली असल्यास त्या तारखेपर्यंत भरता येते. यावर ₹ 5000/- दंड याशिवाय जर करदेयता असेल तर त्यावर 1% प्रतिमाहिना दराने व्याज द्यावे लागते. उत्पन्न ₹ 5 लाखाच्या आत असल्यास दंड रक्कम ₹ 1000/- आहे मात्र करपात्र मर्यादेहून कमी उत्पन्न असेल आणि विवरणपत्र दाखल करायचे असेल तर कोणताही दंड भरावा लागत नाही.

★विवरणपत्र भरण्याची पद्धतीत बदल करता येत नाही; करदात्यांना त्याचे विवरणपत्र सध्या दोन पद्धतीने भरता येते. दोन्ही पद्धतीने हिशोन करून करदाता त्याला किमान आयकर बसेल अशी पद्धत निवडू शकतो. विहित मुदतीत विवरणपत्र न भरल्यास यापूर्वी दिलेल्या पद्धतीनुसारच विवरणपत्र भरावे लागते  त्यामुळे कदाचित अधिक कर भरावा लागू शकतो.

★संचित तोट्याचे समायोजन करता येत नाही:  आयकर कायद्यानुसार असा अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा पुढील काही वर्षात समायोजित करता येतो. त्यामुळे आपली करदेयता बर्यापैकी कमी होऊ शकते. उशिरा विवरणपत्र भरल्याने झालेले असे नुकसान किंवा तोटा पुढे समायोजित करता येत नाही. फक्त ताबा न मिळालेल्या गृहकर्जावरील व्याज यामुळे होत असलेले घरापासूनचे नुकसान उशिरा विवरणपत्र दाखल केले तरी पुढे समायोजित करता येते.

★करचुकवेगिरीबद्धल शिक्षा: आवश्यकता असूनही आयकर विवरणपत्र वेळेत भरले नाही अथवा दंड व्याजासहीत उशिरात उशिरा 31 डिसेंबर 2023 पर्यत न भरल्यास संबंधित करदाता कर देण्यास नकार देत असल्याचे आणि तो जाणीवपूर्वक करभरणा करणे टाळत असण्याचा अपराध करीत असल्याचे समजून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते यानंतर दंड आणि कैद या पैकी एक अथवा दोन्ही या शिक्षा होऊ शकतात.

          

तेव्हा आपली आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत चुकली असली तरी आपण दंड व्यज भरून आपले विवरणपत्र 31 डिसेंबर 2023 पर्यत दाखल करू शकतो त्याचप्रमाणे याच तारखेपर्यंत त्यात दुरुस्ती करू शकतो. जरी आवळे विवरणपत्र आयकर विभागाकडून मान्य झाले असले तरीही त्यात दुरुस्ती करण्यात कोणतीही अडचण नाही. तेव्हा-

★शक्यतो आपले आयकर विवरणपत्र मुदतीत भरावे.

★योग्य फॉर्मचा वापर करावा.

★आपले सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न घोषित करावे.

★उत्पन्नाची खात्री करून योग्य करभरणा करावा अथवा परताव्याची मागणी करावी.

★तरीही काही राहून गेल्यास त्याप्रमाणे विहित मुदतीत दुरुस्ती करावी. 

★आयकर विवरणपत्र भरण्याच्या संदर्भात काही शंका असल्यास 1800 103 0025 या क्रमांकावर संपर्क साधावा.

★अजूनही काही शंका प्रश्न असतील तर आयकर विभागाच्या संकेतस्थळावर सर्वसाधारण सातत्याने विचारले जाणारे प्रश्न (FAQ) क्लीक करून त्याची उत्तरे पहावीत. तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी असून महारेराच्या सलोखा मंचावरील सदस्य आहेत लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.