Reading Time: 2 minutes

नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी 6.22 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रकमेपैकी 27.66 टक्के भांडवली खर्चासाठी, 14.82 टक्के उपजीविका आणि लष्करी ऑपरेशनल तयारीसाठी, 30.66 टक्के पगार आणि भत्त्यांसाठी, 22.70 टक्के निवृत्तीवेतनासाठी आणि 4.17 टक्के निधी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नागरी संस्थांसाठी देण्यात आला आहे. 

  • बजेटमध्ये केलेली ही तरतूद इतर क्षेत्रापेक्षा अधिक मानली जात आहे.
  • संरक्षण क्षेत्रामधल्या शेअर बाजारातल्या कंपन्या आणखी पळणार, असा अंदाज बजेटपूर्वी सर्वच तज्ञ व्यक्त करत होते, म्हणूनच नव्हे तर सरकारने संरक्षण क्षेत्रावर दिलेला भर आणि या कंपन्यांची गेल्या दोन तीन वर्षांतील झेप लक्षात घेता प्रमुख १० कंपन्यांवर लक्ष देऊन तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता.
  • संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. 
  • त्यात १० कंपन्या आघाडीवर असून त्यांचे बाजारमूल्य या काळात तब्बल १.७६ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 
  • त्यात गार्डन रिच शिपबिल्डर्स ९०, तर माझगाव डॉक ७३ टक्क्यांनी वाढली आहे. त्या पाठोपाठ पारस डिफेन्स (६३), कोचिन शिपयार्ड (४९), बीईएमएल (२८), डाटा पॅटर्न (२३) आणि हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक लि. १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • सरकारने संरक्षण क्षेत्रावर दिलेला भर  तसेच या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि संरक्षण क्षेत्रातून सुरु झालेली निर्यात यामुळे गेले वर्षभर सरकारी कंपन्या चर्चेत आहेत. 
  • सरकारी कंपन्यांची ही घौडदौड अचंबित करणारी आहे. उदा. कोचीन शिपयार्ड कंपनी वर्षभरात ९ पट झाली आहे, तर गार्डन रिच शिपबिल्डर्स चार पट वाढली आहे. 
  • इतर कंपन्यानीही गुंतवणूकदारांची रक्कम किमान दुप्पट केली आहे.
  • ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील अनेक शस्त्रसामुग्री देशातच निर्माण व्हावी असे प्रयत्न केले जात असून त्यातील काही सामुग्री निर्यातही केली जाते आहे.

नवीन योजना माहिती : लाडकी बहीण योजना

संरक्षण क्षेत्रामधील गुंतवणुकीची संधी-

  • संरक्षण क्षेत्रातील ही संधी लक्षात घेता एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एचडीएफसी डिफेन्स फंड ९ महिन्यापूर्वी सुरु केला होता.
  • त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना या बदलाचा सर्वाधिक फायदा झाला आहे. अशा गुंतवणूकदारांचे गुंतवणूक गेल्या ९ महिन्यात दुप्पट झाली आहे. 
  • या फंडाने या काळात १०२ टक्के परतावा दिला आहे. या फंडात कोणी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे त्याचे आज २.४५ लाख रुपये झाले असते! 
  • या फंडाने या काळात संरक्षण विषयक २० कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. 
  • फंडाने सर्वाधिक रक्कम हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक लि. (२१.२२ टक्के) तर भारत इलेक्ट्रोनिक्स मध्ये १९.८०% रक्कम ठेवली होती. 
  • जून २०२४ अखेर या फंडाकडे ३,६६५ कोटी रुपयांचा निधी आला आहे. संरक्षण क्षेत्राला वाहिलेला हा एकमेव फंड आहे. 
  • मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड अलीकडेच बाजारात आणला आहे. 

महत्वाचे : सोलार क्षेत्रातील गुंतवणूक संधी 

संरक्षण क्षेत्रामधे केलेल्या तरतुदीमुळे या १० कंपन्या आणखी पळणार ? 

संरक्षण क्षेत्रातील त्या दहा ‘मल्टीबॅगर’ कंपन्या

कंपनी  १६ जुलै २४ चा भाव (रुपये)  एका वर्षातील परतावा  बाजार मूल्य

(कोटी रुपये) 

गार्डन रिच शिपबिल्डर्स 2562 321 टक्के  29,354  
माझगाव डॉक 5405 214 टक्के 1,09,13 
पारस डिफेन्स 1395 103 टक्के 5441
कोचिन शिपयार्ड 2743 732 टक्के 72,172
बीईएमएल 4965 207 टक्के 20,678 
डाटा पॅटर्न 3304 57 टक्के 18,499 
हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक लि. 5329 179 टक्के 3,56,417 
सोलर इंडस्ट्रीज 11,780  220 टक्के 1,06,605
अ‍ॅसट्रा मायक्रोव्हेव 920  154 टक्के 8,737 
आझाद इंजिनियरींग 1681 148 टक्के 9,941

 

 लेखक – यमाजी मालकर 

#एचडीएफसी म्युच्युअल फंड #ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड
#हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक #डिफेन्स फंड

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…