पीएफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड अर्थात भविष्य निर्वाह निधी ! नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजे सेवानिवृत्ती बचत योजना आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावं तसेच उर्वरित आयुष्य समाधानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. तसेच भविष्य निर्वाह निधी सरकारमान्य योजना असल्याने याला विशेष महत्वही प्राप्त होते.
भविष्य निर्वाह निधीचे दोन प्रकार आहेत ;
- एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि
- दुसरं म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी.
पीएफ खात्यामधून एखादी व्यक्ती पैसे कसे, कधी, किती आणि कोणत्या कारणासाठी काढू शकते याचे काही नियम आणि अटी आहेत. या अटी कोणत्या आहेत ? आणि नियम नेमके काय आहेत हे बघूया.
पीएफमधून तुम्ही किती पैसे काढू शकता ? त्यासाठी कुठल्या नियमाची पूर्तता करणं गरजेचे आहे ?
- तुम्हाला पीएफ खात्यामधून जर Rs. 50,000 रुपयांपर्यंत पैसे काढायचे असेल तर कुठलाही कर भरावा लागत नाही. तसेच यासाठी तुमच्या सेवेचे किती वर्ष पूर्ण झाली याची गणना केली जात नाही.
- मात्र तुम्हाला Rs. 50,000 पेक्षा जास्त पैसे काढायचे असेल आणि तुमच्या सेवेचे 5 वर्षे पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे, असं नसेल तर मात्र तुम्हाला कर भरावा लागतो.
- पीएफमधले पैसे काढताना एखादी व्यक्ती पूर्ण पैसे काढू शकत नाही. यासाठी नियम असं सांगतो की, कर्मचाऱ्याचा मूळ पगार जितका असेल तितकी रक्कम + महागाई भत्ता (डी ए – डिअरनेस अलाउन्स) यांची 6 महिन्यांची आकडेवारी असे मिळून जी एकूण रक्कम होईल, तितकी रक्कम पीएफमधून काढली जाऊ शकते.
- किंवा दूसरा पर्याय म्हणजे कर्मचाऱ्याचे योगदान मिळून जी काही रक्कम जमा होत असेल ती रक्कम + त्यावरील व्याज असे मिळून जी एकूण रक्कम होईल, तितकी रक्कम पीएफमधून काढली जाऊ शकते.
- अर्थात कर्मचाऱ्याला वरील दोन पर्यायांपैकी किमान रक्कम काढण्याची मुभा असते.
- उदाहरणार्थ,
समजा,
- एखाद्या व्यक्तीचा मूळ पगार+ महागाई भत्ता (डी ए – डिअरनेस अलाउन्स) = Rs. 60,000 आहे.
सहा महिन्यांची आकडेमोड केली तर एकूण रक्कम = Rs. 3,60,000 झाली.
- कर्मचाऱ्याचे योगदान मिळून जी काही रक्कम जमा होत असेल ती रक्कम + त्यावरील व्याज = Rs. 4,50,000 झाली.
आता या दोन पर्यायांमधून जी रक्कम किमान आहे म्हणजेच Rs. 3,60,000 इतकी रक्कम ती व्यक्ती पीएफ खात्यामधून काढू शकते.
कोणत्या करणांसाठी पीएफ खात्यामधून पैसे काढणं वैध आहे हे बघूया ,
जसे की ,
- जर एखादी व्यक्ती 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बेरोजगार असेल, तर अश्या परिस्थितीत ती व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते.
- जर एखादी व्यक्ती ‘नोकरी सोडल्यामुळे’ 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बेरोजगार असेल तर अशी व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते.
- घरामधे मंगलकार्य ठरले आणि लग्नकार्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर अश्यावेळी त्या व्यक्तीला पीएफ खात्यामधून पैसे काढण्याची मुभा असते.
- जर एखाद्या व्यक्तीला गृहकर्जाचे हप्ते भरायचे असतील, तर या कारणासाठी देखील ती व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते.
- एखाद्या व्यक्तीस मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशाची गरज असल्यास ती व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते. यामधे मात्र नियमानुसार, त्या व्यक्तीने सेवेची 7 वर्षे पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
- घरात काही आपत्कालीन परिस्थिति निर्माण झाली तर औषधोपचारासाठी सदर व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते.
- यामधे नियमानुसार ,आजारी व्यक्ती 1 महिन्यापेक्षा आधिक काळ दवाखान्यात उपचार घेत असेल किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल तर अश्या कठीण वेळी सदर व्यक्ती पीएफ खात्यामधून पैसे काढू शकते.
- तसेच कर्करोग, क्षयरोग,अर्धांगवायू अश्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी देखील पीएफ खात्यामधून पैसे काढण्याची मुभा दिली आहे.
माहितीपर : इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट
पीएफधारकाला कोणत्या परिस्थितीत पैसे काढले असता कर भरावा लागतो ? आणि किती कर भरावा लागतो ?
- एखाद्या व्यक्तीला पाच वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच पीएफ खात्यामधून Rs. 50,000 पेक्षा जास्त पैसे काढावे लागले , तर त्या व्यक्तीचा 10% टीडीएस म्हणजेच ( टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ) कापला जातो.
नोकरी बदलताना पीएफ खात्यामधली शिल्लक रक्कम काढण्यासाठी काही पर्याय आहे का ?
- पीएफमधून पैसे काढायचे असल्यास Rs. 50,000 रुपयांपर्यंत रक्कम काढली तर टीडीएस कापला जात नाही, तेव्हा गरज नसेल तर Rs. 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायचे टाळा.
- नोकरी बदलणार असाल तर पीएफ खात्यामधून शिल्लक पैसे काढण्याऐवजी नवीन नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या नियोकत्याच्या (एम्प्लॉयएर) पीएफ खात्यामधे हस्तांतरित करू शकता.