Reading Time: 2 minutes

पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ही कंपनी 2013 मधे स्थापन झाली. पी.एन.गाडगीळ सोन्याचांदीच्या पारंपरिक दागिन्यांचे विक्रेते असून; ते प्लॅटिनम आणि हिरे यांसारख्या आधुनिक दागिन्यांमधेही नाविन्यपूर्ण दागिने तयार करतात. दहा वर्षातच कंपनीचा चांगला विस्तार झाला असून  31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीची एकूण 40 स्टोअर्स होते. पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचा विस्तार देशात महाराष्ट्र आणि गोवा तसेच परदेशातही(यूएस) झाला आहे.

आता पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड यांचा आयपीओ येत असून आयपीओद्वारे उभारल्या जाणाऱ्या निधीचा उपयोग नवीन स्टोअर्स सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कर्जाची परतफेड करणं हा हेतू असल्याचं कळतं.10 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या आयपीओच्या संदर्भात आजच्या लेखामधून अधिक माहिती जाणून घेऊ.

आयपीओसाठी महत्त्वाच्या तारखा :  

  • पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स यांचा आयपीओ 10 सप्टेंबर 2024 या दिवशी सबस्क्रीप्शनसाठी उपलब्ध होईल आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी सबस्क्रीप्शन बंद होत आहे.
  • 17 सप्टेंबर 2024 या दिवशी एनएसई, बीएसईवर हा शेअर लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे.

प्राइस बँड :

  • पी.एन.गाडगीळ यांच्या आयपीओची किंमत साधारणपणे Rs.456 ते Rs.480 प्रति शेअर अशी निश्चित करण्यात आली आहे.
  • आपीओचा लॉट साईज 31 शेअर्सचा आहे. यामुळे गुंतवणूकदाराची किमान गुंतवणूक Rs.14,880 इतकी होईल.
  • लहान गैर-संस्थात्मक (sNIIs- स्मॉल नॉन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर) गुंतवणूकदारांसाठी किमान लॉट साईज 14 लॉट (434 शेअर्स) आहे. याची एकूण रक्कम Rs.2,08,320 इतकी होते. 
  • आणि मोठ्या गैर-संस्थात्मक( bNIIs- बिग नॉन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर) गुंतवणूकदारांसाठी किमान लॉट साईज 68 लॉट (2,108 शेअर्स) आहे, याची रक्कम Rs.10,11,840 इतकी रुपये आहे.
  • पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स आयपीओच्या माध्यमातून जवळपास 2,29,16,667 रुपये इतके इक्विटी शेअर्स विकणार आहे.आणि 1100 कोटी रुपये उभारणार आहे. यामधून 850 कोटी रुपयांचे 1 कोटी 77 लाख नवीन शेअर्स विकले जातील.तर 250 कोटी रुपयांचे 52,08,333 शेअर्स ऑफर फॉर सेल या अंतर्गत विकले जातील. 
  • नव्या शेअर्सच्या विक्रीतून जवळपास 387 कोटी रुपये कंपनीकडे जमा होतील ज्यातून महाराष्ट्रामध्ये 12 नवीन स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहे,तसेच जवळपास 300 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जाणार.उर्वरित रक्कम कंपनीच्या इतर कारणांसाठी वापरली जाणार आहे. 
  • आयपीओमधे फ्रेश इश्यूद्वारे कंपनी नवीन शेअर्स उपलब्ध करते, तर ‘ऑफर फॉर सेल’मधे विद्यमान शेअरधारक आपले शेअर्स विकतात.
  • आयपीओमधे कंपनीच्या विस्तारासाठी निधी उभारला जातो. तर ऑफर फॉर सेल हा शेअरधारकांना पैसे मिळवण्यासाठी असतो.

पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ संबंधित कागदपत्रं तुम्हाला सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर मिळू शकतील. 

आयपीओ संदर्भातली माहिती उपयुक्त असल्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचावी या हेतूनं लेखामधे समाविष्ट केली आहे. अर्थसाक्षर वेबसाईट कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी सल्ला किंवा मार्गदर्शन करत नाही. शेअर मार्केट संबंधित गुंतवणुकीचे सर्व निर्णय तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानंच घ्यावेत. 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…