Reading Time: 2 minutes

अतिशय लोकप्रिय आणि पिढ्यान-पिढ्या ज्याचे नाव ऐकत आलोय, अश्या बजाज ग्रुपचा बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओनं अक्षरक्ष: रेकॉर्ड मोडले. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आयपीओला पहिल्याच दिवशीपासून (9 सप्टेंबर) प्रचंड मागणी होती. यामुळे आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 89 लाख अर्ज या आयपीओसाठी आले. इतका जबरदस्त प्रतिसाद मिळण्यामागे काय कारण आहे ? हे या लेखामधून सविस्तरपणे माहित करून घेऊ.

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड माहिती  : 

  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी असून 2008 मधे तिची स्थापना झाली. 2015 पासून कंपनी नॅशनल हाऊसिंग बँक यांच्या अंतर्गत कामकाज करते.
  • कंपनी मुख्यत्वे घर खरेदीसाठी, व्यावसायिक जागा खरेदी करण्यासाठी लोकांना कर्ज देते. मालमत्तेच्या नूतनीकरणासाठी वित्त पुरवठा करते. वैयक्तिक गरज असल्यास ग्राहकांना मालमत्तेवर कर्ज देणं अशा अनेक सुविधा बजाज हाऊसिंग फायनान्सकडून दिल्या जातात. 
  • मात्र वरच्या मुद्दयात म्हटल्याप्रमाणे ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग फायनान्स कंपनी असल्यामुळे ती ग्राहकांचे क्रेडिट स्कोर आणि इतर कागदपत्र यागोष्टी बघून ग्राहकांना कर्ज देते. आणि त्याबदल्यात ग्राहकांकडून कुठल्याही प्रकारे पैसे ठेव म्हणून घेत नाही. 
  • उलट ही कंपनी इतर बँकांकडून किंवा मोठ्या गुंतवणूकदारांकडून पैसे उधार घेऊन ग्राहकांना कर्ज पुरवते.आणि त्यामुळे यांचे व्याजदर हे इतर बँकांच्या व्याजदारांच्या तुलनेत जरा जास्त असतात.
  • क्रिसिल या रेटिंग देणाऱ्या कंपनीकडून बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी A1+ चा दर्जा देण्यात आला आहे.

माहितीपर : बोनस शेअर्स 

आयपीओसाठी महत्वाच्या तारखा: 

  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ 9 सप्टेंबरपासून सबस्क्रीप्शनसाठी सुरू झाला.11 सप्टेंबर या दिवशी आयपीओ सबस्क्रीप्शन बंद झाले.
  • साधारणपणे 16 सप्टेंबरला शेअर एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे.

प्राइज बँड आणि लॉट साईज

  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओसाठी Rs.66 ते Rs.70 इतका प्राईज बँड निश्चित केला होता.
  • या आयपीओमधे लॉट साईज पाहिली तर, एका लॉटमधे  214 शेअर्स आहेत. यामुळे एका लॉटसाठी Rs.14980 इतक्या रकमेची गुंतवणूक होते. 
  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ Rs.6560 करोड इतक्या इश्यूसाठी आहे, यापैकी जवळपास Rs.3560 करोड रुपयांचे नवीन शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होते. तर Rs.3000 करोड रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल या अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध होते.

थोडक्यात महत्वाचे : स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुदत ठेवीचे पर्याय 

आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळण्यामागे मुख्य कारणं : 

  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक नावाजलेली सर्वांना माहीत असणारी कंपनी आहे.
  • 1994 रोजी बजाज फायनान्स लिमिटेडचा आयपीओ मार्केटमध्ये आला होता, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आत्ता म्हणजे 2024 मधे बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ आला ! अशी चांगली संधी गुंतवणूकदारांना मिळणं म्हणजे खास मेजवानीच ठरली.
  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओसाठी निश्चित केली गेलेली किंमत (प्राइज बँड) गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आयपीओसाठी अर्ज केला.
  • बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही मूलभूतपणे मजबूत कंपनी (फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी)आहे. भारताच्या विकासामधे सहभाग असणारी मार्केट लीडर म्हणून बजाज कंपनीचं नाव घेतलं जातं.
  • या सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ तब्बल 67 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला.
  • बजाज हाऊसिंग फायनान्समुळे आतापर्यंतचे आयपीओचे सगळे विक्रम मोडले गेले असून 6500 कोटीच्या आयपीओसाठी चक्क 3 लाख कोटीची बोली लागली आहे. 
  • आता सगळ्यांचे लक्ष आयपीओच्या शेअर अलॉटमेंट आणि शेअरच्या लिस्टिंगकडे लागणार ! रेकॉर्ड तोडणाऱ्या या आयपीओमुळे अर्ज केलेल्या आणि उत्सुक गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामधे शेअर्सचा पाऊस पडणार का ? याचे वेध लागले नाही तर नवलच !
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…