Reading Time: 2 minutes

इनिशियल पब्लिक ऑफर(आयपीओ) म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करून लोकांना विक्रीसाठी देते तेव्हा त्या कंपनीचा आयपीओ आला असं म्हटलं जातं. आयपीओच्या निमित्ताने आजकाल बऱ्याच वेळा ग्रे मार्केट प्रीमियम हे शब्द ऐकायला मिळतात. हे ग्रे मार्केट म्हणजे काय ? ग्रे मार्केट प्रीमियम काय असतो? आणि या सगळ्यांचा आयपीओशी काय संबंध आहे हे आजच्या लेखामधून जाणून घेऊ.

ग्रे मार्केट : 

  • ग्रे मार्केट हे एक अनियंत्रित आणि अनधिकृत मार्केट आहे. जेव्हा एखाद्या कंपनीकडून आयपीओची घोषणा केली जाते; तेव्हा ग्रे मार्केटमधे येणाऱ्या आयपीओची मागणी कशी आणि किती असेल यावरून आयपीओ-जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) काढण्याची सुरुवात होते.
  • म्हणजेच स्टॉक मार्केटमधे शेअर्स अधिकृतपणे लिस्ट होण्याच्या आधीच गुंतवणूकदार ग्रे मार्केटमधे अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. 
  • यामुळे जेव्हा एखादा नवीन आयपीओ आल्यानंतर त्याच्यामधे गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदार ग्रे मार्केटमधे सुरू असणाऱ्या प्रीमियमवरून त्या आयपीओच्या संदर्भात गुंतवणुकीचा अंदाज घेत असतात.

आयपीओ : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स 

  • मात्र ग्रे मार्केटमधे कुठलेही नियम नाही तसेच हे एक अनियंत्रित मार्केट आहे यामुळे फक्त आयपीओ जीएमपीवरून अंदाज घेऊन आयपीओमधे गुंतवणूक करणं बरोबर नाही.
  • रोजच्या माहितीच्या आधारावर मिळणारा डेटा बदलल्यामुळे जीएमपी किंमतही बदलते. यामुळे ग्रे मार्केटमधलं प्रीमियमचं समीकरण कोणतेही नियम नसल्यामुळे कधीही बदलू शकतं. व्यवहारादरम्यान खरेदी विक्रीची किंमत खालीवर होऊ शकते, त्यामुळे त्या किमतीवर पूर्णपणे अवलंबून राहणं फारसं योग्य ठरत नाही. 
  • एखाद्या विशिष्ट आयपीओबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीओसाठी ग्रे मार्केट प्रीमियम जेव्हा जास्त येतो, याचाच अर्थ गुंतवणूकदार त्या आयपीओबद्दल उत्सुक आहे, तसेच कंपनीमधे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. पर्यायाने स्टॉक मार्केटमधे पहिल्यांदा आयपीओ शेअर लिस्ट होताना, कंपनीने ठरवून दिलेल्या प्राइज बँडपेक्षा अधिक किमतीवर शेअर लिस्ट होण्याची शक्यता असते.
  • उदाहरणार्थ,

अमुक एका आयपीओची इश्यू प्राइस Rs.500 आहे. ग्रे मार्केटमधे गुंतवणूकदार आयपीओसाठी जास्तीचे (अतिरिक्त) Rs.250/ प्रती शेअर तयार असतील, तर अश्यावेळी आयपीओचा जीएमपी 250 आहे असं म्हटलं जातं.

यात आयपीओची लिस्टिंग होतांना Rs.500 + Rs.250 अशी किंमत असू शकते, असा अंदाज लावला जातो. अर्थात, दरवेळेस लिस्टिंग होतांना आयपीओ जीएमपीच्या अंदाजाच्या आसपास होईल असे नाही.

  • नुकताच बंद झालेला बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आयपीओचा जीएमपी आज ग्रे मार्केटमधे Rs.140 वर सुरू आहे. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी (16 सप्टेंबरला) आयपीओ Rs.140 च्या आसपास लिस्ट होणार का हे लवकरच कळेल. 

आयपीओ  : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड 

ग्रे मार्केटचे काही महत्वाचे मुद्दे : 

  • ग्रे मार्केट हे पूर्णपणे अनियंत्रित, कुठलेही नियम नसणारं आणि अनधिकृत मार्केट आहे. 
  • या मार्केटमधला व्यवहार फक्त रोख रकमेच्या स्वरूपातच होतो. 
  • या मार्केटमधे व्यवहार करणारे गुंतवणूकदार एकमेकांच्या विश्वासवरच व्यवहार करतात. 
  • ग्रे मार्केटमुळे आयपीओच्या लिस्टिंग प्राइसचा अंदाज बांधणं काही प्रमाणात शक्य असल्यामुळे गुंतवणूकरांना फायदा होऊ शकतो.
  • स्टॉक मार्केटमधे ट्रेडिंग सुरू होण्याआधीच गुंतवणूकदार ग्रे मार्केटमधे व्यवहार करू शकतात. तसेच आयपीओ सबस्क्रिबशन बंद झाल्यावरसुद्धा व्यवहार करू शकतात. 
  • ग्रे मार्केटमधले व्यवहार चोवीस तास सुरू असतात. 
  • मात्र वर म्हटल्याप्रमाणे या मार्केटमधे कुठलेच नियम नसल्यामुळे यात अर्थातच जोखिम येते. सोबतच हे अनधिकृत मार्केट असल्यामुळे यात काही नुकसान झाले, तर त्याची कुठेही नोंद केली जात नाही किंवा त्यावर कुठेही तक्रार केली जाऊ शकत नाही.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.