Reading Time: 2 minutes
आजकाल बरेचजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करत आहेत आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड याबद्दल लोकांमधे जागरूकता वाढत चालली आहे. तसेच अगदीच नवशिके असतील किंवा अजिबातच काही माहीत नसलेले पण शेअर मार्केटमधे आवड असलेले अशी बरीच मंडळी, जाणकार-तज्ञ व्यक्तींकडून शेअर मार्केटबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा आजच्या लेखामधून अश्याच एका फंडबद्दल आपण माहीत करून घेऊ.
- FOF – फंड ऑफ फंडस्:
- FOF – फंड ऑफ फंडस् म्हणजे काय ? याबद्दल बऱ्याच वाचकांनी कुठेतरी काहीतरी ऐकलं असेल. तर फंड ऑफ फंडस् हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. यात फंड मॅनेजर स्वतः कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायामधे थेट गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडच्या योजनेत पैशाची गुंतवणूक करतात.
- म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराला जर पीएसयु – पब्लिक सेक्टर अन्डरटेकींगमधे गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती थेट पीएसयु कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडमधल्या एखाद्या पीएसयु फंडमधे गुंतवणूक करून यूनिट खरेदी करू शकते.
- किंवा एखाद्या गुंतवणूकदाराला गोल्डमधे गुंतवणूक करायची असेल तर थेट सोन्यामधे गुंतवणूक न करता फंड ऑफ फंडस् च्या माध्यमाने गोल्ड फंडमधे गुंतवणूक करेल.
- तज्ञांच्या म्हणण्यानुसार, फंड ऑफ फंडस्, छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय आहे. कारण कमी रकमेच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या फंड्स मधे गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
- तसेच फंड ऑफ फंडस् मधे कमी जोखीम पत्करून चांगला परतावाही मिळू शकतो.
2. फंड ऑफ फंडस् मधे गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?
तज्ञ मॅनेजरकडून व्यवस्थापन:
- फंड ऑफ फंडस् चे व्यवस्थापन करताना मॅनेजर म्युच्युअल फंडचे यूनिट खरेदी करतात.
- फंडचा योग्य प्रकारे बारकाईने आणि गुंतवणूकदारांची गरज लक्षात घेऊन तज्ञ मॅनेजर फंड ऑफ फंडस् मधे गुंतवणूक करतात. याला मल्टी मॅनेजर इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात.
विशेष अधिकार :
- फंड ऑफ फंडस् च्या माध्यमातून गुंतवणूकदार अश्या फंडांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो, जे सामान्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध नसतात.
गुंतवणुकीमधली विविधता :
- फंड ऑफ फंडस् मुळे गुंतवणुकीची जोखीम होते, कारण एकाच प्रकारच्या पर्यायामधे पैसे न अडकवता विविध प्रकारच्या आणि पर्यायाच्या फंडस् मधे गुंतवणूक केली जाते.
- यामुळे गुंतवणुकीमधे विविधता येते, जे गुंतवणूकदारांचे नुकसान कमी करायला मदत करते. आणि पर्यायाने जोखीम कमी होते.
- कमी जोखीम पत्करणारे गुंतवणूदार गुंतवणुकीसाठी फंड ऑफ फंडस् चा पर्याय निवडू शकतात.
3. म्युच्युअल फंड आणि फंड ऑफ फंड्स या दोन्ही मधला नेमका फरक काय?
- म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन सोनं, विविध कंपन्यांचे शेअर्स, सरकारी रोखे इत्यादीमधे गुंतवणूक केली जाते.
- फंड ऑफ फंडस् मधे गुंतवणूक करताना फंड मॅनेजर म्युच्युअल फंडच्या यूनिटमधे गुंतवणूक करतो.
4. फंड ऑफ फंड्स चे प्रकार:
- यामधे गोल्ड फंड ऑफ फंडस्, असेट अलोकेशन फंड, मल्टी मॅनेजर फंड आणि इंटरनॅशनल फंड ऑफ फंडस् असे प्रकार येतात.
- गोल्ड फंड ऑफ फंडस् : ज्या म्युच्युअल फंडची गुंतवणूक सोन्याशी संबंधित कंपन्यांमधे आहे, अश्या म्युच्युअल फंडांच्या यूनिटमधे गोल्ड फंड ऑफ फंडस् गुंतवणूक करतात.
- असेट अलोकेशन फंड : ज्या म्युच्युअल फंडची गुंतवणूक इक्विटी, सोने, डेट अश्या विविध पर्यायांमध्ये आहे, अश्या म्युच्युअल फंडांच्या यूनिटमधे असेट अलोकेशन फंड गुंतवणूक करतात.
- मल्टी मॅनेजर फंड : या फंडच्या नावाप्रमाणेच, ज्यावेळी एखाद्या फंडच्या व्यवस्थापनासाठी एकपेक्षा अधिक व्यवस्थापक (मॅनेजर) फंडची जबाबदारी सांभाळत असतात, त्याला मल्टी मॅनेजर फंड असं म्हणतात.
- इंटरनॅशनल फंड ऑफ फंडस् : जेव्हा फंड ऑफ फंडस् आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपनीमधे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून युनिटमधे खरेदी करतात, तेव्हा त्याला इंटरनॅशनल फंड ऑफ फंडस् असं म्हटलं जातं.
Share this article on :