Reading Time: < 1 minute

जर तुम्ही गृहकर्जासाठीच्या महिला अर्जदार असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कर्जासंबंधित भारतात महिला असण्याचे वेगळे फायदे आहेत, विशेषतः गृहकर्जासंबंधित. पुरूषांपेक्षा महिलांना व्याजदर कमी असतो. भारतात महिलांना आर्थिक बाबतीत बऱ्याच सवलती आणि फायदे मिळतात, मग ते बँकेत खाते उघडणे असो, करातील सूट असो, वा गृहकर्ज घेणे असो.

गृहकर्ज मंजूर करण्यातला सर्वात निर्णायक घटक असतो व्याजदर. या दरांमधल्या छोट्या छोट्या बदलांचाही तुमच्या EMIवर मोठा प्रभाव पडत असतो. गृहकर्ज ही अर्थातच मोठी रक्कम असल्याने व्याजदरातल्या लहान-सहान सवलतींमधून खिशाला बराच आराम मिळतो. हाच भारतीय महिलांना मिळणारा सर्वात मोठा दिलासा आहे. पण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कर्जाचा प्रथम अर्जदार किंवा सह-आवेदक (Co-applicant) असणे गरजेचे आहे.

महिलांचे आर्थिक सबळीकरणाचा प्रयत्न

सवलतीच्या दरात कर्ज देऊन बँका एकप्रकारे महिलांच्या आर्थिक सबळीकरणाचा प्रचार करताना दिसतात. महिलांना आर्थिक क्षेत्रात अधिक स्वातंत्र्य मिळून त्यांचा या क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी अशा विविध योजनांतून सरकार महिलांना प्रोत्साहित करताना दिसते. बँकांनी महिलांना कमी वा सवलतीच्या दरात गृहकर्ज पुरवणे हा त्याचाच एक भाग आहे. शिवाय पुरूषांपेक्षा महिलांना कर्ज देणे हे कमी जोखमीचे असते, असाही एक समज आहे. तर पुरूष असो वा स्त्री, सर्वात आधी अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता पडताळूनच पुढील विचार केला जातो. कोणत्याही अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर व कागदपत्र समाधानकारक आणि परिपूर्ण असल्याशिवाय त्याला कर्ज मंजूर होत नाही. या सगळ्या पात्रतांची पूर्तता झाल्यावरच अर्जदार महिला असल्यास त्यांना ह्या सुविधांचा लाभ घेता येतो.

विविध बँकांनी महिला अर्जदारासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने Her Ghar नावाने एक योजना सुरू केली आहे, तर एच.डी.एफ.सी. बँकेची Women Power नावाची एशीच एक योजना आहे. तसंच, घराची नोंदणी जर महिलांच्या नावावर असेल तर काही राज्यांत मुद्रांक शुल्क (Stamp Duty) कमी आकारली जाते.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…