Reading Time: 2 minutes

ईपीफ खाते आता नोकरदार वर्गातील लोकांची एक मुलभूत गरज झाली आहे. तुमच्या ईपीफ खात्याची हाताळणी वारंवार आणि अनिवार्य असल्याने आपल्या ईपीफ खात्याबद्दल साक्षर व्हा

ईपीफ खाते कसे तपासावे?

  • पूर्वीप्रमाणे आता ही प्रक्रिया जटील नाही. ईपीफओ पोर्टल, युएएन (UAN) सारख्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर केल्यामूळे खाते तपासणे सोपे झाले आहे. आपले खाते वेळोवेळी तपासायचे असेल तर त्यापूर्वी काही नवीन संकल्पना आणि प्रक्रियांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. जसे की –

  • ‘युएएन’ (UAN) अर्थात युनिव्हर्सल अकौंट नंबर. एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या ओळखपत्रांना एकच खाते क्रमांकाने जोडून ठेणारा एक क्रमांक म्हणजे ‘युएएन’. पहिल्यांदा नोकरी करताना त्या नोकरीच्या ठिकाणाहून प्राप्त झालेला हा युएएन कायमचा असून पुढे प्रत्येक ठिकाणी ईपीफ आणि तत्सम खात्यांना जोडलेला असतो. खात्यातील रक्कम आणि इतर तपशील तपासण्यासाठी पुढील पैकी पद्धती वापरल्या जाऊ शकतात-

1. ईपीफओ पोर्टल –  http://www.epfindia.com/site_en/KYEPFB.php या वेब पोर्टलवर पुढील प्रमाणे आपली माहिती मिळवावी.

  • ईपीएफओ पोर्टलवर जाऊन ‘आमच्या सेवा’ टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन सूचीमधून “कर्मचारींसाठी” पर्याय निवडा.

  • आता “सर्व्हिसिस” या पर्यायाखाली ‘सदस्य पासबुक’ पर्यायावर क्लिक करा.

  • खालील लॉगइन पृष्ठ दिसेल. येथे आपण आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकल्या नंतरच तुमचे अकौंट अॅक्टीवेट होईल. 

2. एसएमएस (SMS)–एसएमएसद्वारे ईपीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी आपला यूएएन नंबर आपल्या केवायसी (KYC) तपशिलांसह जसे की बँक खाते, आधार किंवा पॅनशी जोडला आहे का हे तपासावे. आपण हे करु शकत नसल्यास, आपल्या नियोक्त्याची (Employer) मदतीने घेऊ शकता. एकदा यूएएन नंबर आपल्या केवायसी तपशिलाशी एकदा जोडला की, पुढील प्रकारे जावे  :

  • तुमच्या युएएन शी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ या क्रमांकाला  EPFOHO UAN ENG असा एसएमएस केल्यास आपल्याला त्वरित माहिती मिळू शकते.

  • ईएनजी (ENG) हे प्राधान्यकृत (English) भाषेतील पहिले तीन अक्षर आहे. 

  • जर तुम्हाला मराठीतून संदेश प्राप्त करायचा असेल तर EPFOHO UAN MAR टाइप करा. 

  • ही सुविधा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांसाठी ही उपलब्ध आहे.

3. मोबाईल – आपले यूएएन आपल्या केवायसी तपशीलांसह बँक खाते, आधार किंवा पॅन जोडलेले आहे हे तपासून मिस्ड कॉल देऊन आपल्या ईपीएफ शिल्लक शोधू शकता. आपण हे करु शकत नसल्यास, आपण हे करण्यासाठी आपल्या नियोक्त्याची (Employer) मदत घेऊ शकता. 

  • आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्या.

  • मिस्ड कॉल दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पीएफ माहितीचा एक एसएमएस मिळेल. 

4. मोबाईल अॅप – ईपीएफ शिल्लकीची तपासणी करण्यासाठी  तुमचा यूएएन नंबर सक्रिय केलेले आहे याची खात्री करा.ईपीएफ शिल्लक तपासणी Google Play Store मधून “m-sewa app of EPFO” अॅप्लीकेशन” डाऊनलोड करता येते.

  • अॅप डाउनलोड झाले की आपल्याला ‘सदस्य’ वर क्लिक करा आणि नंतर ‘बॅलन्स / पासबुक’ वर क्लिक करा.

  • त्यानंतर, आपला यूएएन आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. प्रणाली आपल्या यूएएन विरुद्ध मोबाइल नंबरची पडताळणी करेल आणि जर ती जुळत नसेल तर एरर देईल. आणि जर ते जुळले तर, आपण आपले अद्यतन (Update) केलेले ईपीएफ शिल्लक तपशील पाहू शकता.

  • अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने “उमंग” नावाचे अॅप्लिकेशन लॉन्च केले, ज्यामुळे आधार, गॅस बुकिंग, पीक विमा, एनपीएस आणि ईपीएफ सारख्या विविध सरकारी सेवांचा विलीनीकरण झाले. आपण आपले ईपीएफ तपशील पाहण्यासाठी याचा वापर करू  शकता. एकदा आपण Google Play Store मधून अॅप डाउनलोड केल्यानंतर, आपण “कर्मचारी केंद्र सेवा” शीर्षकाखाली अॅपच्या मुख्यपृष्ठावरून ईपीएफओ पर्याय शोधू शकता. 

5. ईपीएफ हेल्पलाइन – ईपीएफ सदस्यांसाठी ज्यांना ईपीएफच्या प्रक्रियेद्वारे नेव्हिगेट करण्यास अडचण येत आहे, अशा सदस्यांची मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन स्थापन केली आहे. ईपीएफची टोल फ्री हेल्पलाईन 1800118005 आहे.

6.ईपीएफ ग्राहक सेवा – त्या कर्मचारी आपल्या पीएफ अकाऊंट बद्दल अधिक माहिती, जसे की,  त्यांच्या खात्यातील योगदाना मध्ये विसंगती,  पैसे काढण्याची असमर्थता आणि इत्यादी जाणून घेण्यास इच्छुक असल्यास, ईपीएफओची एक समर्पित ग्राहक सेवा आहे. जे लोक ईपीएफमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायक आहे.

  • ईपीएफओचे सदस्य पोर्टलवर लॉग इन करा.

  • पृष्ठाच्या शीर्षावर, ‘आमच्याशी संपर्क साधा’ बटणावर क्लिक करा.

  • एकदा आपण ते पूर्ण केल्यावर, नियोक्ता ज्या भागात स्थित आहे त्यानुसार ईपीएफओच्या ग्राहक सेवांचे टोल फ्री क्रमांक प्रदर्शित केले जातील.

(क्रमशः)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.