Reading Time: < 1 minute

मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.

तसेच ज्या ग्राहकांनी एकुण रकमेच्या १०% पेक्षा जास्त रक्कम भरूनही विकासकांनी विक्री करारनामा केलेला नाही त्या विकासकांची माहिती सुद्धा या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणातुन उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे मुंबई ग्राहक पंचायत हे दोन्ही प्रश्न महारेराकडे धसास लावण्याचा प्रयत्न करणार  आहे.

संबंधित घर खरेदीदार ग्राहकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी https://survey.mumbaigrahakpanchayat.org  या लिंक वर जावे लागेल.

हे सर्वेक्षण २६ सप्टेंबर सायं.७ वाजल्यापासून बुधवार, १० ऑक्टोबर, सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांना उपलब्ध असेल.

सर्व संबंधित घर खरेदीदार ग्राहकांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायत करत  आहे.

शिरीष देशपांडे

कार्याध्यक्ष

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.