Reading Time: 3 minutes
शेतीपासून मनोरंजनापर्यंत फक्त स्वदेशी ॲप्स!
लॉकडाऊन, आत्मनिर्भर भारत या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काही स्वदेशी मोबाईल ॲप्स नव्याने तयार झाली तर काही ॲप्सना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता शेतीपासून मनोरंजनापर्यंत स्वदेशी ॲप्सचा बोलबाला आहे.
१. ॲग्रीबाजार ॲप –
- कोव्हिड १९चा काळ हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक कसोटीचा तसेच डोळे उघडणारा काळ ठरला.
- छोट्या शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत योग्यरितीने आणि अधिक वेगाने विक्री करण्यासाठी ॲग्रीबाजार ॲपची मोलाची मदत झाली.
- भारतातील पहिल्या खासगी ॲग्रीमंडई ॲपने कोव्हिड-१९ च्या काळात भारतातील छोट्या शेत-मालकांचा प्रचंड प्रतिसाद अनुभवला . या काळात ॲग्रीमंडई ॲपने (४००%) वाढ अनुभवली.
- ॲग्रीमंडई हे स्वदेशी ॲप असून ते शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती अपलोड करण्यास तसेच ती माहिती प्रत्यक्ष खरेदीदारापर्यंत पोहोचवण्यास मदत करते.
- छोट्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि मानसिकता विचारात घेऊन या ॲपवर पारदर्शक व्यवहारांना प्राधान्य देण्यात आले आहे.खरेदीदार व विक्रेता यांमध्ये थेट वाटाघाटी करून पारदर्शक व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ॲपची लोकप्रियता वाढत आहे.
- स्थापनेपासून ॲग्रीबाजार ॲप प्लॅटफॉर्मवर १० हजारांपेक्षा जास्त व्यापारी व प्रक्रियाकर्ते, १०० हजारांपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांच्यासह देशातील ३६ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील २ लाखाहून अधिक शेतकरी सक्रिय आहेत.
- ॲग्रीबाजार ॲपने प्रधानमंत्री जन कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशभरात ८ दशलक्ष मेट्रीक टन डाळ खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा दिली आहे. स्थापनेपासून ॲपने १४ हजार कोटींचे जीएमव्ही मिळवले आहे
२. मित्रों ॲप
- मित्रों हे स्वदेशी ॲप शॉर्ट फॉर्म व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरतात.
- या ॲपचे गूगल प्ले स्टोअरवर ३.५० लाखांपेक्षा डाऊलनोड्सचे झाले आहेत.
- सदर ॲपवर दररोज १० लाख नवीन व्हिडीओ अपलोड्स होत असून, दर तासाला ४० दशलक्ष व्हिडिओ पाहिले जात आहेत.
- एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों ॲप ग्राहकांच्या डेटा प्रायव्हसीला प्राधान्य देते. त्यामुळे हे ॲप सुरुवातीपासूनच लोकप्रिय झाले आहे.
- लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरात होता, तेव्हा लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, तसेच कंटेंट क्रिएटर्स हलक्या-फुलक्या विनोदी आणि नावीन्यपूर्ण व्हिडिओ पोस्ट करायला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, या हेतूने हे ॲप तयार करण्यात आले.
- मित्रों विकसकांसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे ॲप युझर फ्रेंडली असून व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपे आहे. या ॲपवर व्हिडिओ लायब्ररीची सुविधा देखील आहे.
ट्रेल ॲप:
- आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे टिकटॉक या चिनी ॲपची लोकप्रियता घसरली. त्यांनतर भारत सरकारने ५९ चिनी ॲप्सवर बंदी घातल्यामुळे टिकटॉक भारतातून हद्दपार झाले.
- टिकटॉकवरील निर्बंधांमुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सनी “ट्रेल” या स्वदेशी ॲपकडे आपला मोर्चा वळवला.
- २०१७ मध्ये तयार करण्यात आलेल्या या ॲपने आत्मनिर्भर भारत मोहिमेचा प्रसार सुरु झाल्यावर सर्व विक्रम मोडत १२ दशलक्ष डाउनलोड्स केवळ ५ दिवसात अनुभवले.
- सध्या फ्री लाइफस्टाइल ॲपमध्ये हे ॲप प्रथम क्रमांकावर असून, एकाच दिवसात ४ लाखाहून अधिक नवे कंटेंट क्रिएटर्स जोडले आहेत, तसेच यावर १.२ दशलक्ष नवे कंटेंट अपलोड करण्यात आले आहेत.
- ट्रेल हे स्वदेशी ॲप असून त्याचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त यूझर्स माध्यम व छोट्या शहरांमध्ये आहेत.
- ट्रेलने नुकतेच प्लॅटफॉर्ममध्ये तीन नव्या भाषा समाविष्ट केल्या आहेत. मराठी, कन्नड आणि बंगाली. म्हणजेच आता हा प्लॅटफॉर्म एकूण ८ भाषांमध्ये (इतर भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम) उपलब्ध आहे.
- आरोग्य, फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, पर्यटन, चित्रपट समीक्षण, पाककृती, गृहसजावट इत्यादी विषयांचे अनुभव, सूचना आणि विश्लेषणे शेअर करण्यासाठी ट्रेल हा उत्कृष्ठ प्लॅटफॉर्म आहे. यामुळेच तो ‘भारताचा व्हिडिओ पिनटरेस्ट’ म्हणून लोकप्रिय आहे.
- ट्रेलवर स्थानिक भाषांमध्ये ३ ते ५ मिनिटांचे व्हिडिओ तयार करता येतात. तसेच येथील ‘शॉप’ या फीचरवर व्ह्लॉग्समध्ये उल्लेख केलेली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासोबतच या ॲपवर बक्षीसे मिळवण्याचीही संधी आहे.
- ट्रेल ॲपनेदेखील यूझर्सची गोपनीयता आणि डाटा सुरक्षितता याला प्राधान्य दिले आहे.
– Value360 Communications
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :