‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती! 

Reading Time: 4 minutes आर्थिक समावेशकता वाढण्यासाठी बँकिंगची अपरिहार्यता कोणीही अमान्य करू शकत नाही. ते बँकिंग वाढविण्याचे काम ग्रामीण भागात मायक्रो एटीएम करत असून त्यांचा वापर वेगाने वाढला आहे. नोटबंदीनंतर भारतीय नागरिकांच्या सवयींमध्ये झालेला सकारात्मक बदल त्यातून दिसतो आहे. 

नरेंद्र मोदींना मिळालेले बहुमत हा बहुजनांचा मूक शहाणपणा?

Reading Time: 6 minutes भेदभावमुक्त व्यवस्थेने हा महाकाय देश बांधला गेला पाहिजे, अशा व्यवस्थेकडे जाण्याचे मार्ग अर्थक्रांतीने चार प्रस्तावाच्या रूपाने दाखविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने देशाला नेत आहेत आणि बहुजन समाजाकडे ते समजून घेण्याचा शहाणपणा आहे, म्हणून या निवडणुकीत त्यांना मोठे बहुमत मिळाले आहे. देशात असे हे प्रथमच घडते आहे.

बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

Reading Time: 4 minutes वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो. सुदृढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा बदल महत्वाचा आहे.

अमित शहा, राहुल गांधी आणि  अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य !

Reading Time: 3 minutes भांडवली बाजारावर आधारित अर्थकारण जगाने स्वीकारले आणि ते भारतालाही स्वीकारावे लागले. पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि संपत्ती वितरणाचा तो एक मार्ग आज मानला जातो. अपारदर्शी आणि अचल अशा जमीन आणि सोन्यातील गुंतवणूक कमी करून आपल्या राजकीय नेत्यांनी गुंतवणुकीचा जो नवा मार्ग निवडला आहे, तो त्यांच्या तर हिताचा आहेच, पण तो देशाच्याही हिताचा आहे.

बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था

Reading Time: 4 minutes कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पतपुरवठ्याच्या विस्ताराला अतिशय महत्व आहे. भारतात त्याला अनेक कारणांनी मर्यादा होत्या, पण गेल्या काही दिवसांत बँक मनी सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचा तो अडथळा दूर होतो आहे. पुढील वर्षभरात बँकांची स्थिती सुधारणार, ही बातमी त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरणार आहे.

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

Reading Time: 4 minutes डिजिटल व्यवहार आणि सेवा क्षेत्राचा होत असलेला विस्तार, हा केवढा मोठा आणि सर्वव्यापी बदल आहे, याचे सुरवातीस अनेकांना पुरेसे आकलन झाले नाही, तो बदल शहरी आणि श्रीमंतांसाठीचा आहे, असेही बोलले गेले. पण आता हा समज मागे पडला असून त्याचा स्वीकार आणि व्यापकता वेगाने वाढतच चालली आहे. व्यवहारांच्या शुद्धीकरणासाठी आणि जगासोबत राहण्यासाठी भारताला त्याची गरजच होती.

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutes नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.

अर्थसंकल्प – ‘युबीआय’ च्या गरजेवर प्रथमच शिक्कामोर्तब भाग १

Reading Time: 3 minutes साठीच्या वरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना  त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता सन्मान म्हणून ‘यूबीआय’ देण्याचा प्रस्ताव अर्थक्रांतीने दिला होता. मात्र तूर्तास शेतकरी आणि असंघटित मजूर यांना मदत करणे, सरकारला अधिक महत्वाचे वाटले, हे समजण्यासारखे आहे. पण भविष्यात, ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांना पेन्शन मिळते, ते वगळता) कोणत्याही भेदभावाशिवाय सन्मान म्हणून मानधन देणे, या प्रस्तावाचा विचार सरकारला करावाच लागेल.

संपूर्ण भारतीय आणि व्यवहार्य मॉडेल – सर्व ज्येष्ठांसाठी ‘यूबीआय’ योजना

Reading Time: 4 minutes भारतीय नागरिकांच्या मनात सध्या असुरक्षिततेने घर केले असून पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, हे त्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा जाहीर करून त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता विशिष्ट मानधन देणे ही ‘गरजू नागरिकांना किमान पैसे देण्याची आदर्श (Universal Basic Income – UBI) योजना’ ठरू शकते. अर्थक्रांतीचा या प्रस्तावाची अमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे. कारण, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना समृद्ध आयुष्य जगण्याचा हक्क मिळणार आहे.