Reading Time: 2 minutes
मेक इन इंडिया: ५ ॲप्सचा पर्याय
भारतात “मेक इन इंडिया” क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी ॲप्स अधिकाधिक वापरून तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरील ५९ चिनी ॲप्सवर भारत सरकारने नुकतीच बंदी जाहीर केली असून या बंदीचे संपूर्ण देशाने स्वागत केले. या ॲप्सच्या माध्यमातून आपली प्रतिभा जगासमोर मांडणाऱ्या प्रतिभावंतांसाठी भारतीय स्टार्टअप्सनी पुढाकार घेत विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जाणून घेऊयात या स्वदेशी पर्यायांबद्दल.
लोकप्रिय स्वदेशी ॲप्स
१. ट्रेल:
- भारत सरकारने लोकप्रिय चिनी ॲप टिकटॉकच्या वापरावर बंदी घातल्यानंतर भारतीय टिकटॉक कलाकार देशात विकसित झालेल्या ट्रेल ॲपकडे वळले आहेत.
- या प्लॅटफॉर्मवरही लहान व्हिडिओ तयार कऱण्याची सुविधा आहे.
- या लाइफस्टाइल कम्युनिटी-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रोत्साहन देण्याचे धाडसी पाऊल उचलल्यानंतर या प्लॅटफॉर्मने सर्व विक्रम मोडत १२ दशलक्ष डाउनलोड्स केवळ ५ दिवसात मिळविले.
- फ्री लाइफस्टाइल ॲप्समध्ये ट्रेंडिंग असलेल्या या प्लॅटफॉर्मन एकाच दिवसात ५ लाखांपेक्षा जास्त अपलोड्स आणि २ लाख २० हजारांपेक्षा जास्त नवे कंटेंट क्रिएटर्स मिळवले.
२. खबरी:
- दहा लाखाहून अधिक डाउनलोडसह मोठ्या ताकदीने आलेले “खबरी” हे एक पॉडकास्ट ॲप्लिकेशन आहे.
- भारतभरातील हिंदी भाषिक बाजारातील निर्मात्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे.
- या व्यासपीठावर आधीपासून ४०,००० इन्फ्लुएंसर्स आहेत.
- कंपनीने मागील दोन दिवसात ५००० नव्या इन्फ्लुएंसर्जची नोंदणी केली आहे.
- इन्फ्लूएंसर्स खबरी स्टुडिओ ॲपद्वारे ‘अर्न विथ खबरी’ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. आपले चॅनल बनवू शकतात. त्यावर ते आपला कंटेंट तयार करून खबरी ॲपवर प्रकाशित करू शकतात.
- नियमित मासिक उत्पन्नाच्या आधारे कंटेंटचा वापर करण्याव्यतिरिक्त जीग्सच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून कमाई करण्याची संधी यावर मिळू शकते.
३. ऐस्मा:
- ऐस्मा हा हायपर लोकल सोशल प्लॅटफॉर्म असून तो इन्फ्लुएंसर्सना त्यांची पद्धत व आकाराने ब्रँडचा कंटेंट तयार करण्याची संधी देते.
- त्यांना फॉलो करणा-या प्रेक्षकांपर्यंत त्याचे मार्केटिंग होते.
- व्हिडिओ, फोटो, मते, बक्षीस इत्यादी प्रकारच्या ३६० स्वरुपात ही सामग्री तयार करता येऊ शकते.
४. रूटर:
- क्रीडा क्षेत्रात, रुटर हे अद्वितीय उत्पादन आहे. चाहते आणि समुदाय यावर आधारीत कंटेंटमध्ये त्यांनी व्यवसायासाठी मजबूत समन्वय तयार केला आहे.
- हा स्पोर्ट्स आणि गेमिंगमध्ये भारतातील एकमेव आणि सर्वात मोठा यूझर निर्मित कंटेंट प्लॅटफॉर्म आहे.
- रूटरची लाइव्ह कंटेंट टेक्नोलॉजीतील अद्वितीय उत्पादन स्थिती स्पोर्ट्स कॉमेंट्री, लाइव्ह क्विझ, मोबाइल गेम स्ट्रीमिंग इत्यादी साधने उपलब्ध करून देते.
- रुटरवर वैयक्तिक व्हिडिओज, इमेजेस, पोल्स इत्यादी वैयक्तिक स्पोर्ट्स फीड टाकता येऊ शकते. तसेच क्रिकेट, फुटबॉल आणि इतर विविध क्रीडा प्रकारांसाठी १० भारतीय भाषांमध्ये स्कोअरकार्ड उपलब्ध आहे.
- चिनी ॲप्सवर बंदी आल्यानंतर रुटरने ८ पटींनी वृद्धी अनुभवली.
५. शेअरचॅट:
- सोशल मिडिया स्टार्टअप शेअरचॅट हा १५ भारतीय भाषांमध्ये दररोज व्हॉट्सअप मॅसेज, स्टेटस शेअर करण्यासाठीचा भारतीय पर्याय आहे.
- शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या रुपात सुरू झालेल्या या ॲपवर पोस्टर्स, इमेजेस, ऑडिओ, जीआयएफ आणि हॅशटॅग शेअर करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
– Value360 Communications
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :