Reading Time: 3 minutes
 • एफडी किंवा मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित समजले जाते. [FD – Fixed Deposits – मुदत ठेव] 
 • बँक, पतसंस्थांमध्ये मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुदत ठेवीतून विशिष्ट कालावधीनंतर निश्चित परतावा मिळतो. शेअर बाजारातील चढ उताराचा  मुदत ठेवीवर कोणताही परिणाम होत नाही. 
 • रिझर्व्ह बँकेने सलग तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे त्यामुळे खाजगी बँकांनीही मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि आयडीबीआय बँकेचा समावेश होतो. 
 • छोट्या बँका आणि पतसंस्था सामान्य लोकांना आणि जेष्ठ नागरिकांना चांगला व्याजदर देत आहेत. ऑगस्टमध्ये मध्यवर्ती बँकेने रेपो दर हा ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ५.४ टक्के केला आहे. 

 

मुदत ठेवींकडे कसे पाहावे 

 • तुम्ही कमी किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मुदत ठेवी हा चांगला पर्याय आहे. 
 • २-३ वर्षासाठी किंवा आपत्कालीन निधीमध्ये पैसे ठेवण्यासाठी मुदत ठेवीत गुंतवणूक तुम्ही करू शकता. मुदत ठेवीतील गुंतवणुकीवरील व्याजदर सध्या वाढवण्यात आले आहेत. 
 • सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक सुरक्षित पैसे ठेवण्यासाठी एफडी (मुदत ठेव) चा वापर करण्याला प्राधान्य देतात. जेष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा ०.५ टक्के व्याजदर जास्त मिळतो. 
 • मुदत ठेवीमधून मिळणारा परतावा हा आकर्षक नसतो कारण कर आकारल्यानंतर वास्तविक परतावा हा महागाईच्या तुलनेत कमी मिळतो. 
 • शेअर बाजारात अनिश्चितता असल्यामुळे मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत  धोका वाढत असल्यामुळे मुदत ठेवीत गुंतवणुकीस प्राधान्य देणे गरजेचे आहे
 • गुंतवणूक करताना आपत्कालीन आणि दीर्घकालीन या पर्यायांचा करायला हवा. 

 

नक्की वाचा : FD Investment: मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या

 

 

दीर्घकालीन आणि अल्प मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 

 • आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार असाल तर मुदत ठेवीतून मिळणारा परतावा चांगला असतो. मुदत ठेवींची मुदत ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असते. 
 • अल्प मुदतीची ठेव ७ दिवस आणि जास्त मुदतीची ठेव २ वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवावी लागते. 
 • अल्प मुदतीच्या गुंतवणुकीत २.५ टक्यांपासून ५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असते.दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीत ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. जेष्ठ नागरिकांना ०.५ टक्के जास्त व्याजदर मिळतो. 
 • लहान खाजगी बँकेत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ६.५ टक्के व्याजदर मिळतो. दीर्घकालीन मुदतीच्या गुंतवणुकीत कंपाऊंडिंग चालू झाल्यामुळे चांगले व्याज मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. 
 • अल्प मुदतीच्या गुंतवणुकीत कमी व्याजदर मिळतो. त्यामुळे मुदत ठेवीची गुंतवणूक करताना  २ वर्षांपेक्षा जास्त करावी. 

 

मुदत ठेवींचे व्याजदर १ सप्टेंबर २०२२ रोजी पुढीलप्रमाणे आहेत – 

Name of The bank For General Citizens (p.a.) For Senior Citizens
State Bank of India FD 2.90% to 5.65% 3.40% to 6.45%
HDFC Bank FD 2.75% to 6.10% 3.25% to 6.60%
IDBI Bank FD 2.70% to 5.75% 3.20% to 6.50%
Kotak Mahindra Bank FD 2.50% to 5.90% 3.00% to 6.40%
RBL Bank FD 3.25% to 7.00% 3.75% to 7.50%
Punjab National Bank FD 3.00% to 6.10% 3.50% to 6.60%
Canara Bank FD 2.90% to 6.00% 2.90% to 6.50%
Axis Bank FD 2.50% to 6.05% 2.50% to 6.80%
Bank of Baroda FD 3.00% to 5.50% 3.50% to 6.50%
IDFC First Bank FD 3.50% to 6.90% 4.00% to 7.40%

 

अल्पकालीन मुदत ठेव 

 • शॉर्ट टर्म मुदत ठेव कमी कालावधीमध्ये गुंतवणूक करता येते. ज्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे ते १२ महिन्यांसाठी मुदत ठेव करू शकतात. 
 • अल्प मुदत ठेवीतून मिळणारा परतावा कमी असला तरी ती गुंतवणूक सुरक्षित राहते. मुदत ठेवीतून गुंतवणूक कालावधीच्या आधी पैसे काढल्यास ०.५ ते १ टक्यांपर्यंत दंड आकारला जातो. 
 • यामधून मिळणाऱ्या व्याजदरातून आपण महागाईवर मात करू शकत नाही मात्र गरजेच्या वेळेला पैसे मिळत असल्यामुळे मुदत ठेव हा चांगला पर्याय आहे. 
 • अल्प गुंतवणुकीसाठी आपण खाजगी बँक किंवा सरकारी बँकेत ठेव ठेवू शकता. इक्विटी पद्धतीच्या गुंतवणुकीपेक्षा अल्प मुदतीमधील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जाते. 

 

दीर्घकालीन मुदत ठेव 

 • दीर्घकालीन मुदतीमध्ये आपण २ वर्षांपासून ५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामधून मिळणारा परतावा हा चक्रवाढ दराने मिळत असल्यामुळे तो जास्त असतो. 
 • मुदत ठेवीतील गुंतवणूक ५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. कारण त्यातून मिळणार परताव्यावरील  कर आकारणीमुळे ते परवडत नाही. 
 • त्यामुळे शक्यतो ५ वर्षासाठी गुंतवणूक करावी. जेष्ठ नागरिकांना ०.५ टक्के व्याजदर जास्त मिळत असल्यामुळे त्यांनी  दीर्घकालीन गुंतवणूक करावी.

 

मुदत ठेवीत गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यास एफडीतून मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही भविष्यात लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन अल्प किंवा दीर्घकालीन मुदत ठेवींचा पर्याय निवडू शकता. 

 

 

नक्की वाचा : काय आहे मुदत ठेवींचे गणित?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…