सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

Reading Time: 2 minutes एखाद्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडायचे असेल तर नैसर्गिक (जैविक) पालक किंवा कायदेशीर पालक यांच्याकडून उघडले जाऊ शकते. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पीईफ सुविधा पुरवणाऱ्या बँकेत अथवा काही सरकारी बँकेत उघडता येते. संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये हे खाते उघडता येते का? याची एकदा खात्री करा. (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीएच, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आंध्रा बँक, यूको बँक, इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक इ. बँकांच्या शाखामध्ये ही सुविधा आहे). तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आयसीआयसीआय बँक व ऍक्सिस बँक या खाजगी बँकांमध्येही हे खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutes घरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

Reading Time: 3 minutes सन २०१५ मध्ये  ‘इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने’ प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण इतर विकसनशील  देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर  स्थान मिळविले होते.  सन २०११ मध्ये  लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.  सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२%  भारतीय  आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची  गरज होती आणि “आयुष्मान भारत” योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.