Reading Time: 4 minutes

★आपण वेगवेगळे उत्पनाचे मार्ग कसे निर्माण करू शकतो.

याचा संबंध आपल्या रोखता प्रवाहाशी आहे जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तर भविष्याचा विचार संपत्ती निर्माण करूनच त्याद्वारे वेगवेगळे उत्पनाचे मार्ग निर्माण होऊ शकता. संपत्ती ही शेअर्समधून निर्माण होऊ शकेल त्यातून तुम्हाला कदाचित फारसा डिव्हिडंड मिळणार नाही पण त्यातून भविष्यात मूल्यवृद्धी झालेली दिसून येईल. याशिवाय एसआयपी करून त्यात वाढ करूनही आपल्या संपत्तीचे मूल्य वाढू शकेल काही कारणाने एसआयपी करणे जड जात असेल तर स्थगित करा पण पैसे काढून घ्यायचा विचारसुद्धा मनात आणू नका जमेल तशी त्यात वाढ करा तरच दीर्घकाळात संपत्तीत आणि त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.

★आपली खर्च करण्याची पद्धत बदलूनही आपण बरीच बचत करू शकतो याबद्दल काय सांगाल?

हे तुमच्याशिवाय कोणी ठरवू शकत तुम्ही तरुण असाल तर कोणतीही जबाबदारी नसेल तर अधिक पैसे वाचवू शकाल आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करू शकाल तेव्हा या वयात अधिकाधिक शिल्लक कशी राहील यावर लक्ष केंद्रित करा जर निवृत्तीच्या जवळ आला असाल तर उपलब्ध साधनातून अधिकाधिक परतावा कसा मिळवू शकतो याचा विचार करा. हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या सारख्याच नसतात.

★शेअरबाजार अशाश्वत आहे म्हणून लोक त्याकडे पाठ फिरवतात त्यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष बाजारात यावे म्हणून काय प्रयत्न करायला हवेत.

अशाश्वतीच्या भीतीने तुम्ही बाजारापासून लांब रहात असाल तर महागाईवर मात करणारा परतावा आपण कधीच मिळवू शकणार नाहीत. तुम्हाला आयुष्यभर कष्टच करावे लागतील तुम्ही कधीही निवृत्तीचा विचार करू शकणार नाही. पारंपरिक गुंतवणूक तुम्हाला जोखिमरहित परतावा देईल पण त्यातून तुमच्या संपत्तीत वाढ होणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर तुम्हाला ही चैन परवडेल अन्यथा बचत करून जमा झालेल्या पैशातून गुंतवणूक करावी लागेल जोखीम घ्यावीच लागेल. पूर्वी राजेशाही होती तेव्हा राजवाडा, अंतःपुर, सैन्य, खजिना राजाकडे असायचा यात बदल झाल्यावर गावातील एखादं दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीकडे या गोष्टी असायच्या अनेकांना त्याचे आकर्षण वाटायचं याच अनुकरणातून चैनच्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे आपण श्रीमंत झालो अशी भ्रामक कल्पना अनेकांच्या मनात रुजली आहे. आज जगात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती अत्यंत साधेपणाने रहातात हे लक्षात घ्या वास्तविक ते इतकं कमावत आहेत की त्याच्या दृष्टीने आपण ज्याला चैन समजतो ती करणं ही अगदीच क्षुल्लक बाब आहे. बाजारात तुम्ही गुंतवणूक करणार तर कशी करणार, स्वतः करणार की कुणाची मदत घेणार प्रत्यक्ष करणार की अप्रत्यक्षपणे करणार यात बदल होऊ शकतो पण संपत्तीत वाढ करायची असल्यास अशी गुंतवणूक तुम्ही टाळू शकत नाही.

★आजकाल घोटाळे वाढत आहेत अशा परिस्थितीत चांगला सल्लागार कसा शोधावा?

घोटाळे, फसवणूक, गैरव्यवहार आधीही होत होते आताही होतात फक्त आता ते जास्त रंगवून सांगितले जातात. या गोष्टी ताबडतोब फ्लॅश होतात, जगभर पसरतात त्याला मिठमसाला लावला जातो, त्यास कधी कधी जातीय रंगही दिला जातो. नकारात्मक गोष्टी पटकन मनाची पकड घेतात त्याच गोष्टी वारंवार फॉरवर्ड केल्या जातात अनेकदा अनेकांकडून पुनः पुन्हा त्या आपल्याकडे येत राहतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करावं तरीही एखादी कंपनी एखादा फंड संशयास्पद वाटत असेल तर त्यातून बाहेर पडावं आपल्या बाबतीत असं होणारच नाही का हे सांगता यायचं नाही फ्रेंक्लीन, अक्सिसमध्ये काही घोटाळे झाले जे झालं ते निश्चित चांगलं झालं म्हणता येणार नाही पण याचा अर्थ गुंतवणूकदारांचे सर्व पैसे घेऊन फंड मॅनेजर पळाले असा नाही. आपल्याला या बातम्यांनी ताण येत असल्यास बातम्या पाहू नका, समाज माध्यमापासून दूर राहा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलात की आपोआपच सर्व सकारात्मक होईल.

★शेअर आणि म्युच्युअल फंड याशिवाय अजून असे काही गुंतवणूक प्रकार आहेत का ज्यात गुंतवणूक केली जावी.

असे अनेक पर्याय आहेत पण त्यात खूप गुंतवणूक करावी लागणार तुलनेत त्यातून फार परतावा मिळणार नाही त्यामुळे ते सामान्य लोकांसाठी नाहीत भरपूर संपत्ती असल्यास तुम्ही अनेक घरं घेऊ शकता त्यांची देखभाल करू शकता परतावा मिळण्यासाठी अतिदीर्घकाळ थांबू शकता. यासाठी खूप मोठी रक्कम लागते जी आपल्याकडे नसते तेव्हा एसआयपी करणे वाढवणे संयम बाळगणे शांत राहणे हेच आपल्यापुढे असलेले पर्याय आहेत.

★गुंतवणूक कधीही करावी असं म्हणतात तसच ती काढून कधी घ्यायची याबद्धलची एखादी योजना आपण सांगू शकाल.

माझे यासंबंधीचे विचार वेगळे आहेत. अशी कोणती योजनाच असावी असे मला वाटत नाही, काही गुंतवणूक विशिष्ठ उद्देशाने केलेली असते ती चालूच ठेवावी बंद करू नये. या उद्दिष्ट ठेवलेल्या गरजा पूर्ण करणारा फंड वगळून बाजार चांगला आहे मिळणारा परतावा उत्तम आहे अशा परिस्थितीत काही पैसे काढून घेऊन आपल्या सुप्त इच्छा जसे वर्ड टूर, मोठा स्क्रीन असलेला टी व्ही अशासारखे खर्च करावेत म्हणजे घरच्यांचही समाधान होईल आणि खात्री होते की यातून काहीतरी मिळतंय फक्त असं करत असताना आपण फक्तच चैन करतोय अस होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक अडचणीत आहात, कोणी आजारी पडलंय यासाठी आपले पैसे काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. यामुळे गुंतवणुकीचे मूळ उद्देश सफल होत नाहीत यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड हवा, मेडिकल इन्शुरन्स हवा.

★निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्यास नेमकी कधी सुरुवात करावी.

या प्रश्नामुळे मला निवृत्तीवर मी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात मी एखाद्याला 40 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची असल्यास त्याने 22 व्या वर्षांपासून रोज ₹40/- असे महिना ₹1200/-  म्हणजेच वर्षाचे ₹14400/- वाचवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता किंवा अमेरिकन मानांकनाप्रमाणे उत्पन्नाच्या 10% भागाची गुंतवणूक करायला हवी. ती दरवर्षी उत्पन्नाप्रमाणे वाढवत न्यावी ही रक्कम घर घेणं, लग्न करणं, शिक्षणासाठी वापरणं अशा कारणांसाठी वापरू नये. याची सुरुवात नियम म्हटला तर पहिल्या पगारापासून करावी परंतु अनेक कारणांनी नोकरी लागल्या लागल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात त्यासाठी 3 / 4 महिने आपल्या प्रियजनांना भेटी देण्यात सर्व पगार असाच संपून जातो. हा कालावधी सोडून लगेच गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली पाहिजे.

★मृत्यपत्र याविषयी आपलं काय मत आहे ते कधी बनवावं?

अनेकजण अस समजतात की मी मृत्युपत्र बनवलं की मी लगेच मरेन मी माझं मृत्यूपत्र 20 वर्षांपूर्वी बनवलं मी न मेल्याने माझ्या घरातील नीलोकांचा कोणताही फायदा झाला नाही यातील गमतीचा भाग सोडला तर जेव्हा कधी तुम्ही स्थावर मालमत्ता घ्याल त्यानंतर लगेच बनवावे. कारण स्थावर मालमत्तेची विक्री सदर मालमत्ता टायटल क्लिअर असणे जरुरीचे असते. अन्य ठिकाणची इतर मालमत्ता काही अटींची पूर्तता केल्यावर नॉमिनीच्या नावावर वर्ग केली जाते. मात्र स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील खरेदी विक्री व्यवहार त्यामुळे होऊ शकत नाहीत नाहीत त्यासाठी मृत्युपत्राचा उपयोग होतो. या अनुषंगानेच मृत्युपत्राच्या संबंधीत असलेल्या दाव्याची संख्या गेली अनेक वर्षे सातत्याने वाढत आहे. त्याच कारण ते योग्य रीतीने बनवलेल नाही. योग्य आर्थिक सल्लागार, वकील यांची मदत घेऊन ते रजिस्टर केल्यास सहसा कायदेशीर अडचणी येत नाहीत त्यासाठी येणारा जास्तीत जास्त खर्च फक्त ₹ 9000/- एवढाच येईल. तो वाजवी आहे.

★म्युच्युअल फंड गुंतवणूक थेट करावी की मध्यस्थाची मदत घेऊन?

जर तुम्ही या गोष्टी स्वतः करता येत असतील तर करू शकता. तुम्ही गावी चालला आहात. जर तुम्ही फिट असाल तर आपली बॅग प्लॅटफॉर्मवरून स्वतः घेऊन जाऊ शकता पण समजा तुम्हाला ताप येईल असं वाटतंय तर तुम्ही अन्य कोणाची मदत घेऊ शकता अगदी तसच आहे हे त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. प्रत्येक वेळी सल्लागाराची जरूर असते असं नाही जेव्हा जरूर असेल तेव्हा सल्लागाराची मदत घ्यावी. तुमचा सल्लागार तुमच्यासाठी काय करतो तो तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो तुमचा गुंतवणूक संच यथायोग्य बनवून देऊन तुमचा जीवन विमा, आरोग्यविमा, करदेयता याची काळजी घेतो का? या सर्वांवर याचे उत्तर अवलंबून आहे.

(अपूर्ण)

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 1

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…