Reading Time: 3 minutes
 • क्रेडीट कार्ड ही आता केवळ मिरवण्याची गोष्ट नसून गरजेची वस्तू झालेली आहे. (Credit Cards Benefits)
 • शॉपिंग मॉल, कॉफी शॉप, कपड्यांची दुकाने, सिनेमा तिकीट, पेट्रोल पंप अशा अनेक ठिकाणी क्रेडीट कार्डला प्राथमिकता दिली जाते. त्यावर अनेक ऑफर्स असतात, या सर्व ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी अनेकजण क्रेडीट कार्ड घेत असतात.
 • आपण जेव्हा सुरुवातीला क्रेडीट कार्ड घेतो त्यावेळी बहुतेकांना एंट्री लेव्हलचे कार्ड दिले जाते. या एंट्री लेव्हल क्रेडीट कार्डवर मर्यादित सुविधा असतात. 
 • आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे एंट्री लेव्हल कार्ड आपली आर्थिक स्थिरता येण्यासाठी चांगलीच असतात. कारण आपण अनेकदा कर्ज घेऊन शिकलेलो असतो किंवा घरातील इतर महत्वाच्या कारणासाठी कर्ज घेतले जाते. तेव्हा आपली प्राथमिकता हे कर्ज फेडण्यास असते. 
 • त्यावेळी अधिक मर्यादेचे क्रेडीट कार्ड घेऊन अजून कर्ज वाढवणे भविष्यासाठी योग्य नसते. नंतर जेव्हा आपले कर्ज फिटते तेव्हा अधिक पगार मिळायला लागतो. आपण क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्याचा विचार करायला हवा.
 • क्रेडीट कार्ड अपग्रेड केल्यावर आपल्याला अनेक ऑफर्स, बक्षिसे, प्रवासी लाभ, कॅशबॅक अशा अनेक सुविधा मिळतात. यामुळे आपण कमी पैशात अपग्रेड केलेल्या क्रेडीट कार्डवर सुविधांचा लाभ घेऊ शकतो. (Credit Card Upgrade information marathi)
 • आता हे क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण कोणत्याही जाळ्यात न अडकता क्रेडीट कार्डचा चांगला उपयोग करू शकतो.

 

१) तुमचा खर्च कोणत्या प्रकारच्या गोष्टीवर सर्वाधिक होतो –

 • क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी सर्वात प्रथम करायची गोष्ट म्हणजे गेल्या दोन- तीन महिन्याचा हिशोब करून ठेवा. ज्यावेळी तुम्ही हिशोब कराल. तेव्हा तुमच्या; लक्षात येईल की, आपला सर्वाधिक खर्च कोणत्या गोष्टीवर होतो आहे.
 • ज्या प्रकारच्या वस्तूवर तुमचा सर्वाधिक खर्च होतो आहे. त्यानुसार आपले क्रेडीट कार्ड अपग्रेड करा. उदा. जर तुमचा खर्च पेट्रोलवर अधिक होत असेल तर इंधन क्रेडीट कार्ड घ्या. 
 • तुमचा खर्च किराणा वस्तूवर अधिक होत असेल तर शॉपिंग क्रेडीट कार्ड घ्या. तुम्ही आपल्या खर्चाकडे न बघता क्रेडीट कार्डच्या अपग्रेडचा विचार केला तर तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होण्याचीच शक्यता अधिक आहे.
 • यामुळे आपल्या खर्च केलेल्या गोष्टींचा हिशोब करण्यास थोडा वेळ द्या. त्यावरूनच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.

 

२) क्रेडीट कार्डवर असलेल्या रिवार्ड बद्दल माहिती घ्या –

 • आपल्याला कोणत्या प्रकारातील क्रेडीट कार्ड घ्यायचे आहे, हे पक्के झाल्यावर पुढची पायरी म्हणजे त्या क्रेडीट कार्डवर कोण- कोणत्या सुविधा, सवलती, बक्षिसे आहेत, याची व्यवस्थित माहिती घ्या. 
 • काही क्रेडीट कार्डवर भरपूर सवलती असतात, बक्षिसे असतात पण त्यावर निश्चित अशी एक मर्यादा असते. आपल्याला त्या मर्यादेच्या आत काही कारणामुळे त्या सवलती असलेल्या वस्तू घेता येणार नसतील तर ते क्रेडीट कार्ड घेऊन काही फायदा होणार नाही.
 • तेव्हा थोड्या कमी सवलती असलेलं आणि निश्चित अशी मर्यादा नसलेलं क्रेडीट कार्ड घेणं कधीही चांगला निर्णय ठरतो. क्रेडीट कार्ड अपग्रेड करताना फक्त सवलती आणि बक्षिसे पहायची नाहीत तर त्यावरील अटी व शर्ती देखील पाहणे महत्वाचे आहे.  

नक्की वाचा : क्रेडिट कार्ड फायदे आणि तोटे 

 

३) वार्षिक शुल्क तपासा – 

 • आपल्याकडे असलेल्या एंट्री लेव्हल कार्डपेक्षा अपग्रेड केलेल्या कार्डवर जशा अनेक सवलती असतात तसे वार्षिक शुल्कही अधिक असते. 
 • अशा वेळेला आपल्याला ज्या सवलती मिळत आहेत आणि त्यात हे वार्षिक शुल्क धरले तर आपल्याला या सवलती महागात तर पडत नाहीत ना.. हे तपासणे गरजेचे आहे. 
 • नाहीतर सवलतीचा वर्षाव पाहून आपण खुश होऊन जायचो आणि वर्षाच्या शेवटी वार्षिक शुल्काचा बोजा आपल्या अंगावर पडल्यावर रडायची वेळ यायची.  
 • तसेच सध्या बहुतेक क्रेडीट कार्ड असे येत आहेत की, दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यास वार्षिक शुल्कात काही सवलत मिळते. अशीही काही सुविधा आहे का? तेही जरूर तपासा.

 

४) क्रेडीट कार्डची कमाल मर्यादा –

 • आपण क्रेडीट कार्ड अपग्रेड करत असू तर सहसा आपली क्रेडीट कार्ड मर्यादा देखील वाढवली जाते. ही क्रेडीट कार्ड मर्यादा किती वाढवली आहे , ते जरूर पहा.
 • क्रेडीट कार्ड मर्यादा वाढल्यास आपल्यला अडचणीच्या वेळी फायदा होतो तसेच क्रेडीट स्कोअर देखील सुधारण्यास मदत होते. 
 • क्रेडीट कार्डची मर्यादा ही आपला पगार किंवा उत्पन्न किती आहे? क्रेडीट कार्ड कोणत्या प्रकारातील आहे, आपला परतफेडीचा रेकॉर्ड कसा आहे. या गोष्टीवर अवलंबून असते.

 

नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी या चार महत्वाच्या गोष्टी जरूर करा.

नक्की वाचा : क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे 

(Credit Card marathi information, Credit Cards benefits, Credit Cards Interest)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…