Reading Time: 2 minutes
क्रेडिट कार्ड घेत असताना ते कशासाठी घेत आहोत, हे सर्वात आधी माहित असायला हवे. आकर्षक कॅशबॅक मिळवणे, कमी व्याज असणे आणि परतफेडीचा जास्त कालावधी देणारे क्रेडिट कार्ड सर्वांना हवे असते.
- आपले व्यवहार सर्वात आधी माहित करून घ्या –
- दररोजच्या आयुष्यात कशा प्रकारे खर्च करता, याचा आढावा घ्या. लाईट बिल ऑनलाईन भरता का? कायम खरेदी करता का? किंवा नियमित विमानाने प्रवास करता का? या प्रश्नांचा आढावा घ्या.
- आपण हे नियमितपणे करत असाल तर आपल्या जवळ क्रेडिट कार्ड असणे गरजेचं असते. खरेदी करताना क्रेडिट कार्डवर ऑफर मिळतात आणि कर्ज परतफेडीसाठी जास्तीचा कालावधीही दिला जातो.
- नियमितपणे क्रेडिट कार्डच्या कर्जाची परतफेड केल्यास चिंता करण्याची गरज नसते. क्रेडिट कार्ड खरेदी करताना कॅशबॅक ऑफर, वार्षिक शुल्क नसलेलं आणि रिवार्ड पॉईंट देणारे क्रेडिट कार्ड खरेदी करावे.
- 30 दिवसांनी किंवा त्यानंतर क्रेडिट कार्डवरील कर्जाची परतफेड करणार असाल तर आपल्याला अशा प्रकारच्या सुविधा देणारे क्रेडिट कार्ड खरेदी करावे.
- क्रेडिट कार्ड कायम वापरत नसाल तर वार्षिक शुल्क नसलेलं आणि कमी व्याजदर असणारे क्रेडिट कार्ड खरेदी करा.
नक्की वाचा : “आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?”
- क्रेडिटच्या मर्यादेकडे लक्ष द्या –
- दैनंदिन खर्च रोजच महाग होत चालले आहेत. हल्ली प्रत्येकाला खर्च पूर्ण करण्यासाठी जास्त मर्यादा असणारे क्रेडिट कार्ड हवे आहे.
- आपण क्रेडिट कार्डवरील कर्ज नियमित न फेडल्यास आपला क्रेडिट कार्ड स्कोअर कमी होतो.
- आपण कोणतेही क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी क्रेडिट मर्यादा तपासून पहावी. क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी खर्चाचे नियोजन करून ठेवावे.
- व्याजदराचा विचार करून क्रेडिट कार्ड घ्या –
- क्रेडिट कार्ड खरेदी करत असाल तर व्याजदर हा त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.
- काही बँका या आजीवन मोफत क्रेडिट कार्ड ऑफर करतात, त्यामध्ये कोणतेही वार्षिक शुल्क नसते.
- आपण क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी सर्व नियमांची माहिती करून घ्या, त्यामुळे भविष्यात यासंदर्भातील कोणत्याही अडचणीचा आपल्याला सामना करावा लागत नाही.
- दंडाची माहिती करून ठेवा –
- क्रेडिट कार्डवरील हप्त्यांची वेळेवर परतफेड केल्यास आपल्याला बँकेकडून क्रेडिट लिमिट वाढवून मिळते.
- क्रेडिट कार्डचा एखादा हप्ता भरायचा चुकवल्यास बँकेकडून पुढील हप्त्याच्या वेळेस दंड आकारला जातो.
नक्की वाचा : ठेवींवरील वाढते व्याजदर
- आकर्षक ऑफर तपासून पहा –
- आपण खरेदी करत असलेले क्रेडिट कार्ड्स आकर्षक ऑफर देत आहे का, याची सर्वात आधी माहिती घ्यावी.
- अनेक क्रेडिट कार्ड्सवर ऑनलाईन खरेदी करताना ऑफर दिलेली असते. खरेदी करत असलेल्या कार्डवर ही सुविधा आहे का, याची तपासणी करावी.
- आपल्याला जास्त ऑफर देणारे आणि कमी व्याजदर असणारे क्रेडिट कार्ड खरेदी करावे. अशा पद्धतीने कार्ड घेतल्यावर जास्तीत जास्त ऑफरचा फायदा मिळतो.
निष्कर्ष :
- क्रेडिट कार्ड घेऊन त्यावर खरेदी करणे, हे सगळीकडे चालू आहे. क्रेडिट कार्डचा वापर आपल्याला आवश्यक असेल तिथेच करावा.
- क्रेडिट कार्ड घेताना विनाव्याज कर्जाची रक्कम किती दिवसांसाठी मिळणार आहे आणि इतर कोणत्या योजनांचा फायदा मिळणार आहे, याची माहिती घ्या.
Share this article on :