Reading Time: 2 minutes
काही दिवसांपूर्वी आपण बोनस शेअर्सबद्दल सविस्तर माहिती घेतली. आजच्या लेखामधून डिव्हीडंड – लाभांश म्हणजे काय हे बघू. एखादी कंपनी लाभांश देते म्हणजे काय? लाभांश का दिला जातो? कुठल्या कंपन्या लाभांश देतात ? सध्या कुठल्या कंपन्यांनी लाभांश जाहीर केला आहे आणि किती ? याबद्दल आजच्या लेखामधून सविस्तर माहित करून घेऊ.
1. लाभांश
- एखाद्या कंपनीला फायदा झाल्यास, कंपनी त्यातून काही भाग शेअरधारकांना देते, याला लाभांश (डिव्हीडंड) म्हणतात. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यामधून शेअरधारकांना लाभांश दिला जातो. हा रोख स्वरूपात दिला जातो.
- बोनस शेअर मिळण्यासाठी जसं रेकॉर्ड डेट, एक्स डेट या तारखा महत्वाच्या असतात, अगदी तसेच लाभांश मिळण्यासाठीसुद्धा रेकॉर्ड डेट, एक्स डेट या तारखा महत्वाच्या असतात.
- जेव्हा एखाद्या कंपनीने लाभांश जाहीर केला असं म्हंटलं जातं, तेव्हा त्यावेळी शेअरधारकाच्या डिमॅट खात्यामधे सदर कंपनीचे शेअर असणे आवश्यक असते.
- किंवा गुंतवणूकदाराला शेअर खरेदी करायचा असेल तर कंपनीने जाहीर केलेल्या रेकॉर्ड तारखेपर्यंत त्याच्या डीमॅट खात्यात शेअर आलेला पाहिजे, याची खात्री होणं गरजेचं आहे. त्यानुसार एक्स-डेट म्हणजे रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी शेअर खरेदी झालेली पाहिजे.
2. कंपन्यांनी शेअरधारकांना लाभांश देणे बंधनकारक असते का?
- जेव्हा एखाद्या कंपनीला नफा होतो, तेव्हा कंपनीचे संचालक मंडळ एका सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजेच मिटींगमधे लाभांश द्यावा की नाही हे ठरवतात. यात कंपनीच्या संचालक मंडळाची संमती नसेल तर कंपनी लाभांश देऊ शकत नाही.
- बोनस प्रमाणेच लाभांश देण्यासाठीसुद्धा कंपनीच्या सर्वसाधारण मीटिंगमधे लाभांश देण्यासाठी मंजुरी मिळणं आवश्यक असतं.
- लाभांश दिला नाही, तर मग कंपनीला झालेल्या नफ्याचं काय केलं जातं? तर अश्यावेळेस कंपनीच्या प्रगतीसाठी पुनर्गुंतवणूकीचा पर्याय वापरुन नफ्याची रक्कम कंपनीमधे गुंतवली जाते.
नक्की वाचा : आयपीओ आणि ग्रे मार्केट
3. लाभांश कधी दिला जातो?
- साधारणपणे लाभांश हा मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक किंवा नियमित अंतराने दिला जातो. लाभांश म्हणजे उत्पन्न समजले जाते.
- बऱ्याचवेळा गुंतवणूकदार लाभांश देणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत, याचा अभ्यास करून खरेदी करत असतात. तसेच अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड देखील डिव्हीडंड हा पर्याय बघून खरेदी करत असतात.
4. लाभांश मिळण्याचे फायदे काय आहे?
- लाभांश मिळाल्यामुळे गुंतवणूकदाराला ठराविक वेळेत किंवा नियमित अंतराने उत्पन्न मिळू शकते.
- एखादी कंपनी जेव्हा नियमित अंतराने किंवा ठराविक वेळेत लाभांश देते, याचाच अर्थ ती कंपनी आर्थिक दृष्ट्या मजबूत समजली जाते. यामुळे अशा कंपनीत गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदाराला केव्हाही फायदेशीर ठरतं.
- गुंतवणूकदारासाठी, लाभांश मिळणं ही मानसिक समाधान देणारी गोष्ट आहे. ज्याप्रमाने बोनस मिळाल्यावर कंपनीबद्दल शेअरधारकांमधे अधिक विश्वास निर्माण होतो, त्याचप्रमाणे लाभांश मिळाल्यामुळे सुद्धा शेअरधारकांमधे कंपनीबद्दल विश्वास वाढतो आणि याचा परिणाम गुंतवणूकदाराकडून कंपनीमधल्या गुंतवणुकीला अधिक चालना मिळते.
वाचनीय : एकत्रित निवृत्तीवेतन योजना
5. भारतामधल्या डिव्हिडंड देणाऱ्या काही कंपन्यांची नावं खालीलप्रमाणे :
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC)
- वेदांत लिमिटेड
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)
- चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
- कोल इंडिया लिमिटेड
- नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(एनएमडीसी)(NMDC)
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL)
- हिंदुस्तान झिंक लिमिटेड
6.काही महत्वाच्या कंपनी, लाभांश तारीख आणि लाभांश :
- माझगाव डॉक शिपबिल्डर : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Re.12.11)
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL) : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Re.1)
- हिंदुस्तान कॉपर : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Rs.0.92)
- अपोलो ट्यूब : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Rs.5.50)
- गुजरात अल्कली आणि केमिकल: या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Rs.13.85)
- सायबर टेक सिस्टम अँड सॉफ्टवेअर : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Rs.2)
- हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन : या कंपनीकडून लाभांश मिळण्यासाठी 19-09-2024 ही एक्स डेट आहे. (लाभांश- Rs.7)
Share this article on :