Arthasakshar Gold ETF Gold Fund
https://bit.ly/33T1hBC
Reading Time: 3 minutes

गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड 

गुंतवणूक करण्यासाठी शुध्द स्वरूपात सोने घेण्याच्या गोल्ड ईटीएफ (Gold ETF), गोल्ड फंड (Gold Fund), डिजिटल गोल्ड, ई गोल्ड व सुवर्ण सार्वभौम रोखे (SGB) अशा अनेक पद्धती उपलब्ध आहेत. यापैकी ई गोल्ड व सुवर्ण सार्वभौम रोखे (SGB) याबद्दल आपण माहिती घेतलीआहे. आज आपण गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड याबद्दल माहिती घेणार आहोत. या दोन्ही योजना या म्युच्युअल फंडाच्या योजनांशी मिळत्याजुळत्या आहेत. 

गोल्ड ईटीएफ (Gold ETF)

  • गोल्ड ईटीएफ योजनांची जवळपास सर्वच म्हणजे 95 ते 99% मालमत्ता ही शुद्ध स्वरूपातील 99.5% शुद्धता असलेल्या धातूरूपातील सोन्यामध्ये असते.
  • ही खरेदी रिजर्व बँकेने मान्यता दिलेल्या बँकेकडून केली जाते. बाकीची गुंतवणूक ही कर्जरोख्यात केली जाते. 
  • ईटीएफची मागणी आणि पुरवठा यातील समतोल राखण्यासाठी काही मध्यस्थाची अधिकृत नेमणूक केली असून ते जरूरीप्रमाणे त्यांची खरेदीविक्री करीत असतात. 
  • यामुळे सोन्याचा बाजारभाव आणि गोल्ड ईटीएफ यांच्या भावात फारसा फरक पडत नाही म्हणजे यात असलेला फरक हा टक्केवारीच्या स्वरूपात कायमच सारखा राहतो.
  • ईटीएफचे एक युनिट पूर्वी 1 ग्रॅम सोन्याची किंमत दाखवत असे, परंतू सोन्यात झालेली भाववाढ पहाता गुंतवणूकदारांच्या सोईच्या दृष्टीने काही योजनांनी छोटे युनिट उपलब्ध केले आहेत. 
  • गोल्ड ईटीएफची रचना म्युच्युअल फंडाच्या मुदतबंद (close ended fund)  योजनेशी मिळतीजुळती आहे. गोल्ड फंड हे आपली 95 ते 99 % गुंतवणूक गोल्ड ईटीएफ मध्ये करतात (FOF) तर 1 ते 5 % कर्जरोख्यात असते याची रचना म्युच्युअल फंडाच्या निरंतर (open ended fund) योजनेसारखी असते. 

गोल्ड ईटीएफ व गोल्ड फंड – महत्वाचे फरक (Gold ETF vs Gold Fund)

1. खरेदी विक्री

  • गोल्ड ईटीएफची खरेदी विक्री शेअर्स प्रमाणे बाजार भावानुसार होते.
  • गोल्ड फंडाच्या युनिटची खरेदीविक्री त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार होते.

2 व्यवस्थापन खर्च 

  • गोल्ड ईटीएफचा व्यवस्थापन खर्च खूप कमी आहे. 
  • गोल्ड फंड हा विविध ईटीएफ योजनेच्या फंडांचा फंड (Funds of funds) असल्याने त्याचा व्यवस्थापन खर्च ईटीएफहून अधिक आहे.

3. डी मॅट खाते

  • गोल्ड ईटीएफसाठी डी मॅट खाते असावे लागते.
  • गोल्ड फंडासाठी त्याची आवश्यकता नाही.

4. एसआयपी 

  • गोल्ड ईटीएफचे एसआयपी करता येत नाही. ते कधीही बाजारभावाने विक्री किमतीतच घ्यावे लागतात. हे युनिट खरेदी केलेल्या, अस्तित्वात असलेल्या सोन्याच्या बदल्यात, एकदाच सुरवातीलाच निर्माण जातात. 
  • गोल्ड फंडात एसआयपी करता येणे शक्य आहे.

 तरलता आणि परतावा (Gold ETF /Gold Fund – Liquidity and Returns)

  • या दृष्टीने गोल्ड फंडापेक्षा ईटीएफ काकणभर सरस आहेत.
  • गोल्ड ईटीएफचे रूपांतर खऱ्या सोन्यात करता येऊ शकते. भविष्यकालीन सोन्याची गरज म्हणून याकडे पाहता येईल.
  • आवश्यक ईटीएफ जमवून ते धातुरुपात नंतर बदलता येतील. 
  • बहुतेक ईटीएफ निर्माते 1 किलो सोन्याएवढे ईटीएफ युनिट धातुरुपात देतात. अधिकाधिक लोक या योजनेकडे आकर्षित होण्यासाठी अनेक योजनाधारकांनी याहून कमी युनिट धातुरुपात बदलून देण्याची सोय केली आहे. 
  • याशिवाय ईटीएफ/युनिट यांची विक्री करून मिळालेल्या पैशातूनही सोन्याची खरेदी करता येऊ शकेल.
  • गोल्ड फंड अशी सवलत देत नाहीत. जर गुंतवणूक म्हणून याचा विचार करीत असाल तर धातुरुपात बदलून घेण्याची सवलत विचारात घेण्याची आवश्यकता नाही. 
  • गोल्ड ईटीएफ पेक्षा कमी रकमेची गुंतवणूक गोल्ड फंडात करता येते. आता काही ईटीएफ योजना 1/100 ग्रॅममध्ये उपलब्ध झाल्याने अल्प रकमेत ईटीएफही उपलब्ध झाले आहेत.
  • सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ? हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो परंतू गुंतवणूक म्हणून सोन्याने दीर्घकाळात 10% हून अधिक परतावा दिलेला आहे जो नक्कीच विचार करण्यासारखा आहे. 
  • याशिवाय अधूनमधून यात होणारे तीव्र चढउतार हे शेअरबाजारातील चढउतारीहून अधिक आहेत, जे गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात. 
  • पेटीएम, गुगल पे, फोन पे या सारख्या वॉलेटनी अगदी ₹1/- इतक्या कमी मूल्यात डिजिटल स्वरूपात सोने खरेदी/ विक्रीची सोय उपलब्ध करून दिली आहे. 
  • या सर्व प्रकारात 3 वर्षाच्या आत झालेला भांडवली नफा-तोटा हा अल्पमुदतीचा त्यावर नियमित दराने मोजणी व कर आकारणी तर त्यावरील कालावधीतील भांडवली नफातोटा दीर्घमुदतीचा समजला जाऊन नफ्यावर 10% किंवा चलनवाढीचा फायदा घेऊन काढलेल्या नफ्यावर 20% दरांनी याप्रमाणे करआकारणी होते. 
  • केवळ  8 वर्ष मुदत पूर्ण झालेल्या सुवर्ण सार्वभौम रोख्यांवरील दिर्घमुदतीचा भांडवली नफा पूर्णपणे माफ आहे.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Gold ETF and Gold Fund Marathi Mahiti,  Gold Fund and Gold Fund Marathi, Gold ETF and Gold Fund in Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…