Reading Time: 2 minutes
सोने कर्जपुरवठा करणाऱ्या मणप्पुरम फायनान्स कंपनीचे पहिल्या तीमाहीचा निकाल जाहीर झाला आहे. आणि मणप्पुरम फायनान्सला तब्बल Rs. 555 कोटी इतका नफा झाला आहे. मागच्या वर्षीचा नफा Rs. 498 कोटी इतका होता , म्हणजेच मागच्या वर्षीसोबत तुलना केली तर निव्वळ नफ्यामधे जवळपास 11.8 % इतकी वाढ झाली आहे.
- सोन्याच्या किमती मागच्या वर्षीच्या तुलनेत 20 % पेक्षा जास्त वाढल्या आहे. त्यामुळे सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्यांसाठी आणि ठेवणाऱ्यांसाठी ही गोष्ट सकारात्मकच मानली गेली.
- भारतीयांचा सोन्याकडे पाहण्याचा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे, त्यामुळे बरीच मंडळी कर्ज घेताना सोन्याच्या पर्यायाचा विचार करत नाही. सोन्यामधली गुंतवणूकी ही संपत्ती साठवणूक आणि मुख्य करून लग्नकार्याची सोय या उद्देशाने केली जाते.
- पण दिवसेंदिवस वाढत जाणारे कर्जाचे दर कर्ज घेण्यासाठी अवघड होत चालले आहे, याच्या तुलनेत सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा दर हा कमी आहे.
- त्यामुळे खासगी कर्ज, गृहकर्ज या आणि इतर पर्यायांपैकी सोने तारण कर्ज हा पर्याय सोयीचा आणि सोपा होत चालला आहे. तसेच आपल्याकडील असणारे पारंपरिक दागिने हे आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकतात हा विचार करणारे ‘कर्जवंत’ आजकाल वाढत आहे.
- सोने तारण ठेवण्यासाठी नियम काय आहेत?
- सोन्याचे वजन आणि सोने किती कॅरेटचे आहे यावरून कर्ज देण्याची रक्कम ठरत असते.
- आरबीआयच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी अमुक-अमुक इतक्या वजनाचे सोने घेऊन आल्यानंतर त्या दागिन्यांची जी काही रक्कम होत असेल त्याच्या 75 % रक्कम कर्ज म्हणून त्या व्यक्तीला दिली जाते.
- गोल्ड लोन घेताना तुमच्याकडील सोन्याचा दागिना हा 18 किंवा त्यापेक्षा अधिक कॅरेटचा असावा लागतो. तरच तुम्हाला सोन्याच्या दागिन्यावर कर्ज मिळू शकते.
- सोने तारण ठेवताना होणारी फसवणूक:
- सोने तारण ठेवताना बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडे जात असाल तर आरबीआयचे सर्व नियम पाळून तुम्हाला कर्ज दिले जात आहे का याची खात्री करून घ्या.
- तुमच्याकडे असणारे दागिने किती कॅरेटचे आहे याची फेर तपासणी करा.
- सोने तारण ठेवणारी संस्था तुम्हाला दागिन्यांच्या बदल्यात जी काही रक्कम देणार आहे ती तुमच्या दागिन्यांच्या योग्य दर्जानुसार आहे का हे तपासून बघा. बऱ्याच वेळा 22 कॅरेटचे दागिने 20 कॅरेटचे आहे असे भासवून त्यानुसार कर्जाची रक्कम कर्जदाराला दिली जाते.
- थोडक्यात ग्राहकाला कमी पैसे मिळतात. ही फसवणूक होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.
- बहुतेक वेळा कर्ज देणारी संस्था जास्त दराने देखील कर्ज देऊ शकते. त्यामुळे कर्जदाराचे नुकसान होऊ शकते. कारण अजूनतरी सोने कर्जासाठी ठराविक आणि सर्वमान्य असा दर अस्तित्वात नाही.
महत्वाचे : कर्ज घेताय मग ‘ केएफएस ‘ स्टेटमेन्ट घ्याच !
- सोने तारण ठेवण्यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक असतात?
- आधार कार्ड /मतदार ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कुठलाही ओळखीचा पुरावा आवश्यक आहे.
- रहिवासी पुरावा यामध्ये आधार कार्ड /लँड-लाईनचे बिल /विज बिल /भाडे करार / बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- पॅन कार्ड/ पॅन कार्ड नसल्यास फॉर्म 60 आवश्यक आहे.
- सोने तारण कर्ज घेताना आवश्यक असणारी इतर शुल्क :
- सोनेतारण देणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून प्रक्रिया शुल्कही घेण्यात येते. ज्याप्रमाणे विविध बँकांचे कर्जाचे दर वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रक्रिया शुल्क देखील वेगवेगळे असू शकत.
- साधारणपणे 0.5 % किंवा 5000 रुपयांपर्यंत प्रक्रिया शुल्क कर्जदाराकडून घेण्यात येते.
हे वाचा : डिजिटल सोने म्हणजे काय रे भाऊ ?
- खाली काही बँकांचे आणि वित्त संस्थांचे सोने तारण ठेवण्यासाठीचे कर्जाचे दर दिले आहेत.
बँकेचे नाव | व्याज दर | कर्जाचा कालावधी |
एचडीएफसी गोल्ड लोन | 11% to 16% p. a. | 3 ते 24 महिने |
एक्सेस गोल्ड लोन | 17% p. a आणि पुढे | 6 ते 36 महिने |
कॅनडा गोल्ड लोन | 9.60% p. a. | 12 ते 24 महीने |
बँक ऑफ बडोदा गोल्डन लोन | 9.15% p. a आणि पुढे | 12 ते 36 महीने |
#सोने कर्जपुरवठा
#सोने तारण ठेवण्यासाठी नियम
#rules for gold loan
#सोने तारण ठेवताना होणारी फसवणूक
#fraud in gold loan
Share this article on :