कर्ज वसुली : वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच

Reading Time: 3 minutes

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच

सलग सहा महिने कर्जाचा हप्ता न भरल्यास पुन्हा हप्ता वेळेवर भरण्यासाठी बँक २ महिन्यांचा जास्त वेळ देते. अनेकदा सुरुवातीला अगदी नियमित हप्ते भरलेही जात असतात पण अचानक काही आर्थिक अडचणी आल्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये दिरंगाई होऊ लागते. सलग तीन महिने हप्ता न भरल्यास बँक आधी तोंडी आणि मग लेखी समज देऊन लवकरात लवकर हप्ता भरण्यास सांगते. 

कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

खालील अडचणींमुळे हप्ता भरायला दिरंगाई होऊ शकते:

 1. एखादा अपघात व त्यामुळे वाढलेला खर्च.
 2. अचानक एखादी शारीरिक समस्या उद्भवणे जसे की पक्षाघाताचा झटका, हृदयरोग, क्षयरोग इ.
 3. नोकरी गमावणे.
 4. बाजारपेठेमध्ये अचानक मंदी येणे.
 5. घरातील एकूण कमावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत घट होते आणि त्यामुळे एकाच व्यक्तीवर सर्व खर्चाचा भार येऊ लागतो.

बँकेशी संपर्क साधा :

 • जेव्हा तुमच्या लक्षात येते की आता बँकेचे हप्ते भरणे कठीण होणार आहे तेव्हा विनासंकोच तुम्ही बँकेशी संपर्क साधून त्यांच्यासोबत याबद्दल चर्चा करून सल्ला घेतला पाहिजे. 
 • यामध्ये बँक तुमची अडचण समजून घेऊन सुयोग्य तोडगा काढू शकते. 
 • यामध्ये बँक तुम्हाला काही दिवसांची तुम्हाला मुदत देते किंवा कर्ज परतफेडीच्या एकूण हप्त्यांची संख्या वाढवून तुमच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी करते. 
 • वेळेवर नियमित कर्ज परतफेडीचे हप्ते न भरल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील खाली येतो
 • जर बँकेशी काहीही संपर्क न साधता अथवा बँकेला विश्वासात न घेता कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत, तर मात्र बँकेने कर्ज वसुलीसाठी नेमलेल्या खाजगी लोकांचा तुम्हाला सामना करावा लागतो.
 • अनेकदा या कर्ज वसुली करणाऱ्या लोकांकडून मिळणारी वागणूक अत्यंत अपमानास्पद आणि त्रासदायक असते.
 • या वसुली करणाऱ्या व्यक्तींच्या अनेक प्रकारच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे गेल्यावर यासाठी वेगळे नियम व कायदे लागूकरण्यात आले.

कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा

‘आरबीआय’च्या  नियमावली नुसार बँका कर्ज वसुली करण्यासाठी खाजगी कंपन्यांना कामे देऊ  परंतु अशा वेळी बँकेने काही अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे, त्या अटी म्हणजे:

 1. कर्जाच्या वसुलीसाठी ज्यांना एजंट्स म्हणून नेमण्यात येणार आहे अशा खाजगी कंपन्यांची नावे बँक आणि NBFC च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करावी लागतील
 2. वसुली एजंट्स वसुलीसाठी गेल्यावर ते ज्या बँक अथवा NBFC कडून आलेले आहेत तिचे नाव ग्राहकांना दाखवावे लागेल.
 3. अशा वसुलीच्या सूचनेसंदर्भातील पत्रक बँकेने कर्ज मंजूर केल्यावर, पण पैसे देण्याआधी ग्राहकाला बँकेच्या अथवा NBFC च्या लेटरहेडवर  द्यावे लागेल.
 4. कर्जाच्या करारपत्रकाची एक प्रत बँकेला संबंधित ग्राहकाला कर्ज प्रमाणित केल्यावर अथवा कर्जाचे पैसे द्यायच्या वेळी अनिवार्य असेल.
 5. बँक अथवा NBFC कडून तक्रार निवारण यंत्रणेबाबत जनजागृती करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जातील.

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

यासोबतच रिझर्व्ह बँकेने ग्राहकांनाही त्यांना या वसुली करणाऱ्या कंपन्यांचा काही त्रास झाल्यास त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही अधिकार दिले ज्याचा वापर ग्राहक अगदी हक्काने करू शकतात, तर रिझर्व्ह बँकेने खालील अधिकार ग्राहकांना अदा केले आहेत-

 1. वसुलीसाठी आलेल्या लोकांच्या ओळखीची खातरजमा करून घेणे.
 2. तुमच्या कर्जाबद्दल तुमचे नातेवाईक, मित्र, शेजारी अशा कोणालाही काहीही सांगण्याचा अधिकार यांना अजिबात नाहीये त्यामुळे त्यांनी तसे केल्यास तुम्ही बँकेकडे त्यांची तशी तक्रार करू शकता.
 3. त्रास देणारे हे एजंट्स तुम्हाला फक्त तुम्ही दिलेल्या फोन क्रमांकावरच संपर्क साधू शकतात.
 4. अशा बँक आणि कर्ज वसुली करणाऱ्या कंपनीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणे
 5. या एजंट्सना तुमच्याशी सभ्य वर्तनच करावे लागेल. कोणतीही आक्षेपार्ह भाषा, धमकी, मारहाण करणे, तुम्हाला त्रास देण्याच्या दृष्टीने त्यांची ओळख न सांगता सतत फोन करणे, असे काहीही या एजंट्सने केल्यास तुम्ही त्यांच्यासोबत तुम्हाला कोणताही संपर्क न ठेवण्याबाबत बँकेला कळवू शकता आणि याची योग्य ती तपासणी बँकेला करणे अनिवार्य आहे.
 6. तुम्ही बँक लोकपालांकडे देखील यासाठी जाऊ शकता.

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

 1. या एजंट्सच्या कोणत्याही गैरवर्तनाबद्दल तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकता.
 2. एजंटने तुम्हाला केव्हा आणि किती वेळा संपर्क साधला, किती वेळा फोन केला, फोनवर काय बोलणे झाले याची माहिती तुम्ही माहितीच्या अधिकारान्वये बँकेकडून मिळवू शकता. बँकेला या सर्वांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.
 3. जर कर्ज वसुली चुकीच्या माहितीवर आधारित असेल ज्यामुळे आपला सिबिल (CIBIL) स्कोअर गमावला असेल तर तुम्ही बँक आणि रिकव्हरी एजन्सी विरूद्ध मानहानिचा दावा दाखल करू शकता.
 4. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घटना घडल्यास, एजंट्स तुमच्याकडे कर्जाच्या परतफेडीची मागणी करू शकत नाहीत. काही दिवस तुम्हाला संपर्क न साधण्याबद्दल देखील तुम्ही त्यांना सांगू शकता.
 5. जी रक्कम तुम्ही घेतलेली नाही अशी कोणतीही रक्कम या एजंट्सना देऊ नका

होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा

थोडक्यात सांगायचे तर, कर्जाचे हप्ते नियमित वेळेवर भरावेत आणि काही कारणामुळे हे शक्य होत नसल्यास बँकेशी तसा संपर्क साधावा. तरीही बँकेने नेमलेल्या वसुली एजंट्सकडून काही त्रास होत असेल, तर तो सहन न करता रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचा विनासंकोच वापर करावा.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *