परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक
https://bit.ly/2GO19tJ
Reading Time: 3 minutes

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल? 

आपली गुंतवणूक विविध प्रकारच्या साधनात विभागून असावी असे सर्व गुंतवणूक तज्ज्ञ सांगत असतात. जगात नावाजलेल्या कंपन्यांमध्ये  गुंतवणूक करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. अनेक ब्रोकर्स, वित्तसंस्था, खाजगी बँका, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आणि परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देणारे स्टार्टअप उद्योग यांच्या माध्यमातून आपल्याला अशी गुंतवणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करता येणे आता सहज शक्य आहे. 

हे नक्की वाचा: सब-ब्रोकर बनायचे आहे? मग या गोष्टी ठेवा लक्षात

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक

 • युरोप, अमेरिका त्यातल्या त्यात अमेरिकेत आपली काहीतरी गुंतवणूक असावी. केओ, फेसबुक, गुगल, अँपल, जनरल मोटर्स, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, टेक्सला, कॉलकॉम, झूम, बर्कशियर हॅतवे, विसा इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचे भारतीयांना सुप्त आकर्षण आहे.
 • भारतीय रिजर्व बँकेने प्रत्येक भारतीयाला दरवर्षी Liberalized Remittance Scheme (LRS) या  योजनेअंतर्गत कोणत्याही परवानगी शिवाय अडीच लाख डॉलर्स भारताबाहेर नेण्याची परवानगी दिली असल्याने विना अडथळा गुंतवणूक रक्कम उपलब्ध असते. 
 • ही मर्यादा  जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या आसपास असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने ती अमर्यादच आहे म्हणायला हवं. 

शेअरबाजार २०१९ / २०२०

 • सन 2019 च्या जागतिक क्रमवारीनुसार मुंबई शेअर बाजार 10 व्या, तर राष्ट्रीय शेअरबाजार 11व्या स्थानावर आहे. 
 • भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीत 22% परदेशी गुंतवणूक असताना जागतिक क्रमवारीत अग्रणी असलेल्या बाजारातही आपली काही गुंतवणूक का नसावी?  
 • त्यातून किती परतावा मिळेल आणि किती धोका स्वीकारावा लागेल याच्या शक्यतांबाबत विचार करून आपली प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष गुंतवणूक विदेशी शेअर, ईटीएफ, युनिट, एडीआर, जीडीआर सारख्या माध्यमातून करण्यासाठी अनेकांनी आपली गुंतवणूक खाती मोठ्या प्रमाणात उघडली आहेत. 
 • कोविड-19 संकटानंतर जगभरात जवळपास प्रत्येक देशाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर तेथील शेअरबाजारानी नीचांकी पातळी गाठली. 
 • यानंतर अर्थव्यवस्थेस गती आणण्यासाठी तेथील सरकारने जे काही उपाय योजले, त्याच्या अनेक बऱ्यावाईट परिणामांपैकी महत्वाचा परिमाण हा तेथील शेअर बाजारावर झाला.  
 • बहुतेक देशातील बाजार निर्देशांक हे मार्च ते जुलै या चार ते पाच महिन्याच्या काळात आपल्या पूर्वीच्या पातळीजवळ आले. 
 • काहींनी नवा उच्चांक नोंदवला तर अनेक बाजार आपल्या सर्वोच्च पातळीखाली  रेंगाळत असून ते या वर्षांअखेरपर्यंत आपली आजवरची सर्वोच्च पातळी तोडून नवीन उच्चांक नोंदवतील. 
 • अशा तऱ्हेने सन 2020 यावर्षीची नोंद इतिहासात ‘बाजार वर्षभराचा किंवा मागील काही वर्षांचा नीचांक आणि आतापर्यंत नोंदवण्यात आलेला सर्वोच्च निर्देशांक’ अशा अभिनव स्वरूपात होणार आहे. 
 • बाजार निर्देशांक कायम वरखाली होत राहण्याचे प्रमाण अन्य देशात आपल्या तुलनेने कमी असल्याने, जगभरातील अन्य प्रमुख यशस्वी कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असावेत त्यामुळे गुंतवणुकीत विविधता येईल असे गुंतवणूकदारांना वाटू लागले आहे.

संबंधित लेख: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे?  

 भारतीय शेअरबाजाराच्या तुलनेत अमेरिकन शेअर बाजाराचे वैशिष्ठये-

 • यापूर्वी म्हटल्याप्रमाणे बाजार मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता कमी.
 • नियमकांच्या वर्चस्वामुळे बऱ्यापैकी नियंत्रित, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची अत्यंत शक्यता कमी.
 • डॉलरची रुपयाशी केलेल्या तुलनेत गेल्या 10/12 वर्षात भारतीय बाजारापेक्षा मिळवलेला अधिक आकर्षक परतावा. 
 • अनेक भविष्यवेधी कंपन्यामध्ये त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करता येणे शक्य.

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल?

प्रत्यक्ष गुंतवणूक

१. परदेशातील गुंतवणुकीचे खाते आपल्या देशातील ब्रोकरमार्फत उघडणे: 

 • अशा प्रकारचे खाते आपला ब्रोकर उघडून देत असल्यास तो येथे मध्यस्थ म्हणून सब ब्रोकर्सचे काम करून असतो. 
 • मोठ्या ब्रोकिंग फर्म, खाजगी बँका यांनी अशी सोय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
 • अशी सुविधा आपल्या ब्रोकरकडे असेल, तर त्याला काही अधिकची कागदपत्रे देऊन ती सुरू करता येईल. ही सुविधा घेतल्यास यासंबंधात तुलनात्मक चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रश्नांची उत्तरे शोधावीत-
  • कोणते व्यवहार करता येतील? 
  • कोणते करता येणार नाहीत? 
  • दरवर्षी किमान किती रकमेचे व्यवहार करायला लागतील? 
  • त्यासाठी दलाली म्हणून किती रक्कम द्यावी लागेल? व्यवहार दलाली आणि रुपया डॉलर्स मध्ये बदलणे व डॉलर्स रुपयात बदलणे यासाठीचा खर्च किती? 
  • याशिवाय ही सुविधा घेण्यासाठी काही वार्षिक रक्कम द्यावी लागेल का? 

२. परदेशातील ब्रोकरच्या भारतातील फर्म मधून परदेशात गुंतवणूक करण्याचे खाते उघडणे: 

 • अनेक परदेशी ब्रोकिंग फर्मने भारतीय गुंतवणूकदारांसाठी महानगरातून त्यांची कार्यालये सुरू केली आहेत. 
 • याची फी, चार्जेस आणि अटी तपासून त्या मान्य असतील तर त्याच्याकडे खाते उघडावे. 

इतर लेख: इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?

अप्रत्यक्ष गुंतवणूक –

१. विदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे युनिट घेणे – 

 • आपण ज्याप्रकारे म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक करतो त्याच प्रकारच्या या योजना असून फक्त त्यांच्याकडील जमा रकमेतून विदेशी बाजारात गुंतवणूक केली जाते. 
 • यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून आपले काम सोपे होईल याशिवाय परदेशी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेगळे खाते उघडण्याची जरुरी पडणार नाही. 
 • ही सुविधा आपणास देशी आणि विदेशी दोन्ही ब्रोकर्स कडून मिळू शकते.

२. ईटीएफ खरेदी करणे – 

 • प्रत्यक्ष शेअरबाजारात गुंतवणूक न करता भारतातील देशी, परदेशी ब्रोकर्स कडून ईटीएफ घेणे. 
 • हे ईटीएफ परदेशी एक्सचेंज वरील शेअर किंवा इंडेक्स यांचे असू शकतात आणि ते स्वदेशी अथवा विदेशी फर्मने पुरस्कृत केलेले असू शकतात.

स्टार्टअप उद्योग: 

 • परदेशातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणुकीची आपली गरज भागवू शकणारे स्टार्टअप उद्योग चालू करून गुंतवणूकदारांना परदेशातील उद्योगात, शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी, काही व्यावसायिकांनी मर्यादित जबाबदारीच्या एकल अथवा भागीदारी कंपन्या स्थापन केल्या असून त्यांच्यामार्फत गुंतवणूक करता येणे शक्य आहे. 
 • यासाठी गुंतवणूकदाराला सहज वापर करता येऊ शकेल अशा पची, पोर्टलचीदेखील निर्मिती केली आली असून, यात अनेक सोई सवलती देण्यात आल्या आहेत. 

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक – काही महत्वाचे मुद्दे –

 • जे लोक येथिल बाजाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेवून असतात त्यांनी थेट गुंतवणूक करण्याचा विचार करावा. 
 • ट्रेडिंग करणार असाल तर आपण किती रक्कम गुंतवणार? आपल्याला किती रक्कम मिळणार आणि त्यासाठी किती पैसे खर्च होणार? त्याचप्रमाणे यातून मिळालेला फायदा व त्यावरील कर याचाही विचार करावा. 
 • अल्पकालीन भांडवली नफा म्हणजे 2 वर्षाच्या आत होत असल्यास इतर उत्पन्न समजून त्यावर करपात्र उत्पन्नानुसार कर द्यावा लागेल तर दोन वर्षांनंतर मिळालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 20% या सवलतीच्या दराने कर भरावा लागेल. 
 • परदेशात आपला कर कापून गेला असल्यास भारतात पुन्हा कर कापून आपला कर दोनदा कापला जाऊ नये म्हणून अशा कापलेल्या कराचे क्रेडिट आपल्याला येथे मिळू शकते मात्र यासाठी संबंधित देशाशी Dobal Taxation Avoidance Agreement (DTAA) झालेले असल्याची जरुरी आहे. 

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…