Safe Trading
Reading Time: 3 minutes

Safe Trading

शेअर बाजारात गुंतवणूक करताना सुरक्षित ट्रेडिंग (Safe Trading) कसे करावे? हा प्रश्न ज्या गुंतवणूकदारांना पडतो, तोच खरा सजग गुंतवणूकदार. सामान्यपणे ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आपल्या गुंतवणुकीवर गलेलठ्ठ रिटर्न (ROI) मिळवणे हा असतो. दुर्दैवाने, अनेक घोटाळेबाज आणि फसव्या लोकांना या सुलभ पैशाच्या मोहात संधी दिसते. वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा गुंतवणूकदारांना पूर्ण अधिकार आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. आजच्या लेखात सुरक्षित ट्रेडिंगसाठी काही टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मार्केटमधील घोटाळ्यांबाबत सावध होऊ शकाल आणि सुरक्षित ट्रेडिंग करू शकाल.

हे नक्की वाचा: Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे? 

1. सल्ला देणाऱ्यांपासून सावध रहा: 

  • आजकाल शेकडो, हजारो फसव्या व्यक्ती सल्लागार आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञाच्या रूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात. 
  • सामान्यतः असे सल्लागार विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दबा धरून बसलेले असतात. जर त्यांना ओळखण्याची क्षमता तुमच्यात नसेल तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता खूप जास्त असते. 
  • नवख्या गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगचे बारकावे जाणून घेण्यासाठी सेबीने प्रमाणित केलेल्या गुंतवणूक सल्लागारांची नेमणूक करावी. कारण पैशाच्या लोभाने इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवलात तर, तुम्ही फसव्या लोकांचे सहज आणि सोपे लक्ष्य बनता. 
  • तुमच्या वतीने निष्णात ट्रेडर्सनी ट्रेडिंग करण्याची कल्पना तुम्हाला सोयिस्कर वाटू शकते, पण त्यामुळे कदाचित तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. 
  • हे फसवे लोक खोटे ट्रेडिंग व्यवहार दाखवून तुमच्या खात्यात तोटा दाखवतात आणि तुमचे पैसे अन्य ट्रेडिंग खात्यात हस्तांतरित करतात. 
  • यात सगळ्यात त्रासदायक गोष्ट ही असते की, तुम्ही यासंदर्भात पूर्णपणे अंधारात राहता. तुमच्याबाबतीत असा घोटाळा झाला असल्याचा मागमूसही तुम्हाला लागत नाही.
  • यावरचा उपाय म्हणजे, आपले लॉग-इन तपशील कोणालाही न देणे. कारण त्यामुळे कोणतीही तिर्‍हाईत व्यक्ती तुमच्या वतीने ट्रेडिंग करू शकते. 
  • तुम्हाला नीट माहिती नसेल असे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करू नका. लॉग-इन तपशील चुकीच्या व्यक्तीला मिळाल्याने जर तुम्हाला काही तोटा झाला, तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.
  • थोडक्यात म्हणजे, सर्वात योग्य मार्ग हाच आहे की, तुम्हाला व्यवस्थित ठाऊक असेल अशाच ठिकाणी ट्रेडिंग करा आणि तिर्‍हाईत व्यक्तीला यात प्रवेश देऊ नका.

इतर लेख: गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

Pump & Dump schemes: पंप अँड डम्प  योजनांपासून सावध रहा

  • अनेक चित्रपटांनी पंप अँड डम्प योजनांच्या चलनावर प्रकाश टाकला आहे आणि हे आता आर्थिक जगतासाठी काही नवे राहिलेले नाही. परंतु, माणसाचा लोभ अशा अवैध कार्यपद्धतींना खत-पाणी घालतो. 
  • हा प्रकार मायक्रो आणि स्मॉल-कॅप स्टॉक्सच्या बाबतीत राबवला जातो, कारण ते सोपे असते.
  • ज्याला ऑनलाइन ट्रेडिंगची इत्यंभूत माहिती आहे आणि भाव वाढण्याच्या आशेने  गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करण्यासाठी पटवण्याची कला ज्याला अवगत आहे, तो हे सहज करू शकतो.
  • मूलतः ही योजना राबवण्यासाठी घोटाळेबाज कमी प्रमाणात ट्रेड होत असलेला स्टॉक मोठ्या संख्येत खरेदी  करतात, त्यामुळे त्याची किंमत अचानक जोरात वाढते. 
  • यात हे लोक ऑनलाइन असे मेसेज देखील पोस्ट करतात, या मेसेजमध्ये, “आतली बातमी मिळाली असून त्या शेअरचे भाव खूप वाढणार आहेत” अशा प्रकारचा तपशील लिहिलेला असतो. 
  • याला बळी पडून गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली की, घोटाळेबाज आपले शेअर्स विकून टाकतात. त्यामुळे भाव पडतो आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होते.
  • शेअरचे भाव चढण्याचे भाकीत करणार्‍या सूचनांपासून सावधान राहण्यात शहाणपण आहे. अशा  प्रकारचे मेसेज/ सूचना यांचा स्रोत नेहमी तपासून बघा आणि धोक्याची सूचना ओळखा. 
  • अशा सूचना सर्वसाधारणपणे पेड प्रमोटर्स आणि आतल्या लोकांकडून येतात. जर एखादा ईमेल किंवा न्यूजलेटर याबद्दल काही-बाही सांगत असेल आणि त्याच्याशी संबंधित धोक्याचा उल्लेखही करत नसेल, तर ती धोक्याची सूचना आहे हे जाणून सावध व्हा. 
  • शेअर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्या स्टॉकचा अभ्यास करणे नेहमीच हितावह आहे. 

संबंधित लेख: शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

थोडक्यात महत्वाचे:

  • गुंतवणूक करताना सावध राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे, अशा टिप्सवर विश्वास ठेवू नका, ज्या झटपट आणि भरमसाठ परताव्याची हमी देतात. 
  • गुंतवणूक करण्यापूर्वी शक्य तेवढा अभ्यास स्वतःच करा. प्रचार करणारी न्यूजलेटर्स, सूचना आणि ईमेल यांच्या बाबतीत व्यवसाय आणि प्रमोटर्सच्या अस्सलतेची खात्री करून घ्या. 
  • हे लक्षात ठेवा की, बरेच घोटाळेबाज शॉर्टकोड वापरुन एसएमएस पाठवतात, ज्यामुळे एखादी प्रतिष्ठित ब्रोकरेज कंपनी असल्याचा आभास होतो. 
  • सर्वात महत्वाचे म्हणजे, पेनी  स्टॉकपासून लांब राहा. आपले पैसे गमावण्याची तुमची तयारी असली तरच त्यात गुंतवणूक करा.

वरील लेखावरून तुम्हाला सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे, ते करताना कोणती सावधगिरी बाळगावी यासंदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडायचा आम्ही प्रयत्न केला आहे. परंतु, फसवणूक करणाऱ्यांकडे लाखो मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे लोभाला बळी न पडता तुम्ही सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. 

– एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Title: How to Trade safe? Marathi Info,  How to Trade safe? in Marathi, How to Trade safe? Marathi Mahiti, safe trading Marathi, safe trading kase karayche?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…