भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस

Reading Time: 2 minutes
  • भारत जागतिक पातळीवर यशाचे शिखर पदांक्रांत करत असताना भरताने आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आली आहे.
  • ब्लूमबर्गच्या संकलित माहितीनुसार, सात वर्षात भारताने प्रथमच यूरोपीय अर्थव्यवस्थेला थोड्या फरकाने मागे टाकले. थोड्या फरकाने का होईना पण भारतीय अर्थव्यवस्थेचं हे मोठं यश आहे. हे निर्विवाद सत्य आहे.
  • ब्रेक्सिटमुळे म्हणजे यूरोपीय महासंघातुन, ब्रिटनच्या गच्छंतीमुळे, प्रथम  सात क्रमांकातील अर्थव्यवस्था असलेल्या देशांत फ्रांस आता यूरोपीय अर्थव्यवस्थेमध्ये अग्रेसर आहे. यूरोपीय संघाच्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व आता फ्रांस करतंय.
  • भारताच्या या यशामुळे आणि यूरोपीय संघाच्या काहीशा  पिछाडीमुळे त्यांचे ब्रिटनशी पुढील अर्थसंबंध कसे असतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय इटलीसोबत बजेट वाटपावरून वाद होतोय, स्पेनसुद्धा यूरोपीय महासंघातुन बाहेर पडण्याचा विचार करत असल्याने स्पेनसोबतही युरोपियन संघाचा वाद सुरू आहे.
  • यावर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी मालाच्या विरोधात स्वदेशी मालाच्या संरक्षणासाठी लादलेले नियम याशिवाय चीनच्या आयात मालावर दंडात्मक जकात या धोरणांमुळे ज्या देशांची अर्थव्यवस्था निर्यातीवर जास्त अवलंबून आहे ते साशंक झाले आहेत.
  • जर्मनी आपल्या स्थानीय उत्पादनाच्या निर्यातीवर ३८% महसूल प्राप्त करतं. या मानाने भारत देश स्थानीय उत्पादनाच्या भरवशावर ११% कमावतो. हे वर्ल्ड बँकेने दिलेल्या माहितीचे आकडे आहेत. यावरून एक लक्षात येतं की बहुतेक संधी ह्या देशातील स्थानिक उद्योजकतेवर अवलंबून असतात.

स्थानिक उद्योजकतेमुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत चालली आहे. यावर्षी ७.३% ने अर्थव्यवस्था वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यापुढे जर्मनीची अर्थव्यवस्था मात्र यावर्षी १.३% वाढणार सांगितलं जातंय. यावरून कळून येतं की भारताने जर्मनीला मागे टाकलंय.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2QPVm66 )

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?पेनी स्टॉकची माहिती

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.