Reading Time: 2 minutes
(Mutual fund and Compounding interest details in Marathi) 

वरील आलेखावरून तुम्हाला चक्रवाढ व्याज दराचा आणि सरळ व्याजदर यातील परताव्याचा अंदाज आणि फरक दिसून येईल.  

  • म्युच्युअल फंड चे कॅल्क्युलेटर वापरून आपण चक्रवाढ पद्धतीची माहिती करून घेऊ शकतो. 
  • म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यानंतर आपल्याला नफा होण्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. 
  • नफा मिळवण्याचा आलेख हळूहळू चढत असेल तरी चक्रवाढ पद्धतीने कालांतराने मिळणारा परतावा हा आश्चर्यचकित करणारा असतो.  
  • अर्थात गुंतवणूक म्हटली की जोखीम ही येणारच! 
  • योग्य म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असणे म्हणजे तुमचे गुंतवणुकीचे ध्येय वेळेत साध्य करायला मदतच आहे. 
  • म्युच्युअल फंड बद्दल वैयक्तिक माहिती आणि अभ्यास असणे केव्हाही गुंतवणूकदाराला फायदेशीर ठरते.  

उदाहरणार्थ,

  1. समजा तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी 1 करोड रुपये असावेत असं वाटते. यासाठी तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्यासाठी किती पैसे लागतील? त्याचा व्याजदर किती असावा लागेल? 

हे उदाहरण व्यावहारिकदृष्ट्या काहीसे बरोबर वाटणार नाही कारण या प्रश्नाचे उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. 

  1. म्युच्युअल फंड च्या SIP मधून तुम्ही 25 वर्षांमध्ये, मासिक हप्ता Rs.30,000 भरून 5 करोड रुपये मिळवू शकतात,12% वार्षिक व्याजदराने!

   ही  आकडेमोड आपण चक्रवाढ व्याज दार वापरून कशी येऊ शकते हे बघूया. 

  • SIP साठी Rs 30,000 मासिक गुंतवणूक 12% वार्षिक व्याजदराने केली तर 1 करोड रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अंदाजे 12 वर्ष लागतील. 
  • 1 करोड रुपयांचे 2 करोड होण्यासाठी तुम्हाला आणखी 5 वर्षे लागतील. त्यानंतर मात्र चक्रवाढ व्याज दराच्या मदतीने तुम्ही 3 वर्षात 3 करोड आणि पुढचे 1 करोड साठी अंदाजे 2 वर्ष लागणार.  
  •  4 करोड चे 5 होण्यासाठी 2 वर्ष पेक्षा ही कमी कालावधी लागेल.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा पर्याय:
(Investments in Mutual Fund) 
  • म्युच्युअल फंड मध्ये केली जाणारी गुंतवणुक ही सुरक्षित मानली जाते. 
  • शेअर बाजारातील कंपन्यातील सहभागामध्ये एकत्रितरित्या गुंतवणुक करणे जोखमीचे असते. 
  • एकाच कंपनी मध्ये सर्व पैसे गुंतवणे ही देखील जोखीमच आहे. 
  • महागाई दार वाढत असला किंवा शेअर बाजाराची चढ उत्तर असो म्युच्युअल फंड मध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणुक तुलनेने कमी जोखीमीची ठरते.
  • अल्प कालावधी साठी गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुकदारांनी सुद्धा पडत्या बाजारात घाबरून न जाता योग्य फंडात गुंतवणुक केली तर ती लाभदायक ठरते.
 
हे वाचा : Compound Interest: चक्रवाढ व्याज – ज्याला समजलं, तो पैसे कमावतो; नाही तो गमावतो
वाढत्या दरवाढीचे गुंतवणुकीवर होणारे परिणाम:

(Effects of increasing Interest rate)

  • महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नवीन योजना आणत आहे.नवीन नियम आणि बँकांचे वाढते व्याजदर याचा  गुंतवणुकीवर संमिश्र परिणाम होत असतो.
  • असे असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीवर याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. उलट चढ-उताराच्या या बाजारात गुंतवणुकीच्या अनेक संधी चालून येतात.
  • या संधी नक्कीच लाभदायक असू शकतात. 

म्युच्युअल फंड चे फायदे  : 

(Benefits of Mutual fund)

  • म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या सोयीनुसार पर्याय उपलब्ध करून दिलेले असतात. 
  • फंड मॅनेजर तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करत असतो.त्यांच्या सखोल अभ्यासाचा आणि अनुभवाचा गुंतवणुकदारांना नक्कीच लाभ होऊ शकतो.
  • मार्केटच्या पडझडीमुळे होणारे नुकसान आणि जोखीम कमी करत म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो.
  • म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेवर व्याज मिळते,मात्र चक्रवाढ पद्धतीमध्ये मूळ रक्कम आणि त्याच्या व्याजावर एकत्रतरित्या व्याज मिळते. 
  • दरवेळेस गुंतवणूक केल्यास ही चक्रवाढ होत राहणार आणि अर्थात हे मूल्य वाढून येणार.

 SIP चे लाभ :

(Benefit of SIP)

  • सध्याच्या काळात SIP मध्ये गुंतवणुक योग्य पर्याय आहे. 
  • अस्थिर शेअर बाजारात कमी जास्त भाव मिळून आपण सरासरी काढून फायद्यात राहू शकतो. 
  • व्याजाच्या चक्रवाढीचा फायदा लक्षात घेता सरासरी चा लाभ प्रत्येकानी घेतला पाहिजे. 
  • SIP मध्ये कमीत कमी मासिक गुंतवणूक पासून सुरवात करू शकतो.
  • बचतीवर मिळवलेले व्याज पुन्हा मूळ रकमेत मिळवले जाते. त्यावर पुन्हा व्याज मिळत राहते. 
  • मूळ रक्कम सतत वाढत जाते हीच चक्रवाढ पद्धतीची खरी ताकद आहे.   
महत्वाचे : श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

निष्कर्ष :

  • गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना मूळ रकमेवर व्याज मिळते.
  • मात्र चक्रवाढ व्याजामुळे मूळ रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या एकूण रकमेवर व्याज मिळते असते.
  • साहजिकच चक्रवाढीची ही जादू गुंतवणूकदारांना अतिशय लाभदायक आहे. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…