Compound Interest
Reading Time: 2 minutes

Compound Interest

चक्रवाढ व्याज (Compound Interest) हा जगातील आठवा चमत्कार आहे. ज्याला हा चमत्कार समजतो, तो पैसे कमावतो… ज्याला समजत नाही … तो पैसे गमावतो –  अल्बर्ट आईनस्टाइन.

“थेंबे थेंबे तळे साचे”, हा पूर्वजांनी दिलेला वसा हेच तर सांगतो. वेळ आणि पैशाचं योग्य मूल्य जाणणारे आणि माणसाला पैसा आणि वेळ यांचं महत्व पटवून देणारे तत्व म्हणजे चक्रवाढ व्याज. खरं सांगायचं तर हे तत्व जसं फायदा करून देतं तसंच, खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही करून देतं. त्यामुळे चक्रवाढ व्याज आपला सर्वात चांगला मित्र किंवा आपला सर्वात वाईट शत्रू असू शकतो.

हे नक्की वाचा: चक्रवाढ व्याजाची जादू

Compound Interest: चक्रवाढ व्याज आणि धोका

  • चक्रवाढ व्याजाचे फायदे यापूर्वीच्या अनेक लेखांमधूनआपण बघितले आहेत. कित्येक पटीत संपती वाढवायची असेल तर चक्रवाढ व्याजाने केलेली गुंतवणूक सर्वात फायदेशीर आहे. पण चक्रवाढ व्याज धोक्याचेही आहे. चक्रवाढ व्याज तेव्हा हानिकारक आहे जेव्हा गोष्ट येते कर्जाची!
  • गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबडण्यासाठी वर्षानुवर्षे वापरली जाणारी पद्धत म्हणजे चक्रवाढ व्याज दराने कर्ज. धनाढ्य सावकार गरजूंना अशा तत्वावर मोठ्या रकमेची कर्जे देत.
  • गरीब लोकांना शेतीसाठी, किंवा लग्नकार्यासारख्या समारंभासाठी पैशाची गरज असे आणि सावकाराशिवाय पर्याय नसल्याने म्हणेल त्या व्याजावर कर्ज घेतले जाई.
  • चक्रवाढ व्याजाच्या भोवऱ्यात ते असे काही अडकत की कर्ज फेडता फेडता त्यांचे आयुष्य संपून जाई. पुढच्या पिढीच्या डोक्यावर कर्जाचा हा भर सरकवून समोर दिसणारा आत्महत्येचा पर्याय ते स्वीकारत. आजही अशी जुलमी पद्धत, अत्यंत दुर्गम भागात, अशिक्षित आणि गरीब लोकांना त्रास देत असणार. लोक शेतीवाडी गमावून शेतमजूर म्हणून आयुष्य काढतात.
  • आपण शिकलो, साक्षर झालो म्हणजे आपण सुटलो नाही. कोणत्याही बँक, संस्था, पतपेढी किंवा व्यक्ती यांच्याकडून आपण कर्ज घेतो, तेव्हा आपण कोणत्या तत्वावर कर्ज घेत आहोत? व्याजदर काय आहे? या सर्व तपशिलाचा लेखी पुरावा तुमच्याकडे हवा. नाहीतर आपली गणना सुशिक्षित अडाण्यांमध्ये केली जाईल.      

चक्रवाढ व्याज दराने गुंतवणूक-

  • उत्पन्नावर उत्पन्न मिळवणे म्हणजे चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करणे. सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा काही योजना आहेत ज्या तुम्हाला हमखास धनलाभ करून देतील.
  • नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, किंवा पीपीएफ योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम तुम्हाला हा फायदा मिळवून देऊ शकते. अधिक माहितीसाठी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  

महत्वाचा लेख: गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

चक्रवाढ व्याज दराने कर्ज-

  • चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतल्यावर त्यावर तयार होणारे व्याज हे पोटात गोळा आणू शकते. जेव्हा घेतलेलं कर्ज फेडण्यात दिरंगाई होते किंवा आपण टाळाटाळ करतो तेव्हा हे धोकादायक असू शकते.  
  • क्रेडिट कार्ड बिलावर तुम्हला अश्या प्रकारचा धोका आहे. त्यामुळे त्या त्या वेळी किमान मासिक शुल्क भरत जावे नाहीतर एकूण बिलाच्या पटीत कर्जाची संख्या वाढू शकते आणि अशा वेळी आपल्या मूळ खरेदीपेक्षा मोठी रक्कम भरून कर्जाची परतफेड होऊ शकते.

हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याला हव्यात-

  • प्रत्येक महिन्याला नियोजित कमीतकमी रकमेपेक्षा थोडेसे जास्त पैसे भरावे, जेणेकरून व्याजदराचे नकारात्मक परिणाम भोगावे लागत नाहीत.
  • क्रेडिट कार्ड बिलासारख्या लहान कर्जासाठी, शक्य तितक्या लवकर पैसे भरून मोकळे होणे योग्य आहे.
  • तारण कर्ज किंवा कार कर्जासारख्या मोठ्या कर्जासाठी प्रत्येक महिन्याला कमीतकमी रकमेपेक्षा थोडी जास्त पैसे देऊन करून आपली संपूर्ण संपत्ती कायम ठेवणे शक्य आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Compound Interest in Marathi, Compound Interest Marathi Mahiti, Compound Interest Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…